मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पेशवे भोसले भेटीचा पोवाडा - श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - निंबाजी Translation - भाषांतर श्रीमंत पंतप्रधान उभैता भेटी ॥ होताची हर्षली धरा झाली सुखवृष्टी ॥ मुक्काम फणींद्रपुराहून महाराज श्रीमंत ॥ सुमुहुर्ते डेरे दिधले संगमावरत ॥ आपण निघाले बाहेर सर्व हुतरात ॥ आणि भले सरदार लोक नामांकित ॥ नानासाहेब मातुश्री कुटुंबासहित ॥ बाबासाहेब आणि आबा भवानीपंत ॥(चाल)॥ दरकूच मग उमरावतीवर मुक्काम केला ॥ चौ रोजामध्ये राजे मतलब उगविला ॥ कुल रोजमुजरे झाडून दिधले लोकाला ॥ गावीलची बंदोबस्ती किल्लेदाराला ॥ राजारामपंतांचे स्वाधीन केला ॥ कुल समुदाय सर्वांशी निरोप दिला ॥ कुल - दैवत मातुश्रीचे पदीं घाली मिठी ॥ म्हणजे विजयी होऊन यावे अखंड दृष्टी ॥१॥बबु राजनीति सांगोन नानासाहेबा ॥ सहकुटुंबा बिदा केले आत्मजे बाबा ॥ सह मुख्य विचारुनि असे भवानि आबा ॥ दर मजल निघाले सेना साहेब सुभा ॥ मुक्काम जाऊनि वाशमीं केला मनसुबा ॥ पलटण बेनीसिंगाचे स्वाधीन अरबा ॥(चाल)॥ कूल मुखत्यारी महमदअली ॥ मोहर्याची डावी बाजू त्यासी नेमिली ॥ विठ्ठल सुभ्यास जलद सांडणी गेली ॥ सैन्यास येऊन भेटला खुशाली झाली ॥ बहू गौरवून दिलभरीचीं वस्त्रे दिली ॥ आघाडीस दरकूचाची आज्ञा केली ॥ नाईकवडी गंगथडीस धाडी चिठी ॥ तुम्ही वसूल करावे सब कुल बारा हत्ती ॥२॥दररोज हजरी सुरु चालते स्वारी ॥ तेथे पांडुरंगदादाची खबरदारी ॥ कुल गणती फौज साठ सहस्त्र स्वारी ॥ तेथे कारखाने महाराजाबरोबरी ॥ सवेनामी लोक सरदार मोठे अधिकारी ॥ त्याहांचीं नामें म्या सांगावी कोठवरी ॥(चाल)॥ बरें असो जी ऐकाजी महम्मद अमीरखान ॥ किती खानदान सय्यद मोगल पठाण ॥ यावरी रिसाले नामें कोण कोण ॥ तो गुजर कुशाजी सर्वा बहु सन्मान ॥ उघुपत बक्षी बापु संगीन ॥ साबत खानाचे लोक अति तीक्ष्ण ॥ जरीपटक्या संगे - जमाव झाली दाटी ॥ हुजरात लोक मोठे पागेचे हट्टी ॥३॥हत्तीवर अंबारीमध्ये गुजाबादादा ॥ त्या मागें चालवी शाबुतीने हौदा ॥ सवे गुजर महादजी आप्त लोकासुद्धां ॥ बाणाच्या कैचाअ पुढे धरून मर्यादा ॥ मागे स्वारी श्रीमंत चालवी बिरुदा ॥ पुढे बारेदार जिलबेसी नेमिला हुद्दा ॥(चाल)॥ डाकेवर बातमी पंतप्रधानाची ॥ पत्रावर पत्रें येतीं आस भेटीची ॥ मग जलद निघाली स्वारी श्रीमंतांची ॥ गंगेवर योग साधिला सिंधि ग्रहणाची ॥ दर मजल कडेवर आलि नेमिली प्राची ॥ स्वांगे बंदोबस्ती केली फौजेची ॥ अरब जरब मोहर्यास फलटण मोठी ॥ शुभ तिथि विचारून दिले सुदिन शेवटीं ॥४॥नाना फडणीस चालून दर्शना आला ॥ श्रीमंत करी हो सन्मान गौरवे त्याला ॥ दिले वस्त्राभुषण मग बसूनि विचार केला ॥ शनिवारीं एकादशी नेम भेटीला । सडी स्वारी तयार झाली भले हो लाला ॥ हत्तीवर अंबारी बसावी सर्वाला ॥(चाल)॥ सवे गुजर महाडीक आणि अहेरराव ॥ साळुंके पालकर शिर्के मुकुटराव ॥ घाडगे पाटणकर नामी उमराव ॥ पन्नी पठाण इकडे सिंदे खांडेराव ॥ विठ्ठलासी ताकीद केली तयार व्हावं ॥ कुल मराठ मंडळी स्वारी घेऊन यावं ॥ पर्ह्यांनी फौजा उभ्या दर्शनासाठी ॥ उभैता मिळाली सैन्यें झाली दाटी ॥५॥तर्हेदार पिवळ्या अंबारीमध्यें श्रीमंत ॥ तिकडे त्वमके और्यांत प्रधानपंत ॥ गज उभे सैन्यामाजीं स्थिर मिरवत ॥ हौद्यासी हौदा भिडे पुढे हुजरात ॥ उतरले दोघे महाराज छबिन्यावरत कंठाकंठ मिलविती आनंदभरित ॥(चाल)॥ त्या हर्षे सुटल्या सरबत्ती धुंद गगना ॥ आनंदी मानकरी देती सन्माना ॥ दक्षिण देर्शमिंसलती एक फडणीस नाना ॥ तो सेनासाहेब नानास करी प्रार्थना ॥ आज मोगल करावा जेर अशी वासना ॥ उभैता सैन्यासह गेले स्वस्थाना ॥ पुढे युद्ध होईल घनघोर हा भास पोटीं ॥ निंबाजी विनंती करी जोडुनि पोटीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP