मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रीमंत बाजीराव कन्हया श्...

रुपराम चौधरी याचा पोवाडा - श्रीमंत बाजीराव कन्हया श्...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंत बाजीराव कन्हया श्रीकृष्ण आठवा आवतार जन सेवक स्वामीच्या प्रसगी आयेकुन घ्यावे निरंतर ॥ रामभकत रुपराम चौधरी सावळी मूरत मणुहार । धने शुर रणशूर पांडववंशामधि पारथवीर ॥ दादा (सा) यबासंगे लडाया घेतल्या रावाबरोबर । निज्यामआली ज्यार केला पाहा राक्षेसभवनावर ॥ कोपरगावी भील कापले नाही राहिला ठिकाना । येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवाना ॥ध्रुपद॥ ॥१॥

सुभेदार रुपराम चवधरी च्यातुर यक मोतीदाना । येकायकी रतण हारपले कसे कोपला भगवाना ॥ मिरजवाले राव रास्ते गुण घेती सिंदेस्याई । ईंचुरकर आणि बापु गोखले रणि जानती होलकर स्याई ॥ रुपरामचा सर्मजाम बिनमोल कृत ठाई ठाई । रेणु रेखले सतर शुतारनाला तो सिगता नाई ॥ छोटेखानी बाग बनविला फुलबागाची चेतुराई । नेला बंब नळ वाढुन आणिला सेहर पुन्यामधि सवाई ॥ मुरत गेली फिरत राहिली हेच मागणे श्रीकृष्ण ॥२॥

डोळ्यास आणून पानी आपा दादासी बोलाविले । आता आम्ही काही वाचत नाही ब्रह्मलिखत करमी लोहिले ॥ श्रीमंतासी करा हिनती माहाल मुलुक घ्यावे आपले । सोडचिठया आपहास्तें दिधल्या। पाळिक लोक मनिं घाबरले ॥ बाबासाहेब धनी कृपाळू पत्र पाहताच संतोसले । स्याहानपनाची रीत वळकली सवस्थान राखुन ठिविले ॥ उमाबाई व रमाबाईला सांगा नका करू रोजना ॥३॥
श्रीमंताने वस्त्र दिले बोलावुन रामचंद्रासी । सिरी ठेविला हात. ‘शुकी संभाळांवे सवस्थानासी’ । हि...आखर जाला र पडरीच्या राना ॥ शुभेदार रुपराम चौधरी च्यातुर मोतीदाना । येकायकी रतन हारपले कसे कसे कोपला भगवाना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP