मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २५

वेदस्तुति - श्लोक २५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


जनिमसत: सतो मॄतिमुताऽऽत्मनि ये च भिदां विषनमृतं रमंत्युपदिशंतित आरुपितै: ॥
त्रिगुणमय: पुमानिति भिदा यदबोधकॄता त्वयि न तत: परत्र स भवेदवबोधरसे ॥२५॥ (१२)

॥ टीका ॥
श्रुति म्हणती भो भो ईशा ॥
याही एका हेतुविशेषा ॥
पाहती तुझीया ज्ञानप्रकाशा ॥
सुशक्य नोहे पावावया ॥११॥
ज्ञानोपदेष्टे सांवत ॥
भ्रम बाहुल्यास्तव झाले बहुत ॥
आपुलालें ते बोधिती मत ॥
म्हणति सिध्दान्त मुख्य हा ॥१२॥
नाहीं त्याचा जन्म वदती ॥
आहे त्यासी बोलती मृति ॥
न घडे तेंचि घडतें म्हणती ॥
भ्रमाक्तमति बहु वक्ते ॥१३॥
वास्तव आत्मस्वरुप एक ॥
भेदें कल्पिती अनेक ॥
एक अमर नर तिर्यक ॥
म्हणति सम्यक कर्मफ़ळ ॥१४॥
अवबोधरस तो निरामय ॥
त्या तुज म्हणति त्रिगुणमय ॥
अबोधास्तव भेदाखि ठाय ॥
करुनि अपाय दृढाविति ॥१५॥
ऎसीं पृथक् अनेक मतें ॥
आरोपित भ्रमभ्रान्तें ॥
उपदेशिति तद्वाक्यांतें ॥
विश्चासतां भ्रमवृध्दि ॥१६॥
वैशेषिक जो मतवादी ॥
नसत्या जगाची उत्पत्ति आदि ॥
आरोपित भ्रमबोधें प्रतिपादी ॥
श्रुतिविरोधी यास्तव  तो ॥१७॥
सदेव आदिमध्यान्तीं एक ॥
ऎसा श्रुतींचा मुख्य विवेक ॥
तेथ असज्जनांचा जननाड्‍क ॥
कैं कोठून म्हणावा ॥१८॥
पातंजलाचिया मतें ॥
पूर्वीं जीवांसी ब्रह्यत्व नव्हतें ॥
योगाभ्यासें साधिजे तें ॥
पंचभूतें प्राशूनी ॥१९॥
धातुवादाच्या साधनें ॥
जेंवि लोहाचें कीजे सोनें ॥
तेंवि जीवा ब्रह्य होणें ॥
योगाभ्यासें करुनिया ॥२०॥
ब्रह्यचि असोनि ब्रह्यप्राप्ति ॥
ऎसा सिद्वान्त बोले श्रुति ॥
अष्ट लोह ऎसिया उक्ति ॥
केली निवृत्ती कनकत्वा ॥२१॥
एकविंशति दु:खाअ नाश ॥
तयाचें नांव नि:श्रेयस ॥
ऎसा नैयायकांचा पक्ष ॥
प्रबोधी दक्ष बहुतर्फ़े ॥२२॥
अनीशया हें श्रुतींचें वचन ॥
करी तयाचें मत खंडन ॥
कैसें म्हणाल तरी व्याख्यान ॥
सावधान अवधारा ॥२३॥
अनीशा नामें जे अविद्या ॥
तिनें उत्पन्न केलें भेदा ॥
यास्तव अनेक दु:ख आपदा ॥
भोगिता खेदा पावती ॥२४॥
वास्तव अखंडैकरसीं ॥
तेथ दु:खाची गोष्टी कायसी ॥
भेद असतां दु:खनाशीं ॥
केंवि मोक्षासी पावणें ॥२५॥
सुषुप्तिगर्भीं सर्व दु:खा ॥
नाश झाला असतां देखा ॥
तथापि जीवां नोहे सुटिका ॥
मोक्ष लटिका कीं ना तो ॥२६॥
अविद्येमाजी विद्यमान ॥
मानिती आपण बुध्दिमान ॥
म्हणती वास्तवज्ञानसंपन्न ॥
जघन्यमान असतांही ॥२७॥
जघन्यमान म्हणिजे काई ॥
तरी जरामरणादिदु:खप्रवाहीं ॥
पडिलें असतां आपुले ठायीं ॥
मानिती मूढ मुक्तत्व ॥२८॥
अंधें अंध धरुनि हातीं ॥
नेइजेत असतां दुर्घट पथीं ॥
पतन पावती महागर्ती ॥
तैसीच मति भेदज्ञा ॥२९॥
तस्मात सांख्यभेदवादी ॥
जीवत्मभेदातें प्रतिपादी ॥
तया मता तें निषेधी ॥
श्रुति इत्यादि वाक्यार्थे ॥३०॥
इष्टानिष्ट मिश्रफ़ळ ॥
कर्मजनित हें केवळ ॥
सत्य मानिती कर्मशीळ ॥
मीमांसक मतवादी ॥३१॥
एकचि अद्वितीय ब्रह्य ॥
तेथ लोक लोकान्तर हा भ्रम ॥
तेथ कैचें फ़लद कर्म ॥
वॄथा श्रम श्रुति म्हणती ॥३२॥
स्वप्नामाजीं झाला राय ॥
वृथा डोळे झांकूनि काय ॥
शेखीं रंकत्व तों न जाय ॥
तोचि हा न्याय याज्ञिकां ॥३३॥
त्रिगुणमयत्व पुरुषासी येथे ॥
निर्धारितां वास्तव असतें ॥
तरी हें अवघेंचि घडों शकतें ॥
परि तें येथें अघटित पैं ॥३४॥
श्रुति म्हणती तुझ्या ठायीं ॥
भो जगदीशा भेदचि नाहीं ॥
अबोधास्तव कल्पिला पाहीं ॥
भ्रान्तिप्रवाहीं भ्रमग्रस्तीं ॥३५॥
त्रिगुणमय पुरुष येणें ॥
हेतु वैशिष्टें उपलक्षणें ॥
तुझ्या ठायीं भेदकल्पने ॥
अविद्यावरणें आवृत्तीं ॥३६॥
दृष्टीमाजील नीलिमा जेंवि ॥
गगनीं आरोपिजे प्राकॄतीं जीवीं ॥
त्वद्विषयिक हें अज्ञान तेंवी ॥
भेदें उपजवी त्रैगुण्य ॥३७॥
वस्तुता पाहतां तुझ्या ठायीं ॥
अबोधासी ठावचि नाहीं ॥
मां तो भेद कैंचा काई ॥
त्रिगुणात्मक तुज माजीं ॥३८॥
ज्ञानधन जो अवबोधरस ॥
तेथ भेदासी कैंचा पैस ॥
अध्यारोपें बहुधा भास ॥
मिथ्या आरोप वितर्क जो ॥३९॥
ननु ऎसी करुनि शंका ॥
श्रुति म्हणति भो विश्वात्मका ॥
असत्प्रपंच हा असिका ॥
म्हणाल लटिका जरी तुम्ही ॥४०॥
असत्यप्रपंच उपजत नाहीं ॥
तैसाचि त्रिगुणमय पुरुषही ॥
तरी याची प्रतीति नसावी कहीं ॥
ब्रह्यीं अद्वयीं कीं ना हो ॥४१॥
ऎसां वदतां जरी सिध्दान्त ॥
तरी प्रत्यक्ष दोन्ही असतां तेथ ॥
जग आणि जगन्नाथ ॥
कां पां अस्त न पावती हे ॥४२॥
इये शंकेच्या निरसना ॥
श्रीशुक योगियांचा राणा ॥
करी आर्ष श्रुति व्याख्याना ॥
त्या सनंदनवचना अवधारा ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP