TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ४५४ ते ४५७

देवापाशीं मागणें - अभंग ४५४ ते ४५७

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


देवापाशीं मागणें

४५४

राज्यपद गाढा पदपाद नसतां ।

हरिनामीं बसतां सर्वपद ॥१॥

पदाभिमानु कांहीं तोही देहीं नाहीं ।

आला गेला ठायीं न संपडे दृष्टी ॥२॥

ब्रह्मानंद आशापाश तोडी ।

दाऊनी उघडी मूर्ती आम्हां ॥३॥

ज्ञानदेवीं सोहं मंत्राचे आवर्तन ।

मदमत्सरभान विरालें देहीं ॥४॥

४५५

होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे

तूं विठ्ठला होरे तूं गोपाळा ।

क्षेम देई रे वेल्हाळा ॥१॥

तुज पाहतां भुललीये चित्ता ।

काय करुं मी आतां येई पंढरीनाथा ॥२॥

पिसुणें परावीं मज काय करावीं ।

तुजची आठवी श्रीचरण दाखवी ॥३॥

तुजविण वेल्हाळा कें सुखसोहळा ।

रखुमादेविवरा विठ्ठला

शेजे नलगे डोळां ॥४॥

४५६

परतोन पाहासी न बोलसी आम्हासी ।

तुझीया रुपासी नांव नाहीं ॥१॥

सांगता नवल पाहतां बरवे

मायामृगजळ देखियलें ॥२॥

ज्ञानदेवो म्हणे उफ़राटिये दृष्टी ।

परतोनिया भेटी देई क्षेम ॥३॥

४५७

माझिये ह्रदयीं बुंथी ते डोळ्यां

सगुणप्रीति वाचे नाम संपत्ति

ऐसेंचि असो ।

म्हणौनि तुझें नाम आवडे हेंचि

प्रेम न विसंबे वर्म निजध्यास रया ॥१॥

श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी ।

हीच आवडी देई मना ॥२॥

तुझिये सगुण बुंथीचा वासु व्हावा

माझ्या ह्रदयीं ऐसा निज

सुखाचिया निजध्यासा ।

तुझिये आवडी अनुसंधान तुझिया

स्वरुपीं मन डोळा बैसो

कां ध्यान हेंचि रुप ।

हेंचि निज आवडी देईकां दातारा

चुकवी येरझारा गर्भवास ॥३॥

म्हणौनि रखुमादेविवरा विठ्ठला

उदारा भावें जोडलासि आम्हा ।

श्रुतिपुराणे वर्णिती नेति नेंति

तुझा महिमा ।

तुझें नाम रुप सुंदर हेंचि

निरंतर देई आम्हा सर्वोत्तमा रया ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-28T21:28:25.5400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

  • The 8th consonant. 
  • आठवें व्यंजन . वर्णविकास - याच्या चार अवस्था असून पहिली गिरनार शिलालेखांत , दुसरी इ . स . २ र्‍या शतकांतील नाशिकच्या शिलालेखांत ( यांतील ज इंग्रजी इ या अक्षरासारखा आहे ), तिसरी झाळपाटन येथील लेखांत ( इ . स . ६८९ ) व चौथी ११ व्या शतकांतील उज्जयिनी येथील लेखांत आढळते . - वि . ( संस्कृत शब्दापुढें जोडला असतां ) जन्मलेला ; उत्पन्न झालेला ; निघालेला इ० अर्थ होतात . जसें - अंडज , स्वेदज , जलज , पंकज , कफज इ० . , जचें - पुन . ( ल . ) जेवण ( जेवण शब्दांतील आद्याक्षरावरून ). 
  • a  Born, produced, sprung from. In comp. 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site