TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
४१ ते ४५

स्फ़ुट पदें व अभंग - ४१ ते ४५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


स्फ़ुट पदें व अभंग - ४१ ते ४५
४१ श्लोक (वंसततिलका)
कांहीं वदेल रसना गुण शामळाचे छेदावया सकळ कंद मनोमळाचे । जो चिंतनें करुनि कल्मष संहरी तो या भावना रसवती स्तविते हरी तो ॥१॥
ज्याचें स्वभाविक सुतास्तव नाम वाचे घेतां अजामिळ पुरीं बुडतां भवाचे । तारी शुकास्तव अमंगळ पापराशी केली अखंड तिसे विष्णुपुरीं मिराशी ॥२॥
जो कां मदोन्मत जळीं भिडतां रिपूसी गेले बहू दिवस विव्हळता वपूसी । होतां पशू मग धरी अनुताप देहीं घाली उडी स्मरत त्यासि करी विदेही ॥३॥
ज्याला पिता छळित पर्वतपात केला शस्त्रें गजानळजळें विषघात केला । नामें तया सकळही करि नाश वेथा तो दे सिंहानन रिपूहरिणास वेथा ॥४॥
भस्मासुरें शिववधू अभिलाषितां ते चित्ती स्मरे मग महेश्वरयोषिता ते । तेव्हां वधूरुप नटें हरि दुर्जनाच्या घाता करुनि सुख दे जिवना जनाच्या ॥५॥
शुत्र्कात्मजासुतकुळीं अवतार केला षट्‍पंचकोटिगण वेष्टित द्वारकेला । नांदे परंतु हरि संकट पांडवांचे हें भारतीं कथित व्यास उदंड वाचे ॥६॥
जो शापिला नॄगमहीवर गोप्रदानीं तो अंधकूप वसवी द्विज शापदानीं ॥
त्याचें हरी सरडदेह त्वरें कॄपाळू यालागिं जो स्तविति सर्वहि लोकपाळू ॥७॥
जे पूतना जननिची भगिनी वधाया आली स्तनीं भरुनि जे विष दुष्ट धाया । शोखी, जिवें परि हरी नरका न ने तो सायुज्य दे न वदवे मज आननें तो ॥८॥
कंसें पिताजननि बंधन बंदिशाळे केलें तया निवटिलें जनितां इसाळें । नेदी अनंत परि रौरव त्या रिपूतें सायुज्य दे कळिमळें हरि का रिपू ते ॥९॥
जाळंदरें सुरपदास्तव शंकरेंसी केलें रणीं कदन थोर भयंकरेंसी । कांताभिलाषित तदा वनिता शिवाची पादांबुजें ह्नदर्यि चिंतित केशवाची ॥१०॥
तैं धावण्या शिववधूस्तव धांवलासी कापट्य शत्रुवनिता छळिली विलासीं । ते देहदाह करितां समरीं निमाला तीचा पती मग हरा जयमान झाला ॥११॥
घालूनि संकट बळी छळितां कॄपाळू झाला तयासदनिं आपण द्वारपाळू । नाना अनर्थ रिपुचे ह्नदयीं धरीना तो कें समर्थ भजतां मज उध्दरीना ॥१२॥
लत्ता ह्नदीं प्रहरि विप्र सुषुप्ति काळीं अक्रोधता द्विजपदांकित चिन्ह पाळी । जाला वधू मग विरोचन संहरीला । निद्वद्वता जननमॄत्यु तया हरीला ॥१३॥
ऐसा अनाथ जन उध्दरितां शिणेना भावेंचि पावत असे परि त्यासि नेणा । कांहीं न वेंचत करी स्मरतां कुढावा यालागिं तो वदनिं सर्वजनीं पढावा ॥१४॥
गोविंदजी सदय नासुनियां भवातें दे शत्रुमित्र समता निजवैभवातें । कायामनें शरण त्या वचनें रिघा तो तारी दयार्णव सुखें नरसिंह गातो ॥१५॥

४२ मांत्रिक गुरुवर्णन, श्लोक (शार्दूलविक्रीडित)
नाना चावट चाट थोंट कपटी खोटे कुडे पावडे गर्वी मंदमती हठी कुटिलता सद्‍बुद्धि ज्यां नावडे ॥
कष्टें अष्टहि याम दुष्ट भजनें जे *स्पष्तता कोरडे ऐसा सद्‍गुरु जो म्हणेल कुमती दु:खें सदा तो रडे ॥१॥
नाना कर्म विकर्म कर्म करितां तें कर्म बांधे गळां कर्मीं वर्तन कर्मत्याग करितां कर्मिष्ठ तो आगळा ॥
कर्मातीत अलिप्त कर्म न करी आत्मा पहा वेगळा कैसा लिप्त अलिप्त अक्षरमसी श्लोकार्थ एकागळा ॥२॥
कर्में जारणमारणें, प्रसरणें, उच्चाटणें, स्तंभणें नाना मोहनवश्यकर्ण करणें भेदादि आरंभणें ॥
घातू भाटक हाटकादि करणें संतोषणें क्षोमणें या कर्मीं पद अक्षरासि चुकतां दु:खाप्रती लाभणें ॥३॥
नाना चेतकचाळकां अरि ठकायाकारणें साधिती झोटिंगादिपिशाचयक्षजखिणी वेताळ आराधिती ॥
मांतगी महिषां श्मशाअवनीं बाळंतिणी रोधिती तेथें अक्षर चूकतां मग पुढें वांचोनि कें बोधिती ॥४॥
विंचूसर्पबिडालउंदिरविषें मंत्रें जगा नाशिती धाराबंधन, शस्त्रबंधन अपभ्रंशादि अभ्यासिती ॥
पक्षी श्वापद काननादिक सिमा बांधोनि आकर्षिती मंत्रा सिध्दि घडे विलंब न घडे तेव्हां मनीं हर्षती ॥५॥
ज्या कर्मीं रत होत ज्या निधन ये तो तेंचि पावे खरें मातीचा रज संगती रुचिस ये जेव्हां मिळे साखरें ॥
नाना वॄश्चिकपुच्छसंगमगतीए पाषाण मारी जना तैसा संग दयार्णवीं निरखिजे सांगे जना सज्जना ॥६॥
दंभा लागुनि कर्म केवळ करी संयुक्त अभ्यंरीं बुध्दिनें आदरी जनांत पसरी कीर्तिसि नानापरी ॥
भक्तीची उजरी विरक्ति न धरी आशा महंतीवरे दंभें कर्म करी विचार न करी संतां जना धिक्करी ॥७॥
येकां थोर दुज्यां लघुत्व दिसतें तें कर्म दांभीक हो ॥
एका सत्य दुज्या असत्य म्हणतां तैसेंचि तें एक हो ॥
एका पूज्य दुज्या अपूज्य म्हणतां नोहेचि हे साम्यता ॥
दंभें कर्म दयार्णवी न सरतें ज्ञानीं नसे गम्यता ॥८॥

४३ श्लोक (शार्दूलविक्रीडित)
श्रध्दापूर्वक सर्व कर्म आचरे संकल्प ब्रह्यार्पणें ॥
सच्छास्त्रश्रवणानुसार विचरे विप्रादिसंतर्पणें ॥
शोधी तत्त्वविचारसार सहसा निर्लोभता अंतरीं ॥
नित्यानित्य दयार्णवी विवरितां शिक्षीत अभ्यंतरीं ॥१॥
मुक्तें कर्म करुनियां न करणें सांगों तयाची गती ॥
श्रीगीताख्यमिषें धनंजयहिता श्रीकॄष्ण जें सांगती ॥
जेथें शब्द विरोनि जाणिव नुरे मुक्तांसि तें साधिजे ॥
तेथें अक्षर चूकलें विवळलें कोणाप्रती बोधिजे ॥२॥
देहाचें सुखदु:ख जो विसरतां वर्तोनि कमीं रिता ॥
आंणदें भरता भरोनि विरता नेणे तयाच्या रता ॥
दृश्या नावरता परेसि परता मूर्खाजना तारिता ॥
गोविंदीं सरता दयार्णवपणें पूर्णत्व निर्धारिता ॥३॥

४४ श्लोक (स्वागता)
मुक्त त्यासि न लगेचि म्हणावें । वर्ततां सगुणताचि दुणावे ॥
देहबुध्दिवरि धांव मनाची । मानिती लहरि ते वमनाची ॥४॥
बध्द मुक्त गमती सम जाणा । तेथ सूक्ष्म रिति हे समजाना ॥
बध्दकर्म करितांच शिरीं घे । मुक्त मीपण धरुं चि न रीघे ॥५॥
ज्ञप्तिमात्र अवघी सम जाली । व्यक्तिभेद-सुचनाच बुजाली ॥
नाचरोनि गमतो चर साचा । तो दयार्णव अवाच्य रसाला ॥६॥
जैसा दुजा लेप नभा न लागे । तैसें मना आन न भान लागे ॥
त्याला समाचीए गरिमा वदावी । तैसें नसे तो वरि माव दावी ॥७॥
शीतोष्णवारा तपनां धरा हे । साहे तसा निश्चिळ साध राहे ॥
मानापमानां सरिसाच मानी । तो योग्यता बल्लभसाच मानी ॥८॥
मत्स्या सलीलाविण जीव नाहीं । अन्नविणें प्राण* सजीव नाहीं ॥
तैसें जया प्रेम दयार्णवाचे । नि:सीमता भक्तिविना न वाचे ॥९॥

४५ श्लोक (इंद्रवज्रा)
सांडूनियां मन्मथ संगतीचा । नाडी वधू यास्तव संग तीचा ॥
टाकूनियां सज्जनसंगमें रे । प्रेमें रमेच्या रमणीं रमें रे ॥१॥
मातापिताकामिनिकांचनाचें । लोलिप्य देहास्तव हें मनाचें नैश्वर्य ॥
देहा न भुलें भ्रम रे । प्रेमें रमेच्या०॥२॥
कामादिकां षष्ठहि दुर्जनांसी । घालूनियां दुर्धर तर्जनासी ॥
सर्वेंद्रियां आकळिजे दमें रे । प्रेमें रमेच्या०॥३॥
शब्दादि पांचै जन इंद्रियांचें । हें वालभें मूळ हरीं तयांचें ॥
क्षणक्षणा साधि तयां शमेंरे । प्रेमें रमेच्या०॥४॥
आशा समूळीं मनिंची निवारीं । नासेल तेव्हां भवगांगवारी ॥
येशील तैं ऊपमे रे । प्रेमें रमेच्या०॥५॥
मोहांधकाराप्रति नाश जाला । मित्रारि हा भेद पुरा बुजाला ॥
तैं विश्व मी हे समता गमे रे । प्रेमें रमेच्या०॥६॥
कां कांपसी दुर्गम भीत लंडी । निर्द्वन्द्वता शोक भया उलंडीं ॥
तैं पाय हे वंदिजती यमें रे । प्रेमें रमेच्या०॥७॥
सांडूनियां भेदक संग सारा । मांडू नको मायिक हा पसारा ॥
दयार्णवी अंतर विश्रमें रे । प्रेमें रमेच्या०॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-23T02:50:04.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

semi annually

 • अर्धवार्षिक पद्धतीने 
RANDOM WORD

Did you know?

नेहमी ’गुणक्षोभिन” ऐकण्यात येते, काय अर्थ असावा?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.