मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| नांदगांव प्रगाणा जागा आजं... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा मलकोजीबुवाचा पोवाडा - नांदगांव प्रगाणा जागा आजं... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - महादु गोविंदा Translation - भाषांतर नांदगांव प्रगाणा जागा आजंती थोर ॥ साक्षात खाकीबोआ झाले मलकथा अवतार ॥धृ०॥देवबा माळी बोवाला प्रसन्न झाले भगवान ॥ थोरथोर सांगता होते पाण्यावर आसन ॥ खाकीसाहेबाच प्रथम अडगांवी ठाणं ॥ मलकयानें गुरु केला आपुल्या खुषीनं ॥ सद्गुरुची कृपा त्याहीवर झाली संपूर्ण ॥ बगबगीचा जवळ छाया देवळावर ॥ पाठीमागें विहिर पाणी पेतो जनसारा ॥१॥देवमाळी बोवानं मलकयाला लाविलं पिसं ॥ जना तोंडीं कन्न देइना बोलत भलतीसं ॥ मलकयाबोआला उपास घडले बहुत ॥ देवमाळी बोवाच्या कळलं होतं अंतरंगांत ॥ तेव्हा मलकयाचे तीर्थरुप गेले अडगांवांत ॥ म्हणे मी विनंती करतो देवा चला चला आजंतींत ॥ तेव्हा देवमाळी बावाला घेऊन आले आजंतींत । मग बसविलं पुंजीत मलकया आले शुद्धींत ॥ देवमाळी बावाने मलक्याशिरी ठेविला हात ॥ नांदगांव प्रगणा आजंती जागती ज्योत ॥ अवतरले खाकीया मलकया थोर झाले भक्त ॥२॥गौराईनं नवस केला पुत्रु दे मजला ॥ आभरणाच्या सुद्धां काठीं वाहीन देवाला ॥ गोराईचा भाव देवाच्या पायरीले जडला ॥ गौराईच्या पोटीं लेक काशीराव जलमला ॥ तिन आभरणाच्या सुद्धां काठी वाहिली देवाला ॥ तेव्हा देवमाळी बाबांन काठी देल्ली मलकयाला ॥ काशीराम बाबा तेव्हां देवासी बोलला ॥ दशमीची यात्रा भरव शोभे जाग्याला ॥ बारशीच्या दिवशीं काठीं न्यावं अडगावाला ॥ काशीराव बाबानं नेमं यात्रेचा केला ॥३॥फाल्गुनी दशमीची यात्रा भरते गुलजार ॥ बहु याचेमध्ये थाट मौजा करे कारंजकर ॥ आणुन फुलाचे गजरे उदबत्याची बहार ॥ घेऊन टाळ वीणा भक्तजन करे जैजैकार ॥ करण शिंग नवबत वाजे वाद्याचा गजर ॥ संध्याकाळची वेळ दाटी झाली आरत्याची ॥ वाजती नौबता आणखीन घाई नगार्याची ॥ अठरा कुम न्याती करून आरती बराबर ॥ चढीवती मलीदे तेथ नाही जुदाकार ॥ काठया भेटती तेव्हा महोच्छाव होतो राव थोर ॥ काय महिमा सांगु देवा खाकीसाहेब पीर ॥ साक्षांतरी दिसून आलं जसं पंढरपुर ॥४॥महादजी बुवाला प्रसन्न मलकया झाले ॥ देव देऊनि शिरीं त्यास पुंजेसी बसवीले ॥ आंधळ्याला डोळे पाय दिले लंगडयाला ॥ काशीमध्यें होता ब्राह्मण कोड आंगी त्याला ॥ चिंता करे देवाची अन् काशी गेली स्वप्नाला ॥ म्हणे वर्हाडामधी भक्त मलकया जातीचा महार ॥ त्याच उचीत खाशील ब्राह्मणा कोड होईल दूर ॥५॥स्वप्नांत दृष्टांत ब्राह्मण चाले तेथून ॥ नांव मलकयाचा शोध मुलकाचा घेऊन ॥ उत्तम होता दिवस नगर दृष्टीन पाहून ॥ दोन्ही कर जोडून साष्टांग घाले प्रीतीने ॥ म्हणजे कोड करावा दूर अचरण करे कुलजन ॥ मी उचीताची आशा करून आलो ब्राह्मण ॥ तेव्हा मलकया ब्राह्मणासी बोले उत्तर ॥ कैसं उचीत देऊं ब्राह्मणा मी जातीचा महार ॥६॥तेव्हां ब्राह्मण दिलगीर झाला आपले मनांत ॥ म्हणे येता जाता माझा संसार गेला वायार्थ ॥ दोन कर जोडून डोकस ठेवी चरणावरतं ॥ बस्तरवार दिवस यात्रा बसली समोर ॥ करून मग विचार बतासे घालुन तबकांत ॥ लाऊन मलकया हात बतासा टाकी मुखांत ॥ उराला प्रसाद दिला ब्राह्मणाच्या हातांत ॥ तेच उचीत घेतां ब्राह्मण हरीखला फार ॥ भक्षीले बत्तासे त्याचा कोड झाला दूर ॥ कल्प ठेविला अंतरी अन् कोड राहिला तिळभरी ॥७॥बस्तरवारी गजर होतो मलकया भक्त । दूरदूरची यात्रा येते उच्छाव मनांत ॥ वांझोटीला पुत्रु देल्ला पुरविला हेत ॥ शावकाराचं जहाज बुडालं होतं दरयांत ॥ त्या शावकारानं धावा केला आपल्या मनांत ॥ म्हणे धाव पाव मलकया दवलत बुडाली येथं ॥ थोडी नाही राश्येत नवा लाखाची दौलत ॥ खातो म्हणे हिरकणी प्राण नाही ठेवत ॥ त्या शावकाराचा धावा ऐकून पुरविला हात ॥ लावून मलकयांन हात जहाज तारविलं वरतं ॥ बसले पायरीवर अन् बाही भिजली सत्वर ॥८॥गेला शावकार आपल्या घरी ॥ केली नवसाची तयारी ॥ सत्रा कळस सोनेरी ॥ आला आजंतीं नगरी । कळस चढवले देवळावरी ॥ निंबाजीबोवा गंगाबया जी या दोहीच्या हात ॥ शिखरावरते कळस चढविले भली झाली मात ॥९॥कोणाकोणाचे सांगूं देवा आजंतीवर ॥ नाव मलक्याच बहु मुलकामधी नईसर ॥ वराडामधी फकीर निघाला मलंगाचा भार ॥ ढेसकाया मेसकाया त्यान फोडून केल्या चूर ॥ टाकले हो ते देव्हारे भक्तानं घेतले डोंगर ॥ तो फिरतां फिरतां आला होता आजंतीवर ॥ होता जैजेकार बुवाचा उतरला गांवाबाहीर ॥ त्यानं डेरे दांडे दल्ले होते नेर वाटेवर ॥ शामजी चोपडया भेटिला गेला लवकर ॥ मागुन बुवा गेले होते आप करतार ॥ मुजरा करून उभे राहिले त्याहिच्या समोर ॥१०॥मग हात मलकयाचा धरला ॥ नेउनि बिछोन्यावर बसविला ॥ एक मुंडासा काहाडीला ॥ शिरीं मलकयाच्या बांधीला ॥ काच अवघ्याचा निघाला ॥ मग दाना घोडयाला वाटला ॥ सिदा आटा अवघ्याला देल्ला ॥ जेऊन खाऊन अवघे झाले तिरपत ॥ पुढें फकिर मागें बोवा आले दरग्यांत ॥ पायरीपशी येऊन फकीर नमाज पढला ॥ पढली नमाज देवान भेट दिली त्याला ॥ मुक्यानं गिळतो साखर तेथे जरा कळेना अंत ॥ देव दिनाचा दयाळू केलं विखाचं अमृत ॥ फकीर दर्ग्याबाहीर आला हुकुम मलंगाला केला ॥ आनंदानं नाचूं लागले फार दनाना उठला ॥ एक रात्र मुकाम करून फकीर जातो लवकर ॥ शेले मणी कंठा बोवाच्या टाकला हातावर ॥११॥साक्ष पहाता प्रचीत अठरा कुम जोडे कर ॥ साक्ष पहाता प्रचील अठरा कूम जोडे कर ॥ भक्तीला हाजर ब्राह्मण अणिक फकीर ॥ भांबीमधी कन्हुराज दुष्ट दुराचार ॥ कोण लाविती कळ जाऊन त्याच्या दरबारांत ॥ आजंतीमधिं महार मलकया देवाचा भक्त ॥ अन भरते मोठी यात्रा अजाब त्याची कीर्त ॥ भरून बिराची विद्या म्हणलेत आहे त्याच्या जवळ ॥ वर्हाड खाल्लं भोंदून हुजुर कोणी नाही करत ॥ मग झाली त्याची शायना म्हणे रावभक्त जादुखोर ॥ हुकूम केला त्यानं सवारी अजंतीवर ॥ धरून मलकया मनगटीं अपेष्टा मांडिली फार ॥ अन् दोन उपडले दात बांधे हत्तीच्या पायावर ॥ देव भक्ताचा कैवारी तारे वरच्यावर ॥ कल्पले अंतरी श्राप दिला निरधार ॥१२॥श्राप दिला तेव्हां दोन्हीं आपटले कर ॥ राज्यावरून ढळला होता कान्हुजीकुवर ॥ तेव्हां मग खाया मिळेना अन्न म्हणतो नाहीं झालं बरं ॥ त्या कान्हुजीच्या पोटीं होता लेक रायाजी कुवर ॥ तो शहाणा होता रायाची त्यानें सेवा केली फार ॥ दोन्ही कर जोडुनि विनंत्या करे वारंवार ॥ म्हणे अनाथाचा तारक देवा तूं मजला तार ॥ तेव्हा प्रसन्न झाले देव लक्ष्मी देल्ली महामूर ॥ म्हणे माइकरे रायाजी भाग तुझी होईल उजाड ॥ अन् होयाचं तें झालं तुझ्या कुळीमध्ये अंधार ॥ बोलला शबद पुरतुन नाही येणार ॥१३॥तेव्हा मलक्यानं हाक मारिली मोठया लेकाला ॥ म्हणे निंबाजी महादजी तुम्ही जा कारंज्याला ॥ निंबाजीच्या पोटामध्ये धडका उठीला ॥ घेऊन पित्याची आज्ञा निबांजी गेले कारंज्याला ॥ घेतलं सोवळं निंबाजी मागें परतला ॥ तेव्हां मलकयानं हाक मारिली लहान्या लेकाला ॥ लहाना लेक चिंताजी त्याहच्याजवळ धाऊन गेला ॥ म्हणे मागरे चिंत्या प्रसन्न आहो या वेळेला ॥ तो लहाना लेक चिंताजी कांहींच नाहीं बोलला ॥ तेव्हां मलकया बोवा तेव्हां बोले चिंताजीला ॥ जा सातव्या पिढींत भेट देईन तुम्हाला ॥ नेकी धरम ठेव जा तुम्ही ओळखजा मजला ॥ पापबुद्धी धराल तर दगा बसल जीवाला ॥ ऐतवार्या दिवशीं बोवान देह ठेअन दिला । निंबाजी महादजी आले आपल्या गांवाला । खबर कळाली तेव्हा अंग टाके धरणीवर ॥१४॥प्राण गेला तेव्हा सज्जे ढळले दोन । झाला फार आकांत जैसं मोठं पडलं मोठं पडलं रण । हाय हाय करत जन म्हणत हारपला मोहन । एक पिटे लल्लाट देवा दाखव गा चरण । दर्शनाची आवड आमचे डगमगतील नयन । तेव्हां नहाणलं देवाला कपाळी मोहर लाऊन । आंग पुसलं होत देवाच्या अंबाई लेकीनं ॥ मांडी देल्ली होती देवाला धाकटया चिंताजीन ॥ आरती घेऊनी आली बोवाची गंगाई सून ॥ पुंजा केली होती बोवाच्या मोठया लेकानं ॥ उचलून बोवाला ठिकान्यावर गेले घेऊन ॥ बसीवल बोवाला आतमधी पीठ भरून ॥ बसीवल बोवाला आंतमधी बेल भरून ॥ होता एक अवलीया ऐसा नाही होणार ॥१५॥चौघे लेक बोवाला दोघी कन्या सत्वर ॥ अन् पोटी पिकल्या सुना नातीनातांचा विस्तार ॥ फार लागला पैसा दर्गा देवाचा जोर ॥ ईटबंदी वाडा बोवाचा आहे चौफेर ॥ आहे तीन बुरुज वाडयाला आणिक वाडयामध्ये विहीर ॥ दरवाज्यावर सज्जा बैठक दिसते हवाशीर ॥ सत्रा कळस हे सोनेरी आहेत चौफेर ॥ जे कोणी खोटं म्हणेल त्यानं पहावं सत्वर ॥१६॥शके सतराशे च्यार ख्याल केले तयार ॥ नांदगांव प्रगाणा काशीराम जुमेदार ॥ घरगत वस्ती आहे आजंती वस्ती गुलजार ॥ शामजी चोपडया रयत नांदवतो जोर ॥ झाले तेरा चौक भजनी मुक्तीचं माहेर ॥ नथुभटबोवा मागें भक्ती करे फार ॥ काय प्राप्ताअ सांगूं देवा तुझ्या पायाचा आधार ॥ मलक याचा ख्याल ऐका बसून लहानथोर ॥ येडा वाकडा शबद माझा आयका उत्तर ॥ ज्यानं टाकिली पुंजा त्याचं नाही झालं बरं ॥ ज्यानं केली चेष्टा त्याचं नाही झालं बरं ॥ महादु गोविंदा ख्याला गातो वस्ती मोझर ॥१७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP