मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३२ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३२ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३२ Translation - भाषांतर नृषु तव मायया भ्रमममीष्ववगत्य भृशं त्वयि सुधियो भवे दधति भाव मनुप्रभवम् ॥कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटि: सृजति भुहुस्त्रिणेमिरभवच्छरणेषु भयम् ॥३२॥ (१९)॥ टीका ॥यया समस्त जीवांच्या ठायीं ॥तुझिये मायेस्तव हें पाहीं ॥भ्रमचत्र्क भ्रमतें सर्वदा ही ॥जाणोनि ह्रदयीं धीमंतीं ॥३०॥भवनिवर्तक जो तूं अभव ॥त्या तुझ्या ठायीं दृढ सभ्दाव ॥धरिती आणि मायाप्रभव ॥मिथ्या माव निस्तरती ॥३१॥नित्य नूतन जन्ममरण ॥भ्रमचत्र्काच्या ठायीं जाण ॥तयापासून तव पद शरण ॥निर्भय पूर्ण निर्मुक्त ॥३२॥तुझ्या ठायीं ज्यां अनुवृत्ति ॥भयभय कैंचें तयां प्रति ॥तरी तें कोणासि म्हणतां श्रुति ॥प्रतिपादिती तें ऎका ॥३२॥ज्यास्तव तुझें भ्रभंगरुप ॥त्रिकाळ चत्र्कमय काळसर्प ॥शीतोष्ण वर्षादि अभेदकल्प ॥गणना अनल्प शब्दांची ॥३४॥तव पद शरणा न वांछिती ॥हें काळचक्र तयांप्रति ॥जन्ममरणांच्या दु:खावर्ती ॥भवभय प्राप्ति करीतसे ॥३५॥अतएव ऎसें काळचत्र्क ॥संसाररुपी महाक्रुर ॥त्याचे निवृत्तीस्तव सुधीर ॥होती दृढतर तव भजनीं ॥३६॥सुधी म्हणिजे बुध्दिमंत ॥तुझ्या ठायीं सभ्दावयुक्त ॥होवोनि दुस्तर भवावर्त ॥निस्तरती हें श्रुति बोधी ॥३७॥तो चि भगवच्चरणीं भावो ॥मनो नियमावांचूनि वावो ॥मानसनियमें दृढसभ्दावो ॥करी रोहो हरिभजनीं ॥३८॥सद्गुरुसी न वचतां शरण ॥सहसा नोहे मनोनिग्रहण ॥यालागीं कीजे गुरुपसदन ॥लाहिजे विज्ञान तत्कॄपया ॥३९॥जो तापला तापत्रयें ॥शत्रुषट्काच्या कुठारघायें ॥त्रासला तेणें ह्रदयीं भय ॥धरुनि अभय वांछितसे ॥४०॥भवदु:खाच्या आहळणी ॥आहळला म्हणे त्राता कोणी ॥भेटोनि पुढती जन्ममरणीं ॥पडों नेदी सर्वथा ॥४१॥ऎसा सचिंत सर्व काळीं ॥संसारभयाची काजळी ॥नित्य जागवी ह्रदयकमळीं ॥विषयमेळीं सुख न मनी ॥४२॥एवं तापत्रयसंतप्त ॥इहामुत्रीं पूर्ण विरक्त ॥सद्गगुरुप्रति शरणागत ॥रिघे त्वरित तो पुरुष ॥४३॥समित्प्रसूनोपचारपाणी ॥करुणास्वरें आर्तवाणी ॥दृष्टि ठेवूनि सद्गुरु चरणीं ॥नम्रमूर्ध्नि होत्साता ॥४४॥सद्गुरु क्षोत्रिय श्रुतिसंपन्न ॥तदुदित यथोक्त कर्माचरण ॥ब्रह्यनिष्ठ प्रबोधनप्रवीण ॥नित्य निमग्न स्वानंदी ॥४५॥ऎसिया सद्गुरुप्रति तो शिष्य ॥शरण रिघोनि करी दास्य ॥अंवचकभावें निमिषोन्मेष ॥कृपाकटाक्ष लक्षूनी ॥४६॥येचि अर्थी अनेक श्रुति ॥गुरुपसदन प्रतिपदिती । आचार्यवंतां पुरुषांप्रती ॥ब्रह्यप्रतीति सुलभत्वें ॥४७॥इत्यादि श्रुतिवाक्यांच्या ठायीं ॥दृढ विश्चास धरुनि पाहीं ॥गुरुभक्तिची बुध्दि कांहीं ॥कुतर्कें चंचल न करावी ॥४८॥सुष्ठुज्ञानसंपन्न पुरुष ॥आचार्यमुखेंचि ब्रह्योपदेश ॥प्रियतम मानूनि स्वानुभवास ॥लाहे नि:शेष भेदलयें ॥४९॥ऎशा अनेक बलिष्ठ श्रुती ॥गुरुभजनातें प्रबोधिती ॥शुक नृपातें येचि अर्थी ॥बोले सुमति तें ऐका ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP