मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
आजि इंग्रजाचा गर्व । केला...

सेखोजी आंग्य्रांचा पोवाडा - आजि इंग्रजाचा गर्व । केला...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


आजि इंग्रजाचा गर्व । केला खर्व तो अखर्व ॥ पाहताही लोक सर्व । पर्व पर्वतास लाग x॥
मोठें होतां घनचक्र । पाहूं निघे एकचक्र ॥ स्वर्गी कान्होजी व शक्र । मनांत उल्लासला ॥ इकडे रेवदंडेकर उंदेरी । व अष्टागर पृथ्वी आणि हा सागर पाहाया विकास...(ह) र्ष माये साधारण कर्म (न) हे असाधारण । रणी रोउनि चारण । सेखोजी विलासल ॥१॥

आंगें घालुनिया कास । नमुनि जगन्निवास । भस्म लाउनि भाळास । बाळ काळसा ठसे ॥ चिरा बांधुनि शिरास । लाल लाउनि तयास ॥ हातीं घेउनि खर्गास । कोठें नसेमा नसे ॥ लोटुनियां अर्मारास । हाके हाकित लोकास । फिरुनियां आसपास । आंत बहीरीसा धसे ॥ देव सारथी जयास । काय तयास आयास । केला इंग्रेजाचा नास । नेला काळाच्या भसे ॥२॥

फार घेउनि जमाव । मोठा करूनि उठाव । घेत पुढें पुढें ठाव । बेटा पाहुनि घुरे ॥ बंद जाला येव जाव । पडे लोकांस दबाब । कोणा न सांगत भाव । राव मनांत झुरे ॥ आजि जाणुनिया दाव । भरुनि वीरांसि आव । देउनि मिशांस ताव । आपण मागे वघुरे ॥ बहुता दिसांचा हा डाव । घ्यावयाला घेत धाव । घेऊन ते ग्याली नांव । केले इंग्रेज पुरे ॥३॥

नाळ नाळे मागें नाळ । शतें सोडति जंजाळ । जाणों आगिया वेताळ । असा बेटा भांडला ॥ चहूंकडे आळमाळ । ज्वाळ माळां ये भंभाळ । मोठा धरूनि... साळ । साळ थेट (बेट?) फार भांडला ॥ लोक बोलत हा काळ । परि त्याला महाकाळ । कान्होजीचा शेखू बाळ । कराउनि तांडला । स्मरुनिया चंद्रभाळ । घेउनिया करवाळ । पाहतां हे चौदा चाळ । इंगरेज खांडला ॥४॥

पाहिली नाळांची ते मार । मागें जंबू (बं?) रे हजार । रेजगारी बेशुमार । त्या मागें कडाडली । तेथे धरुनि करार । मोठा केलासे संहार । शंभरेक लोक ठार । धाडसी धडाडली । तिकडे जरार जरार । इकडे सर्दार सर्दार । अडाविता आर्मार । भवानि भडाडली ॥ चढुनिया येलगार । झडे आंतही हत्यार । भंगुनि इंग्रेज मार । (हत्या करुनियं फार?) झांगड गडाडली ॥५॥

धीर धरित धीरास । वार मारित....। शिरास शिरी सिंधु दाटला ॥ किती भावले नीरास । किति लागले तीराम । किति धाडले बहुतांची मीरास । जसा घाटला । शेखीं लागला करास । धरूनि आणिला घरास ॥ चौर्‍यासीही बंदरास । धाक मोठा वाटला ॥ करणें ऐसें शंकरास । भयद भयंकरास ॥ शिखोजीच्या किंकरास । किंकर दुमाटला ॥६॥

काखे घेऊनि अंबर । नाहि बांधिली कंबर । नाही व रत्नराडंबर (?) शेखोजीने भाविला ॥ खालें केवळ बर । वरतें मोकळें अंबर । चित्तीं एक चिदंबर । भावेचि संभाविला ॥ जवळ शामह सुंदर । डोबा वलयंधर (?) पांच सात कुंदर । तमासा हा दाविला । राव सुमेरु मंदर । शोभे जसा पुरंदर ॥ करुनिया कलंदर । नसृट बिच्छावला ॥७॥

मानाजी तो राजपूत । दुजा उदाजी सपूत । धोंडोजी तो भांबडभूत । जातीचे हे आंगरे ॥ गुराबा लडावणार लडुनि । अडावणार अडुनि । झगडणार भंगिले ते भांगरे ॥ किती गोळ्यांहि उडेत । किती सागरी बुडेत । किती घायीं आतुडेत । फुललेसे पांगरे ॥ गायल्या ग्यालीचा गीत । पालवाला फार भीत (तो फजित मेला) उरला खटारा ओढीत । दूर बेटा नांगरे ॥८॥

... ... ... ... ... ळजे गर्जना । भडमारांची धं ... ... ... घन जाळहि ॥ गोळांची गरनाळांची । गोळियांची झडी वर्षे । पडत पिंपरेसे वीर । विकराळही ॥ वायूपम शेखोजी । हा फिरत चातैर्फ तेथे । जालासे नीललोहित ॥ सागर विशाळही ॥ जंगा तो उदंड होती ॥ परि तासाची सुलतानी । हे दोनसे मेले वीर । उरले घायाळही ॥९॥

पांच सांत वर्षे श्री सरखेला पासुनि हा मुंबयीचा ॥ संसप्तक जेथे तेथे मोडिला ॥ पहिले तो खांदेरीसी । दुसर्‍याने विजयीदुर्गीं । तिसर्‍याने हिराकोटी । झोडुनिया तोडिला ॥ चौथ्याने चेऊलाच्या चौबारां । शेखोजीने पाडाव केला । आधा अधमेला सोडिला ॥ कान्होजी ....॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP