मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा सोलापूरच्या लढाईचा पोवाडा - श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - रत्नराव Translation - भाषांतर श्रीमंत म्हाराज पेशवे धनी मुकले राज्याला ॥ शिरी सलामत इंग्रज बहाद्दर दख्खनी झेंडा लाविला ॥ध्रुवपद॥श्रीमंत गेल्यावर पाठीमागे वर्तमान काय झाला । सोलापूरच्या किल्ल्याजवळ तोफखाना लढूं लागला । त्या किल्ल्याचा धनी गणेशपंत काय बोले फिरंग्याला । लक्ष बांगडी फुटेल परंतु किल्ला देईना तुह्याला । दारुगोळी भांग तमाखू कमी नाही पैशाअला । दाणापाणी उदंड भरले अराब कोरडीला । कडीतोडे बक्षिसी पोशाग देईन शिपायाला । हरतर्हेने लढवीन किल्ला नका खवळूं आह्यांला । तीन हजार गारदी शिपाई अरब चाफेलीला । बंदोबस्तीने किल्ला रेखला हुकुम केला तोफेला । नव्हते किल्ल्याचें लगीन लागलें बाशिंग बांधलें रणमंडळाला ॥१॥चौभौवतेनें घालून वेडा वाजवी तंबूर । अकराशें पलटण शिवाय दुलेखान सरदार । तुरुप स्वारानें वेंठ उठविला तोफ किल्यासमोर । व्यर्थ जिवासी तुह्यी कां मरतां धाडा मनसुबदार । सल्यामामल्यासाठी फिरंगी चालून गेला म्होर इश्वासानें आत घेतला सांगतसे मुजकुर । अवधी दखन घेतली तुह्यी कायल बहुत आह्यांवर । गडकिल्ले सोडून पळाले बातमी दुरवर । किल्लेदाराने धरून फिरंगी कापलें कापलें शीर । वेशीवरतें शीर ठेविलें पाहातसे लष्कर । आग तळव्याची गेली मस्तका लईन पुढें तंबूर । रेवनीला होता आरब तोफखान्यासमूर । खननन तलवार झडली एक सवा पार । सतरा हजार अरब छाटिला जालासे धुंदकर । पांच पलटन घायाळ झाली डोली करा तयार । त्या वेळेला खासा पडला फिरंग्याचा सरदार । घायाळ मुडदे पावून कयकजन नवस करती पिराला । येवढी लढाई पार पडू दे करीन कंदुरी तुला ॥२॥तोफा बाणाच्या माळा ओढुनी नेल्या लष्करांत ॥ भर दुपारा हल्ला नेमिला आला किल्ल्याभोवत ॥ रणमंडळाहून तोफ सोडिली गोळा लष्करांत ॥ दिल्या मुडद्यावर हात फिरंगी शिरला गोळा पुरांत ॥ दुल्लेखानाने लूट घेतली जलमाची संगत ॥ सावकारानें प्राण सोडिला होईल कोणची गत ॥ गल्लोगल्लीने पडले मुडद्याचे पर्वत ह्यांकाळ बुरुजावरून बळावली तोफचि विपरीत । खुर्दा घालुनी तोफ ठांसली धरी मुजरा पेठेत । हजार बाराशें लहिन उडाली पावएक घटकेत । दरवाज्याला जाऊन भिडले शिडया लावी खंदकांत । किल्यामधिं झाला फितुर मग पडली मसलत । ठाणें मोकळें करून देतों वाट द्यावी आम्हांला । सोडून किल्ला जाला वायला ॥ नीर फुटला लोकांला ॥३॥दखनेमधिं पयस फिरविला राजे आले हाताला । सातारा देश प्रांत चांगला दिला गरुड सायबाला । गराड साहेबाची फार चौकशी जाहिरनामा फिरविला । चौहप्त्याने द्यावा पैसा कौल दिला रयतेला । गड किल्ले हे आड बावडया चट मांडाया लागला । झाडझुड मुलमाणस चट ल्हिया लागला । चाक घेऊनी गोरा हिंडतो जमीन मोजियला । हरबाबतीने कुळें रक्षिली ताकीद शेकदाराला । लांचलुच जो म्याल खाल तर वतन पडल जप्तीला । हजार रुपये अम्हि वसुल करावे काय प्राप्ति आम्हाला । तपकीरीला पैसा मिळेना व्यर्थ जाच ल्हियाला । तुरा लावुनी रयत हिंडतो दूःख जमेदाराला । वाघाहातची मेंढी सुटली मारि पंजा धरणीला । असे युक्तीने राज्य चालवी गरड सायब तो भला । राव मजकुरी संगे शिपाई रत्नराव बोलला । भैरवनाथ गर्जे सभेला त्याने पवाडा केला ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP