मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रीमंत बाजीराव प्रभुचें ...

दुसरा बाजीराव - श्रीमंत बाजीराव प्रभुचें ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंत बाजीराव प्रभुचें पुण्य आगळें दिसे । जीव नील वर्णापरी परस्परें शत्रु विराले तसे ॥ध्रु०॥
राव दादा कैलासवाशीचे पुण्य उदयालें । त्रिवर्ग राघववंशी सुपुत्र ते स्वराज्य पावले ॥ नाना रितीं बहुतांनी विरोधे अतिउपाय योजिले । न करितांच वध हातीं तयाशी न भारितां भारिलें । अरुणोदय जालीया नभीं बालार्क तेज पसरलें ॥ सवाई बाजिराव धर्मरूप गादीवर बैसले ॥(चाल)॥ ऐश्वर कळा साजती । पाहून शत्रु लाजती । जयवाद्य नित्य वाजती ॥ धार्मिक नित्य गर्जती । किर्ती या मंडळांत, विसले जिवनी ॥१॥

परमन, अति सुशील, सत्य उपाय, सत्य अंतीरीं । सूर्यवंशीचा राव ?? आयोध्यापुरीं ॥ क्षमाशांतीचा सिंधु सत्य निःकपत ह्रदय ??। प्राण भ्रमर भावर्थ कमळिचा आंत गुंजारव करी ॥ या चिन्हें मंडित भुपती विख्यात यश घे श्वरी । ज्याचे तपसामर्थ्यें वितळती शत्रु अभ्रापरी ॥(चाल)॥ जना चक्रामधी येकसरे । केशरी एकला शिरे ॥ नेती भाग आपल्या परी । तेवीं स्वार्थ तरी बरी चक्रांत विज पहा कसे ॥२॥

आज मजी काणती उद्याचा बेत आणिक मसल्ली । सेवक जन संनिच परंतु ते कोणीच नेणती ॥ कळोन द्यावा खुणा येकांतिच्या गुज गुह्या या प्रती । यास्तव ते नृपाळ विचारे गुप्तरूप वैसती ॥ जनांत बोलणें तेंची प्रगटार्थ करून बोलती । मुख्य प्रभुचें लक्षण प्रत्यक्ष ज्यास वचन भारती ॥(चाल)॥ म्हणऊन युक्तीनें अशा । नृप जिंकित दाही दिशा ॥?? यशा ॥ प्रथमारंभीं तशा कल्पनें कार्यसिद्धि होतसे ॥३॥

सांब कृपा परिपुर्ण पुजा बहुत चांगली ॥ स्वजन जनाची केवळ ?? विद्या फळासी आली ॥ निर्धारी शर पंजरी येकेपरी कैसी जाळी । गत वस्तु सायान न करितां ज्याची लाधली ॥ मोडुन त्रिंबच्याप रामचंद्रें जानकी परणिली । दुरघर पण जानकीचा अत्र्दुत ख्याती करून दाविली ॥(चाल)॥ भेदुन यंत्र ते आधीं । पांचाळ मंडपामधी ॥ पार्थें जिंकिली द्रौपदी । पनी प्रतापी राजपदी शोभलें सुशोभित तसें ॥ होनाजी बाळा म्हणे प्रजेच्या आनंदह्रदयीं असे ॥ जिवनी लवणा०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP