मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
पुणे शहर किलवाणी दिसती जा...

दुसर्‍या बाजीरावाचा पोवाडा - पुणे शहर किलवाणी दिसती जा...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


पुणे शहर किलवाणी दिसती जागा । करुणा कां येईना तुला अरे श्रीरंगा ॥ध्रु०॥
जाऊन राव राहिले ब्रह्मावर्ती । वनचरा हातें पृथ्वी केली निक्षेत्री ॥ एका प्राण्याहून सुन्य दिसे धरत्री । रयतेला लागला वनवा जळती अंत्री ॥ रायाचे आश्रमीं ब्राह्मण गायत्री । कशी एकाएकी झाली धन्य कळसुत्री ॥ शाहु छत्रपतीचे देणें गेलें भंगा । व्याघ्राचें घरामधीं जंबुक करितो दंगा ॥पुणें०॥ ॥१॥

काही योग्यता नाहीं राजेशाला । पंचामृत माहित. नवतें मोशीम शाला । चवरंग पलंग तरी गेले ! किंमत खुर्च्याला । उन्माद सदां धुंदी मर्धी दारू निशाला ॥ भरगच्ची मंदील, चिरे, शाल, दुशाला । आल्या डगल्या टोप्या कंदील नाहि मशाला ॥ पालख्या अबदागिरी गेल्या माद्वन पागा । झाले मेणा छत्र्या जागोजागा ॥पुणे०॥ ॥२॥

दक्षिणचें मंगळसूत्र कोठें दडलें?। मध्यभागी जाऊन समुद्री जहाज बुडलें । वनवास आला नळराया तसें हें घडलें कसे एकाएकी शिरीं आकाश कडकडलें ॥ मसलत करूनी बारांनी मधी सोडविले । आले निघून वनवासीं हो राव राहिले ॥ तूं बौध्य होऊन बसलाशी पांडुरंगा ॥ अझुन सत्त्व किती पाहाशी होशील जागा ॥ करुणा का येईना तुला अरे श्रीरंगा ॥पुणे०॥ ॥३॥

रायाचे मनामर्धी नवतें दुजेपण कांही । भरी घालून चुहंकडे गेले च्यार बाराभाई । चौमुलखी दर्प जयाचा कीर्त सवाई ॥ हा दर्प लोपला पर्वताची रायी । असे कधीच नवतें झालें होती लाखो शाई ॥ घटकेंत बुडाला सरली ज्याची कमाई । कवी विठ्ठल मोरू म्हणें पहावें सोंगा ॥ गुणी मोतीराम म्हणे सादर व्हावे प्रसंगा ॥पुणे०॥ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP