मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
श्रीमंतमहाराज सवाई रावसाह...

नानाफडणिसांचा पोवाडा - श्रीमंतमहाराज सवाई रावसाह...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


श्रीमंतमहाराज सवाई रावसाहेब मोतीदाणा । खुप युक्तीनें राज्य राखिलें यशवंत फडणीस नाना ॥ ध्रु०॥
रतिवंत महाराज पेशवे माधव विष्णू अवतार । हिंदुस्थान कर्नाटक तेलंगण काबिज केलें सार ॥ घरिं बसल्या घरिं खंडण्या येती वृत्तांत ऐका साचार । शिंदे होळकर गाइकवाड नामी नमी सरदार ॥ जाट रोहिले पठाण कांपति राजे उदापूरचा राणा । खुप युक्तीनें०॥ ॥१॥

जरीपटक्याचें निशाण तात्या हरिपंताला सरदारी । चौखंडांमधिं घौंशा वाजतो कइकांला दहशत भारी ॥ हुजरातिची जिलीब चालती मानकरी सेना सारी ॥ पाटणकर घोरपडे निंबाळकर तलवारीचे धारकरी । अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । खुप युक्तीनें०॥ ॥२॥

भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार । मर्दानें हो राज्य राखिलें मनसोबीच्या तलवार ॥ इंगेजाला खडे चारिले नाहीं लागुं दिअल थार । दर्यामंधीं पिटून घातले काय सांगू वारंवार ॥ बदामीचा किल्ला घेतला असा पुरुष नाहीं शहाणा । खुप युक्तीनें०॥ ॥३॥

भले बुद्धीचे सागर बुद्धीवंत बुद्धीचे सागर । दुष्टाचें निर्दाळण करुनि राज्य राखिलें एकछतर ॥ श्रीमंतांच्या वाडयामधीं सबनिस अण्णा खेडकर । कुल अखत्यारी बंदोबस्ती बाळाजीपंत ठोसर ॥ नानापरिचे विलास करितो जैसा गोकुळीं हा कहाना । खुप युक्तीनें०॥ ॥४॥

लक्ष धन्याचे पायीं चित्तापासुनि हा ज्याचा भाव । पहा राइचे पर्वत केले वाढिवले माधवराव ॥ लग्नासाठी आणले ज्यानें मोठे मोठे उमराव । जागजागीं दिल्या बैठला अनंत होतो उच्छाव ॥ तखतराया रथ ह्त्तीचा पुढें वाजे नौबतखाना । खुप युक्तीनें०॥ ॥५॥

राव बाजीचे पुण्य प्रतापी पुणें शहर केवळ काशी । गोब्राह्मणां प्रतिपाळितो दक्षिणा श्रावणमासीं ॥ टिकून धनया धन्य म्हणजे या पेशव्याच्या वंशाशीं । बाळा बहिरू करी कविता बसूनियां नित्य गासी ॥ सेवक सिताराम ज्यांचा दशनामीं भगवा बाणा । खुप युक्तीनें०॥ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP