मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
११ ते १५

स्फ़ुट पदें व अभंग - ११ ते १५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


११ अभंग
भाळ्याभोळ्यां* जनां उपाय हा सोपा ॥
मन्यथाच्या बापा शरण जावें ॥१॥
सर्वस्वें आपुला भार त्याचेव माथां ॥
घालोनियां वेथा वोसरावी ॥२॥
अंहतेचा नाश सर्वस्वें करावा ॥
कॄष्ण वोळखावा सर्वा ठाईं ॥३॥
जें जें जैसें घडे संतोशसांकडे ॥
तें तें तयाकडे समर्पावें ॥४॥
असत्य दांभिक सांडावी कामनाअ ॥
निंदोद्वेष मना नातळावे ॥५॥
पोटाप्रावरणाची चिंता नाठवावी ॥
प्रारब्धाचे गांवीं सर्व आहे ॥६॥
भोगावें सर्वहि प्रारब्धाचें फ़ळ ॥
करावें अढळ अंतरासी ॥७॥
वैराग्याच्या बळें असावें उदास ॥
कोण्या वैभवास भुलों नये ॥८॥
स्वधर्मीं वर्ततां लज्जा ओसरावी ॥
अधर्मी धरावी लज्जा थोर ॥९॥
सर्वा ठायीं घ्यावें नाम गोविंदाचें ॥
अंतरीं घरावें विरक्तीसी ॥१०॥
दयार्णबाजी जातां याचि वाटे ॥
अकस्मात् भेटे स्वानंदासी ॥११॥

१२ अभंग
श्रीहरिवांचूनी नाहीं दुजा कोण्ही ॥
शत्रुमित्र दोन्ही आत्माराम ॥१॥
माझीं माता पिता इष्ट मित्र माझे ॥
नको ऐसें वोझें वाहों माथां ॥२॥
माता तात भ्राता स्त्री पुत्र सोयरे ॥
न पाहें दूसरें देवाविणें ॥३॥
स्त्रीपुत्रादि यांचा सर्व नाश झाला ॥
तरी तो संचला देव राहे ॥४॥
निश्चयें देवासीं सर्वस्वें भावितां ॥
हर्ष शोक वार्ता बाधूं नेणे ॥५॥
उंच नीच सर्व पवित्रापवित्र ॥
संचला सर्वत्र जनार्दन ॥६॥
विश्व होतें जातें जयाचिया सत्ता ॥
तोचि चालविता प्रपंचासी ॥७॥
त्यामाजि आपण स्वयें तोचि आहे ॥
वेगळा न राहे भेदनाशें ॥८॥
ऐसें वोझें घालीं गोविंदाचे माथां ॥
त्यामाजि अहंता लीन करीं ॥९॥
आत्मशोध करीं सद्‍गुरुच्या घरीं ॥
आत्मानात्म परी कैसी पाहें ॥१०॥
दयार्णवीं पूर्ण ऐसें अनुभवितां ॥
लाभे तन्मयता आपेंआप ॥११॥

१३ पद
चिन्मय कां न मने ॥
भुलसी नयनें कानमनें ॥धॄ०॥
भूलविलें तुज देहपणेंचि ॥
तें त्याजतां निज ते आपणचि ॥१॥
ध्यान मना विषयांच्च घरी रे ॥
ब्रह्य तयांत तयाच वरी रे ॥२॥
हातवटी  गुरु हे जंव दावी ॥
तंबवरि शाब्दिक लाज वदावी ॥३॥
दॄष्टि फ़िराउनि नयन निरीक्षी ॥
मायिक दृश्य मॄषा न निरीक्षी ॥४॥
ब्रह्यउपाधिक दान तजावा ॥
अनहतप्रत्यय नांदत जावा ॥५॥
पालटिती मन उन्मनभावे ॥
कृष्णदयार्णय पूर्ण स्वभावे ॥६॥

१४ अभंग
स्थूळ दॄष्टि दिसे दृश्य तया नांव । कल्पना सावेव मना दिसे ॥१॥
मनबुध्दिपर तोचि परमेश्वर ॥
अविद्या अंधारें सुषुप्ति ते ॥२॥
सबाह्य अंतरिं येक अनुभव ॥
जाण तया नांव तुर्या देवी ॥३॥
सुषुप्ति-परियें बिंबे जीवभाव ॥
प्रत्यगात्मा जाण तुर्येमाजि ॥४॥
साक्षित्वाच्या त्यागें आत्मा निर्विकारु ॥
दयार्णयी सार उन्मनी ते ॥५॥

१५ अभंग
पवनाहुनि चपळ तयासि अकळ ॥
तें एक निर्मळ तेजोमय ॥१॥
तेजाचें निजतेज श्रुतिपरतें गुज ॥
ब्रह्यांडाचें बीज अबीज तें ॥२॥
सूर्याच्या लोचनीं दिसेना पाहतां ॥
त्यामाजि राहतां तेंचि होणें ॥३॥
जिव्हावरुण गोडी नेणती तयाची ॥
रुची आनंदाची रसनेवीण ॥४॥
गंधेविण वास सुरतेंविण तोष ॥
त्वचेविण स्पर्श आलिंगनीं ॥५॥
लोहातें ग्रासुनी अग्निकुंडीं जैसा ॥
देहीं लोपें तैसा देहभाव ॥६॥
कॄष्णदयार्णवीं पूर्णता नाठवे ॥
नाठव सांठवे आठवांत ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP