मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ४

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सवाईमाधवराव सवारी भाग्योदय ज्याचे पदरी । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथे पाणी भरी ॥ध्रुपद॥
श्रीमंत सवाई नाव पावले । दिव्य तनु जणूं चित्रबाहुलें ॥ विचित्रपुण्योदरी समावलें । नानातें राज्याचे आवले ॥ विधात्याने नेमून ठेविले । बसल्याजागीं कैक छपविले । उन्मत्त जाले तेच खपविले ॥ अतिरथि कूल दोरींत ओविले । जगवायाचे तेच जगविले ॥ मग तमाम शत्रु नागविले । तपसामर्थ्ये अपेश लपविलें ॥ दिल्ली आग्र्यावर झेंडे रोविले ॥ अटक करनाटकांत भोंवले । जिकडे पहावें तिकडे उगवले ॥ माधवराव पुण्याची पाउलें । टिपूसारिखे मुठीत घावले ॥ मेणापरीस मृदु वांकविले । सवाई तेजापुढें धाकले ॥ पुण्य सबळ उत्कृष्ट फांकलें । नानापुढे बुद्धिवान्‍ चकले ॥ कैक त्याची तालीम शिकले । तरी ते अपक्क नाही पिकले । ज्यांणी दहा वीस वर्षे स्वराज्य हांकिलें । श्रीमंतांचे तक्त राखिलें ॥ अक्कलवंत कोठेही न थकले । श्रीमंत गर्भी असतां, एकले ॥ नानांनीं राज्य ठोकून हांकिले । माझे करून महाभाव केले ॥ जहाज बुद्धिबळे जवकलें । यावतकाळपावेतों टिकलें ॥ श्रीमंत पाहून धनवर छकले । छोटेखानी कैक दबकले ॥ जे स्वामीचरणास लुबकले । ते तरले वरकड अंतरले ॥ मीपणांत जे गर्वें भरले । ते नानांनीं हस्तकीं न धरले । ते साहेब सेवेत घसरले ॥ मग त्यांचे पुण्योदय सारले । न जन्मले माते उदरीं । घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली बह्मपुरी । सवाई माधवराव सवारी भाग्योदय ज्याचे पदरीं ॥१॥

श्रीमंतांचें पुण्य सबळ कीं । न्य़ून पडेना पदार्थ एकही ॥ महान्न झाले भिन्नमनोदय खिन्न करूनियां शत्रुची शकले । मधें मधें एक चिन्ह उद्भवलें ॥ नबाब झाला सिद्ध, करूं म्हणे राज्य आपण पृथ्वीचें सारें । गलिमाचे मोडून पसारे ॥ वकील धाडूनियां परभारें । हळूच लावले सारे दोरे । म्हणे युद्ध करा धरा हत्यारें । त्यामुळें वीरश्रीच्या मारें ॥ शहर पुण्याच्या बाहेर डेरे । गारपिरावर दिघले डेरे श्रीमंतांला (नी?) जैजैकारें । होळकरास धाडिलें बोलावुन ॥ छोटे मोठे समग्र य़ेऊन । वडिलपणानें जय संपादा ॥ पाटील गेले ते विष्णुपदा । जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा ॥ बहुत शिपायांचा पोशिंदा । त्याच्या नांवें करूनि सनदा ॥ लष्करी एकही नाहीं अजुरदा ॥ त्याचे पदरचे जिवबादादासुद्धां ॥ आणविले परशुरामभाऊ मिरजवाले । नागपुराकडून आले भोंसले ॥ बाबा फडके आपाबळवंत । बजाबाबापू शिरोळकर माधवराव ते ॥ राजेबहादर गोविंदराव पिंगळे । विठ्ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर ॥ गोडबोले राघोपंत जयवंत पानशे ॥ मालोजीराजे घोरपडे ॥ दाजीबा पाटणकर । अष्ट प्रघानांतील प्रतिनिधी । फाकडे मानाजी मागून आले । चक्रदेव नारोपंत भले ॥ दाभाडे निंबाळकर हे उभेच ठेले । रामराव दरेकर चमकले ॥ वकील रामजी पाटील झुकले । मग याशिवाय चुकले मुकले कोण पाह्यला गेले आपले ॥ तमाम पागेपतके बेरोजगारी घेऊनि कुतके । अचाट फौजा मिळून आले ॥ वळून गेले जुळून संगम झाला । तीन लक्षांचा एकच ठेला ॥ त्यामधीं नाना ते कुलकल्ला । होणारी शंकर जाजाला बंदुखानी तोफा गर्नाळा ॥ वाद्यें रणभेरी कर्णाला । गणित नाहीं श्यामकर्णाला मरणाला ना भीत । घोडे पुढें धकावूनी नाना । सहवर्तमान पुण्यांत आले राउत ॥ तमाम दुनिया आली पाह्याला । कन्हया माधवराव फुलांचा झेला । पेशव्यांनी कुच केला । सवेंचि मोंगलही सावध झाला ॥ याचा त्याचा पाण्यत्वरूनि तंटा झाला । तो तंटा त्यानि - व वाढविला ॥ श्रीमंतांनी करूनि हल्ला ॥ घ्या घ्या म्हणून कैक धुडावून दिले लुढावून मोंगल गोगलगाय ॥ करूनियां पृथ्वी देईना ठाय । मोकली धाय करीत हाय हाय ॥ तेव्हा लेंकरा विसरली माय । कैक जरबानें खालीं पाहे ॥ कीं सर्पासन्निध उंदीर जाय । असा मृदु मोंगल केला । शरण आला मग मरण कसे चिंतावें त्याला ॥ उभयतां पक्षीं सल्ला झाला । पुढें मग महाल मुलुख काहीं घेतो देतो श्रीमंताला ॥ ते आपल्याला कोण सांगतो आतां, पुढें जे उडेल मातु । तेव्हां कळेल कीं अमके महाल अमके धातु ॥ पडली पांतु नबाबाला । रहस्य राखून रंग मारला ॥ पुढें ठेविली अस्ता । रस्ता धरून पुण्याचा थाट दुरुस्ता ॥ नबाबावर कंबरबस्ता । फिरून आले वळून एक एक नानापरीच्या वस्ता । सस्ता दाणापाणी वाद्यांसहवर्तमान मश्रुल‍मुलुख कैद करूनियां श्रीमंतांनी कारागृहीं ठेविला । एथुनी पवाडा समाप्त जहाला ॥ सबशहरीं संगमनेरीं । फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी ॥ श्रीमंतांचे दरबारीं । सवाई माधवराव सवारी भागोदय ज्याचे पदरीं ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP