मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सांग रमाबाई सत्त्वधीर । र...

रमाबाईचा पोवाडा - सांग रमाबाई सत्त्वधीर । र...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सांग रमाबाई सत्त्वधीर । रावसाहेब ईश्वराअवतार ॥ध्रु०॥
नानासाहेब होते पुण्यपावन । उदरीं जन्मले एक रत्न ॥ विश्वासराव, राव, नारायण । जसे बंधु राम लक्षुमण ॥ हिर्‍यारत्नांची जोडी विदूसलि कोण । ज्याची कळा तोच जाण ॥(चाला)॥ वाजे खणखण । धवशा दिला बसवून ॥ नाहीं गेले पुणें सोडून । केलें काबीज झुंजल्याविण ॥ वसई सुरतेचें ठाणें । कुलाबा फिरंगाण ॥ आंग्रें आणिले धरून । ते बंदीशाळेत अझून ॥ सोडवील कोण द्वाही त्याची फीर ॥सांग०॥ ॥१॥

बुद्धीचे सागर रावसाहेब होते । कर्मी त्यांचे अघटीत ॥ त्यांचे बुद्धीचा न कळे अंत । हत्तीघोडयाचे मोठे परीक्षवंत ॥........। स्वारी निघाली त्वरीत ॥(चाल)॥ संगे सडी स्वारी । संगे चौघडयांच्या भेरी । कालू वाजती नानापरी । बारगिरांची गत काय न्यारी ॥ पुढें धावती विटेकरी ॥ आयन्यांची खासी अंबारी ॥ गज सजवून तयामाझारी ॥......। वर्णिती राव किंकर ॥सांग०॥ ॥२॥

स्वारी पुण्याहून गेली थेऊराला । त्या गणपतीच्या सेवेला ॥ रमाबाई विनवी त्या गणपतीला । “चुडेदान देइ तूं मजला ॥ एवढें वरीस राक साहेबांला । अवघा सोन्यानें मढवीन तुजला ॥ मंदिल मुंडासा शिरपेच वाहिला । हिरे जोडीन तुझ्या मुकुटाला ॥ सोन्याचा कळस लावीन तुझ्या शिखराला” । पांचा लक्षांचा नवस केला ॥(चाल)॥ बाई विनविती । मज प्रसन्न व्हावे गणपती ॥ कशी हीन झाली तुझी मति । मंगळवाराच्या राती ॥ सादृष्ट आले गणपती । उभे ठाले ग बाई पाहती ॥ कर जोडून बोले गणपती । “काय आहे ग माझे हाती” ॥ कर जोडूनि सांगे गणपती । “कर्ता हर्ता तो श्रीपती ॥ मी मोदकाचा बहु पती” । ऐकून बाई हांसली चित्ती ॥ पुढे उगवला दिवस बुधवार ॥सांग०॥ ॥३॥

दिवस उगवला बुधवार बुद्धिवंत । दिशा धुंदकारल्या समस्त ॥ गेले निजधामा रावसाहेब श्रीमंत । देवाज्ञा झाली त्वरित ॥ रमाबाई होती दुसर्‍या डेर्‍यांत । कळली बातसी आली धावत ॥ पदर टाकिला खांद्यावर त्वरित । धावत आली देवाळात ॥ “ जातों आम्ही नाहीं राहत । (चाल) करा बोलावणें । आम्हा निजधामासीं जाणें” ॥ तुळशी मंजुळी तोडून । त्या माळा गळ्यात घालून ॥ सर्व श्रृंगार उतरूण । हे निर्वाणीचें लेणें ॥ गोपिका बाई म्हणे ॥ जवळ बोलून नारायण । राघोबादादा येऊन ;
हात वटिंत घालून ॥ राव निरविले नारायण ॥...॥ वर्णिती राव किंकर ॥सांग०॥ ॥४॥

बाई चालली थेऊरातून । कुडी साहेबाची घेऊन ॥ अबीर गुलाल गेली गर्दी होऊन । मुच्छदी उधळती पान ॥ आणिक चवघडे वाजती खणखण । पुढे हुजराती घेऊन । मुळेच्या तिरी उभी राहिली जाऊन । काशीचें पाणी आल्या कावडी भरून ॥ बाईनें केलें
जलपूजन ॥(चाल)॥ रमाबाई पाषाण हिय्या केला । प्राण ज्योतिशीं मिळविला ॥ उभी धर्मशिळे ठाकली । हातची टाळी पिटली ॥ धवराळ जळूं लागली । हाक इंद्रसभेला गेली ॥ विमानें धाडून दिलीं । दोघें विमानीं बसविलीं ॥ सती शोभली जशी सुलोचना नारा ॥सांग०॥ ॥५॥

( पोवाडा अपूर्णच उपलब्ध असल्यामुळे शाहिराचे नाव अज्ञात. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP