मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४६

वेदस्तुति - श्लोक ४६

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ नारद उवाच ॥
नमस्तस्मै भगवते कॄष्णामायामलकीर्तये ॥
यो धत्ते सर्वभूतानामयवायोशती: कला: ॥४६॥

॥ टीका ॥
यश लक्ष्मी आणि औदार्य ॥
ज्ञान वैराग्य आणि ऎश्वर्य ॥
हे साही अक्षय गुणवर्य ॥
असती सकार्य जयातें ॥८१॥
त्या भगवंता कॄष्णाकारणें ॥
नमन माझें अनन्यपणें ॥
ज्याचे अमळकीर्तिश्रवणपठणें ॥
दोषा क्षाळणें जगाचिया ॥८२॥
जेंवि कॄशानीं इन्धनें समळ ॥
घालितां निरंतर पुष्कळ ॥
त्यांसि जाळूनि स्वयें निर्मळ ॥
तेंवि प्रात्र्जळ जयाची ॥८३॥
म्हणसी नारायणा नमितां येथ ॥
बदला कॄष्णनामसंकेत ॥
तरी ऎकें येथींचा भावार्थ ॥
जो असे निश्चित वास्तव ॥८४॥
कॄष शब्द हा भूसत्तावाचक ॥
नकार आनंदप्रतिपादक ॥
एवं सदानंदरुपी निष्टंक ॥
परब्रह्य सम्यक श्रीकॄष्ण ॥८५॥
नारायणादि जे अवतार ॥
ते जयांचे अंशपर ॥
तो पूर्ण हें वदे पुराणनिकर ॥
जें कॄष्णस्तु भगवान्स्वयम् ॥८६॥
सर्व भूतांच्या अभवास्तव ॥
नाना रुपें धरी वास्तव ॥
हाचि स्पष्ट अभिप्राव ॥
ऎका स्वयमेव विवरणें ॥८७॥
अविद्यायोगें जीव नाना ॥
वरपडे जाले जन्ममरणा ॥
पावूनि त्रिगुणात्मकबंधना ॥
क्लेशें यातना भोगिती ॥८८॥
तयांचिये दु:खनिवॄत्ति ॥
चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ति ॥
यांसी करावया करुणा मूर्ति ॥
जो धरी व्यक्ति सुन्दर ॥८९॥
जयाच्या दर्शनें चिन्तनें ध्यानें ॥
स्मरणें गुणकीर्तिवर्णनें ॥
मोक्षावाप्ति जीवांकारणें ॥
ऎसें करणें जयाचें ॥९०॥
तो श्रीकॄष्ण पूर्णब्रह्य ॥
अवतारांचें मूळधाम ॥
योगियांचा निष्काम काम ॥
अभिन्न परम सर्वात्मा ॥९१॥
तया कॄष्णावतारतेकरुन ॥
नारायणातें करी नमन ॥
ज्यास्तव झाला प्रबोधनिपुण ॥
सच्चिध्दन पूर्णत्वें ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP