मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ३

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


झांगड झांगड नौबत झडे, श्रीमंती भगवे झेंडे उडे, कानड लोक फाकडे, रांगडे मुबलक । दिले अटकेवर जरिपटका करितो लखलख, भाले बोथाटया, हौदे अंबारी सरशानिरशा ॥ घोडे अबलख । रणनवरे झुरे बावरे, करि पठाण तल्लाख . धावडे धावडे नलबडे, राणोजी भालोजी घोरपडे, लकडे, झगडे बोटे फाकडे, अल्लख अल्लख । फौजेचा कदम धरि अदम झडतो शिल्लक ॥(चाल)॥ अंगरे इंदुरकर, पुरंदराच्या म्होरे (चाल) अशी श्रीमंताची खटली, विर सारे नटले लढु लढु गटले, नाहीं कुणि हटले, उठले सरदार, संगें घेऊन दळभार । निपाणकर, पाटणकर, राजे निंबाळकर, मिरजकर, होळकर, आले धारचे पोवार, अघाडीस महादजी शिंदा, जिबबा दादा मोठा खंदा, दटविला हौदा फलटणे सुद्धां, सवाई शिंकदर केले कंपू तयार ॥(चाल)॥ सैनामधिं सैनापति दाभाडा घालितो पायीं सोन्याचा तोडा आघाडीस मानाजी फाकडा, अक्कलकोटवाल, आले लढायासी पोलाद नाशिर दौला ॥ श्रींमत सवाई माधवराव । पेशवे दिले अटकेवर नांव, हजारो पदरामधें उमराव नशिबवाला,, दिल्या गारपिरावरावर मोगलावर ढाला ॥ध्रु०॥ ॥१॥

जंगल तर्‍हेतर्‍हेची झाडी, वृक्ष एकाहुन एकेक चढी, गिरी कदंब ताड माड झाड गेले आकाशी, औदुंबर देवदार आवळी फणशी । बुलबुल सारस राजहंस चंडोल तास नीळकंठ चातक पारापात कपोत वनकरकोत महेर बहेर शिकरबाजा चक्रवाके भारद्वाज लंका लोटुन गिर्रेबाज सुरंग कलपोट सुगरणी गौळणी चकवाचकवी दट बगळे बका पानकोंबडे देवचिमण्या सुत अरधन चिडे कुंभारकोकडे हुड कानडे मैना पोपट (चाल)- लगडझगड जळखंडे वाटोघाट (चाल) - वनीं सिंहशार्दुल सांबर हरण चितळ, लांडगे, दांडगे, गवे मृगाचे थवे व्याघ्र हवेहवे मारती बिबे गेंडे नवे माकड नळनीळ आला वान्नरांचा मेळ, तरस रीस कोरेसरे ससे भेकरे जवादी मांजरे काळवीट खुंट खरे वराह सूकरे रोगोल अंगुळा चित्ते घेती छाळ ॥ गज सोंड उचलून पळे, सर्प वळवळे, फोडी गंडस्थळे, झुराप मोकळे भंयकर शहायाळा वनगाया शियाळा ॥(चाल)॥- आजळ कापी जळ सारसत अंगरख चरख उलमत कस्तुरी - मृग कस्तुरी नाभिंत, लागल पगला ॥ अशा वनांतून फौजेचा थाट बाइ गेला ॥ श्रीमंत सवाई० ॥२॥

शिताफळे, रामफळे, जांबफळे लागल्या वनीं केळि कर्दळे, रात्रजळी, बकुळी आवळी, रायजांबफळे, जायफळी पोफळी, गेल्या उंच नारळी मान्दार, देवदार, आगर, तगर, कृष्णागर, मैलागर, रात्रअंजन, पर्वत सारें गजबजले, गेले हेकळ टेकळ पोकळ पाडळ काळे, हिरडा, बेहुडा, साग - साहुडा, रक्तरोहडा, हुड काढा कुढा धावडा धामोंडा केवडा हरि राधा गाळे ताडमाडाचे झाड पहाडोपहाड कडके वेळीं ॥(चाल)॥ - बहुत बोरूचे बेर, उंच सुरूचे सोरा, थोकर बोर सुंदर तिनुक तुंबर वेडा उंबर अंजिर कवठ करि गटगट, हिंगणबेट फणस द्राक्षांचे घोस अननस रानतुळस तिवस काळास अंबर शृंगाटक उपलेट, अरण्याखिरण्या लिंबेर्‍या राहीराही गोंदण्या माळफांगुण्या कडू शेंदण्या त्रिकाट कोराया मुरड - शेंग आणि तुरया ॥(मिळवणीची चाल)॥ - लोहदंड वज्रदंड ब्रह्मदंड खंडोखंड खडेशिंग मेडशिंग खडचंपा खुलला पारिजातक, आम्रवृक्ष फळांनी लवला ॥ श्रीमंत सवाई० ॥३॥

लढती श्रीमंत आणि मोगल खडर्यावरी झुज माजलं, आला मोगलाचा दलबालद जर्दा हौदा, हती तीर - कमान मारि बाण साहेबजादा, हरहर करती हिंदु वीर दिनदीन करी मोगल बहादुर, बक्तर परवर हत्तीवर दौलतराव शिंदा, तोफखाना भिडविला लढला जिवबादादा, फोडल्या होळकरांनी फळ्या रावरंभासि लागल्या गोळ्या मारल्या पठाणाच्या टोळ्या, शिराचा खुर्दा खडर्यात पळाला मोगल फौजेसुद्धां. मोगल कलभांडू, मारिला कोंडू, झाले श्रीमंताशी बळ, वेढी स्थळ, मारि उपाशी पायदळ, शेर तांदुळ, कशाचा गुळ, मिळेना जळ, खाया नाही पलांडू, म्हणे मोगल देतो दंडु, पासष्ट लक्षाचा मुलूख दिला अफसुख निसरिण मुलुख, द्रव्य मुबलक, घोडे अबलख, हवालि केला प्रचंडू, झाले सलेमामले खंडू ॥ आला शहर पुण्यास माधव संगे यादव भोसले जाधव आणि सजेंराव मिळुनियां सर्व मोडिला भवभांडू नानांनी धुंडू धुंडू ॥(मिळवणी चाल)॥ - कवि कुशाबाचि अक्षर, सुंदर नवरत्नाचा हार, कविला प्रसन्न शिवशंकर, ह्रदयी ठसला, तोचि हरिहर विश्वंबर घटोघटि बसला ॥ श्रीमंत सवाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP