मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| उगा भ्रमसि बा उगा कशाला य... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा पेढार्यांचा व दुष्काळाचा - उगा भ्रमसि बा उगा कशाला य... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - रामजोशी ( चाल - ‘नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी’ रामजोशी ।) Translation - भाषांतर उगा भ्रमसि बा उगा कशाला युगांत खळ हा कली । कली मातला सार धनदारा इच्छी राज्यासही हाकली ॥ध्रु०॥कुणा न कुणि धनि मना ये तसे जनांसि जन वंचिती । धनानिमित्तें मरति किति गरति धरूनि यवन अन्न चारिती ॥ आठां दिवसांमधिं पठाण तिनदां लुटावया धांवती । उठावयाला तकवा नाहीं बकवा सारा धनिचाकर झूंजती ॥ दार वित्त घरदार दिलें तरी मार चुकेना रती । फार वदूं मी वधिल्याहो काई गाई बाटविल्या द्विजसती ॥ फंद मातले धुंद झाली बेबंद बुडाली क्षिती । मंद करिती मसलतीला मग फ्सली तिला नावरितां फळ भोगिती ॥ पुंड घरोघरी बंड कुणावर दंड कोण बांधिती । खंड कुणाच्या गावा कुणि घ्यावा द्यावा कुणि कुणाला किती ॥ असा न कोणी पुसावयाला कसा काळ कशि गती । बसावया नच जागा मग पागा गजरथ बागा कुठें राहती ॥ चिकाआंत ज्या निका पढविल्या पिकाशि गळ लाविती । विकावया त्या नेल्या किती मेल्या अबळा उरल्या जन चुंबिती ॥ फांस गळ्यामधिं बांस पाठीवर लोहहडा लाविती । मास विप्र लोकांचे तोकांचे वेचिती सांडस घेऊनि हातीं । धीर वीर किति अमीर होउनी फकीर भिक मागती । चीर नसे हो आंगा किति सांगावा तो जीभ लाजती ॥ हातिं धरुनि देवता फोडिल्या लताराम भंगिती । गतायु किति झाले किति प्याले विषय किति उरले सुख सेविती ॥(चाल)॥ किति सागरउदके कुटुंबसह वाहले । किति दैवगतीने काशीसहि पावले ॥ किति कर्नाटक देशांत धनिक धांवले । किति अबूचे जन येथीच भांबावले ॥ कैकांनी हिरे बचनाग कैफ चावले । किति उठाउठी भयभीत मरण पावले ॥ किति ब्राह्मणागालहि यवनांनी चावले । कवले काय करितील जन का गावले ॥ अति सात्त्विक ते दुष्कर्मी सरसावले । किति फंद करिती ते बेबंदांतचि घावले ॥(चाल पहिली)॥ कयास मज हा लया रुद्र करि दया दृष्टि झांकली । भयानका क्षिति झाली घरघाली रुद्रविंशति जगिं फांकली ॥१॥रुसा न कलिवर पुसा कुणि परास म्हणती करा पातकें बरी । खराब जन निजकर्में करिती अधर्म राजाची अफतरी ॥ बाप तयाला ताप वृद्धपणिं पापपुत्र हा करी । शाप देतसे तोही म्हणे नोहे माझा वीर्यज हा तरि जरी ॥ माय टाकिली पाय बांधुनी बायकोशि घे शिरी । होय कशाचा बेटा तो पेटार्यांतुनि साप काढिला वरी ॥ सून बहिण सासू जे म्हणति तिशिं सुरतवासना घरी । भवन बुडे पापाने, मधुपाने मातुनि माय सुताला वरी ॥ मनीं धरुनि कामिंनी मठामधिं मुनी विनयचातुरी । जगीं दाविती बावा, परि आंतुनि कावा, भोंदुनि खाती पुरी ॥ लेश नसे उपदेश आपुला देशा टाकुनी दुरी । केशवार्चन करती वरती परि आंतुनि कर्मे नानापरी ॥ असे धूर्त जे तूर्त जगामधिं मूर्त पाप चव घरी । पूर्ती मखादिक याचिं व त्याची कर्मे म्हणू नका हो खरी ॥ वित्त हरिति निरनिमित्त ठेवुनि चित्त अर्थ यावरी । मत्त धन्याशीं चोरी करिती अधिकारी दया कुठुन भूसुरीं ॥ सती म्हणति निजपती त्यजुनि नांदती पराचे घरीं । जिवें मारिती भर्ते त्या वरते दुसरे करिति कितिक सुंदरी ॥(चाल)॥ किती कन्या ह्रदयविक्रयें परमपातकी । एकाची वृत्ति एकास करी घातकी ॥ किति दुर्मतिनें गुरुपत्नीला हाटकी । किति जारण मारण उच्चाटण नाटकी ॥ कितिकांची वाणी मृषा वदुनि हालकी । धनियास पालखी चाकरास नालकी । कुणि विधवा ठेविती घरामधें पाणकी । मित्रास वंचिती मग कोठुन भावकी ॥ अशिं कितिएक पापें जगी कुणा ठाउकीं ॥ (चाल पहिली)॥ जराक यास्तव करावया स्तव जरा मतिस जाकली । करा श्रवण व्हायाचे ऐशी विधिवाणी भाकली ॥२॥चिन्ह वाटतें भिन्न पुढतिं जें खिन्न जाहले मनीं । भिन्नदेह किति करति किति भरति पोटें श्वानें कंटाळुनी ॥ पहा कितिक जन महागाईनें दाहि दिशा धुंडुनी । अहो शेवटी मेले किती गेले यमलोकाशिं गणावे कुणीं । भणाण सारा दणाण झाला कणा पावति सणीं । कुणास न मिळे भाजी कुणि राजी करडी मिळो आंबाडी जुनी ॥ मुरक चढती कुणी भूक म्हणति द्विज आधुक तशा ब्राह्मणी । कुकरी शालाशाला कुणि त्याला भी राहूं न देति आंगणीं ॥ कढी म्हणति कुणि वडी घालिती उडी अन्न पाहुनि । रडि येती किति पोरें किति ढोरें तैशीं ओढिती दारांतुनी । पाक हो न हो हाक मारिती भाकर द्या म्हणवुनी । टाक मुखामधि काहीं मज नाहीं म्हणती अन्न पंधरा दिनीं । जळा पिउनि किती नळांत फुगले पळांत वपु त्यागुनी गळां पडुनि किति रडति किति धरति बाळे मुडदे कंटाळुनी ॥ क्षुद्र इतर जे शूद्र तयांवरि रुद्रकोप या क्षणीं । मुद्रस कैचा त्याला भलत्याला भाकर मागति मुख पसरुनि ॥ चणा अगर नाचणा एखादा धणा मिळे त्यांतूनी । उणा दिवाळी दसरा किती दुष्काळाचा घसरा घ्या पाहुनी ॥ पीठ डाळकुट मीठ ढिगावरी नीट पडति जाउनी । धीट सोशिती कांठी परिपाठी सोडित नच मेल्यावांचुनी ॥(चाल)॥ करितील कायहो अन्नाविण गांजली । ही दुनया सारी जठराग्रिंत भाजली ॥ नच माधुकरीला कोणि तदा लाजली । वेंचिती शितें चिखलांत राड माजली । धनिकाची दौलत अपणांत सामावली ॥ शेवटी विळे पळी दिवेलावणी बाजलीं । यावरि येउनियां देवा कां गांजली ॥ कैकांनी कुटुंबे विष पाजुनी निजविलीं । ही दुष्काळाची भंलि नौबत वाजली ॥ वर्णावी म्हणुनियां कविमतिला डाजली ॥(चाल पहिली)॥ काळ कठिण दुष्काळ उडाला काळरीति ठाकली । भाळवृद्ध लोकांत कुठे काही तरी मर्यादा राहिली? ॥३॥सुधी म्हणति निरवधी काळ त्यामध्यें दीडपायली । कधी ऐकिली चिपटीं कधी निपटी कोळवी चोळवी कधी पाहिली ॥ जुना जिन्नस वरी उणा वाटे कुठे कुणांत पत राहिली । मणास रुपये तेरा तेलाला बारा तुपा शपथा वाहिली ॥ गूळ असो तोळाभर आहे की मूळ मिठाची डली । खूळ लवंगा पैशाच्या सवंगा मिरची पांच दिधली ॥ हुजूर वाणी रुजू तराजू खजूरी ती एकली । खिजून घेती पैसा देतिल हो कैसा माखली नच जीभली ॥ गहूं म्हणति जे बहु सवंग ते नउ चिपटी जाहलीं । नवे मऊ जे दाणे बेदाणे झाले अशी दशा साहिली ॥ मका रांड ही आका इला परि शिका कोठडी केली । नको द्वाड एरंडी हे रंडी आठा चिपटी कधी ऐकिली ॥ दुकाळ त्यामधिं बकाळ मंडळी ठकापरिस ठक भली । दुकान घालुनी बसती वरी दिसती निर्मळ घातुकता वाइली ॥ नितळ सोनिया पितळ म्हणति निज पितळ पुतळि आटली । कुतळ बुडविले सारे ही वारे वेळची सराफाइला दिली ! सार हिर्याला गार म्हणति सोनार देत पावली । चार शेर तांब्याला का भ्यालां म्हणे कांसार देत आधेली ॥ पुरे काळ हा नुरे योग्यता विरे निघनि चाली । अहो शालुच्या फरदा चवलिचा खुरदा काय गोष्ट चांगली ॥(चाल)॥ हे राहो भाजीत बागवान जोडका ॥ पैशाचा एकचि मुळा एक दोडका । पैशास मक्याचा कंद एक मोडका । हा कांदा दो पैशांस एक बोडका ॥ जळणास रुपयाला एक लहान खोडका । घोडयास शिपाई काय करिल घोडका । काळाने देश यापरि केला रोडका । मग हत्याराचा उपाय काय थोडका । खाउनी नाबद म्हणों नये गोड कां ॥(चाल पहिली)॥ अजातरिपु हे प्रजा इतःपर मजा वृष्टि शिरकली ॥ दुजी आस न कविरायाची, कृति येथुनि उरकली ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP