मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
गगन कडकडून पडलें, पार नाह...

दुसर्‍या बाजीरावाचा पोवाडा - गगन कडकडून पडलें, पार नाह...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


गगन कडकडून पडलें, पार नाहीं दुःखाला अरे दुःखाला । श्रीशैल्यमलकार्जुना आम्ही अंतरलों सुखाला ॥ध्रु०॥
शिरीं दुःखाचे डोंगर ग्रहदशा पाठिला । एक वीरस वीरस नऊ महिने प्रभुरायाच्या भेटीला ॥ गाया अनाथापरी दिवस वैर्‍याचे लोटिला । जगन्निवासा का अंतरलों रेषिम गांठिला ॥ आनंदांत केलें राज्य सोनें बांधून काठिला । दुनिया बापुडी दिसती, पैसा असून गाठिला । दक्षिणचें सौभाग्य गळसरी कोण्या रोहकाला । अरे रोहकाला ॥श्रीशैल्य०॥ ॥१॥

रायाच्या मनीं नवते, पडूं नये उपाधीला । चौघांनी भरी भरून घातली गोष्ट विषादिला ॥ फुटली मुठ आवळ्याची राव पडला अवकाळीला । फास करुनि केसांचे शत्रूनीं समया साधिला ॥ लक्षांचे अन्न गेलें राव अंत - रले गादीला । एकटे पक्षावणी उडाले टाकून मादीला ॥ बांगले बागबगिचे वस्त्र लाखाचे फुकाला ॥श्रीशैल्य०॥ ॥२॥

कशी उचलली तळी मिळाले ते बाराभाई । परदेशी पांखरूं कसे केलेस विठाबाई ॥ तीथवार सण कैचा, जंगला वस्ती कोण्या ठाई । पंचप्राण शहराकडे वढतील ओस दिशा दाही ॥ आग लागली दर्यांत बुडालें जहाज ठीक नाहीं । वनवास आला राजेन्द्राला निजली शेषगाई ॥ ज्यांचे होतें त्यास पारखे, काळोखी मुखाला । अरे मुखाला ॥श्रीशैल्य०॥ ॥३॥

रोजागार सावकार बंद उदम्याचीं दुकाने । केविलवाणे जन आपापल्या राव दुःखानें ॥ नाहीं निखालस उदीम. आठरा बंद कारखाने । फिकीर घाली प्राप्त काळजी ज्याचा तोच जाणे ॥ धड आहेव न रांडकी न कैसें केलें भगवंतानें । निरउपाय झाली गोष्ट कंबर बसली घोरानें ॥ वडलावडली नव्हता बोल लागला हो नखाला । अरे नखाला ॥श्रीशैल्य०॥ ॥४॥

भोळा माझा सांभ वामन अहो निर्मळ काया । त्याच्या पदरचे च्यार, बसले बुडवाया ॥ निमकहरामी झाले लक्षपती धन खाया । सात ताल हवेलीचा ज्यांनी ढासळला पाया ॥ शिकारखाने रमणे ब्राम्हण मोकलती घाया । एक्या प्राण्यावांचून शहर करिती गायावाया ॥ थान पितें बालक लोटून दिलेस रघुराया । मी अनाथ माउली कशी नाहीं आली तुज माया ॥ रयत बिचारी लोक झाली उपटली पराला । अरे पराला ॥श्रीशैल्य०॥ ॥५॥

पुण्यासारखें शहर चहुं मुलखीं दुसरें नाहीं । छत्रपतीचें देणे सवाई श्रीमंत पेशवाई ॥ कृष्ण गोकुळीं नांदत होता तैसी सकळ नाही । नाच तमाशे गायन करिती भौती रोषनाई ॥ शेळीनें व्याघ्रास पिटीलें राहिले ठायीं । आधार महा आक्रीत, झाले लागले तक्ताला पाय ॥ बळा बहिरू म्हणे कीं घन्य ईश्वर करणी काय ?। घोर होईल परी हरण च्यार दिवस स्वस्थ राही ॥ सगनभाऊ म्हणे परिसा विनंती उतरावें तुकाला । अरे तुकाला ॥श्रीशैल्य०॥ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP