TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ७२० ते ७२३

संसारताप - अभंग ७२० ते ७२३

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


संसारताप

७२०

पति जन्मला माझे उदरीं ।

मी जालें तयाचि नोवरी ॥१॥

पतिव्रता धर्म पाहाहो माझा ।

सर्वापरि पति भोंगिजे वोजा ॥२॥

निर्गुण पति आवडे मज आधीं माय ।

पाठीं झालीये भाज ॥३॥

मी मायराणी पतिव्रताशिरोमणि ।

ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी ॥४॥

७२१

तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवासिती

भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी ।

तंव ते नेणोनि उपदेशाची रीति

आना न उपदेशिती ।

ठकलें निश्चिती तैसें जालें ॥१॥

संत ते कोण संत ते कोण ।

हे जाणवि खुण केशवराजा ॥२॥

कोण्हीं एक प्राणी क्षुधेंने पिडिले ।

म्हणोनि दोडे तोडूं गेले ।

खावों बैसे तों नुसधि रुयी उडे ।

ठकले बापुडें तैसे झालें ॥३॥

कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला ।

स्नेहाळु देखिला बिबवा तो ।

तयाचें स्नेह लावितां अंगी ।

सुजला सर्वांगी तैसें जालें ॥४॥

कोण्ही एक प्राणी पीडिला झडीं ।

म्हणोनि गेला पैल तो झाडी ।

खा खात अस्वली उठली लवडसवडीं ।

नाक कान तोडी तैसें जालें ॥५॥

ऐशा सकळ कळा जाणसी ।

नंदरायाचा कुमर म्हणविसी ।

बापरखुमादेवीवर विठ्ठ्लीं भेटी ।

पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥

७२२

धर्म अर्थकाम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।

हस्त पाद शरीर व्यथा पंगु

जालों मी पुढारु ।

तिमिर आलें पुढें मायामोहो उदारु ।

तेणें मी जात होतों ।

मग सहज भेटला सदगुरु धर्म

जागो सदगुरु महिमा जेणें तुटें भवव्यथा ॥१॥

हाचि धर्म अर्थ काम येर तें

मी नेघे वृथा ॥२॥

एकनाम राम कृष्ण याचें दान

देई सदगुरु ।

वेदशास्त्र मंथनकेले परि

नव्हेचि पुढारु

शरण आलों निवृत्तिराया तोडी

माया संसारु ।

पाहतां इये त्रिभुवनी तुजहुनि

नाहीं उदारु ॥३॥

ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी

माझें पागुळ ।

शंख चक्र पद्म गदा तुष्टे

ऐंसा तूं दयाळ ।

बापरखमादोविवरें ।

दान देउनि केले अढळ ॥४॥

७२३

देवा तुज चुकलों गा ।

तेणें दृष्टि आलें

पडळ विषयग्रंथीं गुंतलोसे ।

तेणें होतसे विव्हळ ।

अंध मंद दृष्टि झाली ।

गिळूं पाहे हा काळ ।

अवचितें दैवयोगें ।

निवृत्ति भेटला कृपाळ ॥१॥

धर्म जागो निवृत्तिचा ।

तेणें फ़ेडिलें पडळ ।

ज्ञानाचा निजबोधु ।

विज्ञानरुप सकळ ॥२॥

तिहीं लोकीं विश्वरुप ।

दिव्य दृष्टी दिधली ।

द्वैत हें हरपलें

अद्वैतपणें माउली ।

उपदेशु निजब्रह्म ।

ज्ञानांजन साउली ।

चिद्रूप दीप पाहे ।

तेथें तनुमनु निवाली ॥३॥

दान हेंचि आम्हा गोड ।

देहीं दृष्टी मुराली ।

देह हें हरपलें ।

विदेह वृत्ति स्फ़ुरली ।

विज्ञान हें प्रगटलें ।

ज्ञेय ज्ञाता निमाली ।

दृश्य तें तदाकार ।

ममता तेथें बुडाली ॥४॥

प्रपंचु हा नाहीं जाणा ।

एकाकार वृत्ति जाली ।

मी माझे हारपलें ।

विषयांधया बोली ।

उपरती सदगुरु बोधु ।

तेथें प्रकृति संचली ।

धर्ममार्गे शुध्द पंथ हातीं

काठी दिधली ॥५॥

वेद मार्गे मुनी गेले त्याच

मार्गे चालिलों ।

न कळेचि विषयअंध म्हणोनी

उघड बोलिलों ।

चालतां धनुर्धरा ।

तरंगाकारी हरलों ।

ज्ञानदेवो निवृत्तिचा ।

द्वैत निसरलों ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-28T22:17:48.4200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

राजोबा-राजोबा दखणीः बुडी बेडी रखणीः

 • ( महानु.) राजेन्द्र्मुनि महानुभाव यांनी सिंधू नदींतून अटकेपार होतांना नाव बुडूं लागली त्या वेळेस ‘ चल लंडी होजा पार ’ असें म्हणून काठी जोरानें नावेवर मारली तेव्हां नाव पार झाली. यावरुन वरील म्हण पडली व अद्यापि लोक ही म्हण वापरुन नवस करतात. हे महात्मा महाराष्ट्रीय असून त्यांनी राजवल्लंभी नांवाची गीता हिन्दिदोहा चौपाईत लिहिली. तसेंच श्रीमद्भागवत दोहाचौपाईंत लिहिलें त्यांच्या हातची पोथी अमृतसर मठांत आहे. ( संवत् १६८० ) 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.