मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - ६

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


मोगलाच्या येति खबरा शिपाई रणशूर । भले झुंजणार ॥ हैद्राबादवर साहित केलें दारूगोळा फार पलटण सार । तीन लाख घोडा घेऊन जाईन पुण्यावर ।! जाळीन शहर कापिन गाइ करिन कंदुरी शेखसल्याम्होर । दख्खनच राज्य करिन सार ॥ मोगलावर दिल्या रे ढाला पुण्याबाहेर ॥१॥

सवाइ माधवराव मनसुबा ऐका नानाचा शहाणपणाचा । शाण्णव कुळिचे राजे मिळोनि मोड करिन त्याचा मोगलाचा ॥ दौलतराव महाराज विडा उचलिला पैजेचा । मार देईन तोफेचा ॥ हिंदुस्थानामधि पत्र पाठवा या तुम्ही लौकर धरा बेदरचा सुमार । मोगलावर ० ॥२॥

श्रीमंत महाराज पेशवे बसूनि सकळ पाताड वाची निर्मळ । आश्विन महिना आदितवार दिवशीं होता पर्वकाळ - ॥ मुहूर्त, दौलतराव बाळ । नागाच निशाण भरारी फिरंग्याचा लोळ दारूगोळा पुष्कळ ॥ आला आनंदी नाम संवत्सर होता तोच वेळ । पैशा पायली जोंधळ ॥ लिंबाळकराच्या राज्यामधें झाला मोठा कहार ॥ रावरंभा आले म्होर । मोगलावर ० ॥३॥

वाजति चौघडे आराब भोजखिंड । म्होर आल झुंजायाच तोंड । जिवबादादा देवजी गवळी ते झाले म्होर । तोफा सोडिती धडाधड ॥ आला भोसला राजा त्यापाशीं तीस हजार घोड । दोहिरी बाणांची परवड ॥ झाल्या सिनेवर भेटी ॥ बाबा फडक्यांच्या हातीं ॥ मुहूर्त त्यानीं लाविला म्होर । मोगलावर० ॥४॥

रावरंभा मोगल आला खडर्याच्या वरता धडाधड तोफा सोडिता । मोडली हुजरात ॥ पळूं लागले समस्त । परशुराम आले हातघाइस ॥ जिवबा दादा भले शुरमर्द ऐका त्याची मात । आले तोफेचे दणके देत ॥ गोळ्या पाठिमागें गोळ लाविला हाती पळ आरडत । शिपायाची तंगडी उडून जात ॥ मोगल कहे “जाजमौला कैशि होइ बात । कायकु लष्कर गजबजत” भोसल्या राजाचे बाण चालले कोकत ॥ पडला रणांत आकांत ॥ उजव्या बाजुला तुकोजी होळकर ते झाले म्होर । रणी मारितो तलवार ॥ मोगलावर० ॥५॥

बुधवारच्या दिवशीं ज्याणें मोगल मोडिला । नेऊन खडर्यामधि कोंडिला पांच क्रोड रुपये खंडणी देतो तुम्हाला । रातचा मोगल पळुन गेला । झाली बुनग्याची गाळण झाडुन पेंढार्‍याने लुटला । येश आले दौलतरायाला तोफाची चाकरी होती त्या शिदोजि गवळ्याला । बारामाई मारी तलवार । मोगलावर० ॥६॥

अवघे पेंढारी मिळुनशानि चढले गर्वान । बेजार केले दखन ॥ माशावाणी नीर काढिला आणले धरुन । रूपये मोहरा खोगरान ॥ भल्या भल्यांच्या इजती घेतल्या लावले पिटून । संगती पागा देऊन ॥ परशुराम भाऊ आले यश घेउन । खंडण्या येत्यात मागुन ॥ बाळा लक्षुमण गातो पोवाडा हमेश बसून । करड गांव त्याच ठिकाण ॥ आइक ये शाहिरा तुझी कलगी आहे थोर । हरदास मनामधि झुरं ॥ मोगलावर० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP