मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
भले नाना फडणीस केली कीर्त...

नाना फडणीसांचा पोवाडा - भले नाना फडणीस केली कीर्त...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


भले नाना फडणीस केली कीर्त सवाई । चव मुलखी धास्त त्रीलोक जानती शाही ॥धृ॥ संपन्न सर्वगुनी ब्रहस्पति - प्रमान । कोमळ हदई जैसे भोळे सीव जाने । पाहाता थोरपन मेरू दीस्तो लहान । आर्जुन कर्न त्या तुले पराक्रम जान ॥ चेतुरता पाहाता विशेस गुन सुज्ञान । कुठवर कीर्त वरनावी तर्‍ही मुखान । आदभुत ज्ञान उपमा किती मुन द्यावी । प्रीथ्वीचे वजेन किती म्हुन कोनी जोखावी । कीती खोल सप्त पाताळे मुन सांगावी । संभुच्या तपाची गनना कैसी करावी । आद सेक्तीचा जप किती म्हुन की वदावी । कीती वर्णू पराक्रम म्हुxस्तुत बोलावी । नाना फडनीसच प्रमान तुमची पदवी । सत्त्वधीर कीर्त हारीचेद्रातुले जाली ठावी । श्रीयाळ त्याहुनीया महिमा आघवी । आंतरी शांत कोमळ कठुरपन नाही । येसस्वी सदा कल्पना सर्वा ठावी ॥१॥

नारायन आवतार संपले पाहा जैपासुन । तैपासून सांगतो व्रत ते घ्या आयेकुन । गरभी असता श्रीमंत शेर्त (शत्रू) मर्दी (र्दू) न । चालविल राज नानानी हीमत धरून । कैवरी छेत्रू ठेविले आपनाधन करून । तीळतुले कोठे पडु दिल्हे नाही नुन । धर्येवत नव खंडांत गाजती क्रीत । नादती रहीत (राहात) खुसवतु सहेर पुर्‍यांत । बसल्याच ठाई प्रताप करून आदभुत । मोंगल हापासी फिरगी हेदर्‍यासहित । खडन्या देती ठेविले आनुन जर्बत । बसल्येच ठाई बाछाव आले चालत । केला मुलुख काबीज सागरवलयाकित । येकछेत्री राज भगवा केली झेडा सेर्त । कुठवर वरनावी महिमा विष्णु - भगत । श्रीमत्‍ रावसाहेबाची फिरवीली द्वाही ॥ छेपन देशामध्ये म्हासुर पडली आ (वा) ई ॥२॥

श्रीमंत लाहानाचे थोर केले नानानी । सेवेसी सादर उभे कर जोडोनी । सद्धावे लक्ष लावुनी धान्याचे चेरनी । येकनीष्टये सेवा केली चितापासुनी । धरयेला नाही द्वैतभाव आंतकर्नी । चालविले राज पाहा नाव धन्याच करूनी । चोविस वर्षे नानांनी कारभार केला । नंतर माधव आवतार निजधामा गेला । कसे रा (ज) पुढे चालेल मुन विचार पडला । अनावे सवाई बाजीराव बे (त) ठरवीला । तव घडी रवाना केले परसरामभावुला । भंडारक्रीया भावुन दिल्ही श्रीमंताला । पुन्याशी आनीले बाजीरावसाहेबाला । खडुखडुचे मुकामी नाना गेले भेटीला । कूच दरकूच करून माघुन सिंदा आला । मसलद केली नानानी मग ते समई । आज्ञा घेऊन सातार्‍या गेले लावलाही ॥३॥

नाना कावा करून गेले महाडाला । बरे पाहु कोन चालवील या राज्याला । नानाचे मागे व्रतांत कैसा जाला । सांगेतो स्वत चेतुर आना ध्यानाला । बाळोबा पागनीस भावुसंग मिळाला ॥ मसलत करून राजाचा फितवा केला । जरीपटका मागु लागले बाबा फडक्यासी । परचुर्‍यापसुन घेतली हीरुन मकलसी । नानाचे लोक होत लचे ? तस्ती केली त्यासी । जुने कारभारी होते केले दुर सार्‍या (सी) स्व आगे करू लागले भावु चवकसी । पुढे आसता आवलंबीले थोर कार्यासी । याचे न व दा न व जाचे सेवटासी । व्याघ्राची सर काये येती जंबुकासी । पंडीताची सर काये न ये मुरखासी । न कळे मुढासी पुढे होईल कैसा आपलेच ठकानी बसले होवून बाछआई ॥४॥

सीद्याचे भेटीला बाजीराव धनी गेले । मग मागे बाराभाईनी कैसे केले । बाबाकडे जाऊ म्हून आपासी सांगितले । घालून पालखीत तंद घडी पुन्यासी आणले । पाहा करू नये ते विप्रीत कर्म केलें । दील्ही वस्त्रें जबरदस्तीने तख्ती बसविले । घरोघर करू लागले कारभारासी ॥ चवगदी बैसवील्या चौक्या सेहेर पुन्यासी ॥ ठेवीले कारकोन ठाई नाक्यासी ॥ झाडा घेती बाहीरुनसे हेऊन आल्यागेल्यासी ॥ फोडुन पाहाती कुलतमाम लाखोटयासी । हे आल्पबुधीन आखेर पडतील काx॥ कसी होईल बरोबरी रवीची खद्योताची । मोराची प्रीतिमा नये लाढोरासी ॥ च्यार दीवस मौजा केल्या होवुन सुक नासी ॥ कुल कारभारी भावुचे ठाईठाई । पुन्यात कारभार करती बाराभाई ॥५॥

पागनीस परसरामभावु सीद्यासहीत । कुल तमाम पाहा नानावर फिरले होत । अच्याट बुध नानाची न कळे आत । कळस्रूत्री कावा केला बसुन माहाडात । सीद्याला पत्र पाठवीले लेहुन गुप्त । का परबुधीन घालीता कलप स्नेह्यात ॥ पुर्वीचे वचन चितात करावे स्मरन । तुमचा आमचा येकलास पहील्यापसुन । मातले फीतोनी यासी बंधन ॥ समजले दवलतराव पत्र आसे पाहुन । तदघडी बाळोबा पागनीसाला धरुन । ठेवले आटकत त्याहासी जप्ती करून । तैसच आर्षेन धोंडीबाला करून । बाजीबा मोधी पुत्रासहीत जान । वगैरे साते आसाम्या थोर लाहान । पुन्यातील धरले किती ईचे सीवाई । सागतो नावनीसीच ऐकून घ्या सर्वही ॥६॥

प्रथम वासुदेव कोतवाल केला जप्त । त्यामागे यकासरसे येकाला धरीत । प (ब) हीरो रघुनाथ धरीला ऐका त्वरित । रमी कोडी दोघी कळवावातीनी सहीत । आन्याबा मेदळे नीमये चीतोपंत । सीवपंत मोडके राघोपंत थत्ते । जयराम जोसी जुगी राखी सहीत धरला । केसो शामजी भान्या चेतुरभुज केला । आनीक बाळाजी वीष्णु सहश्रबुद्धयाला । त्याची राख लक्ष्मी ठेविली कैयदला ॥ माहादाजी काळे विठ्ठलराव गोळ्याला । रामचेद्र पराजपे भिकाजीपंत आटकवला । मग धरला चीतो मोरेश्वर सीवनेरवाला । बाजी मोरेस्वर देवरुख्या पळून गेला । गणपतराव करमरकर आना ध्यानाला । सदाशिव थत्ते सदाशिवपंत जोशी वहीला । पानशा तोफखान्याचा धरून ते समई । जनोबा सुभेदार दस्त केला लवलाही ॥७॥

श्रीपतराव पटवर्धन आल्मखान । सटवाजी लाड येसाजी घाडगे पुर्न । वाडयातील चार नाईक घ्या ऐकुन । हरी विष्णु सहश्रबुधे पाहा निरखून । वीसाजीपंत वाडदेकराला धरून । आबाजी बलाळ सहश्रबुधे जान । हारबाजी धायगुडे हीरोजी पाटणकर मोरो बापु बाबाजी? आभ्याआकर । अन्याबा आभ्याकर आनीक दोन हुजरे । निसबत फडक्याची दोन खीस (म) तगार । धरील्या आसाम्या बावन यकतर । आनीक लहान थोराचा नाही सुमार । जे ना (ना) कडे गेले ते ऐका सरदार । मानाजी फाकडे मल्हारराव पोवार । नीलकंठराव दीनकरपंत भडभडे चेतुर । बळवंतराव गोडबोले समजुन ह्रदई । गोपाळराव राजपागे असाम्या साही ॥८॥

राहिला थोडा मजकूर कथा मागली ।....

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP