मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १८ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १८ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १८ Translation - भाषांतर उदरमुपासते य ॠषिवर्त्मसु कूर्पदृश: परिसरपद्धतिं ह्नदयमारुणयोदहरम् ॥तत उदगादनंत तव धाम शिर: परमं पुनरिय यात्समेत्य न पंतति कॄतांतमुखे ॥१८॥ (५)॥ टीका ॥कूर्पदृश जे शार्कराक्ष ॥ऋषिमार्गीं ते धरुनि लक्ष ॥कैवल्यलाभास्तव प्रत्यक्ष ॥उदरं ब्रह्योति उपासिती ॥९३॥ॠषींचिया संप्रदायमार्गें ॥शार्कराक्ष निजाधिकारविभागें ॥उदर उपासिती निजाडें ॥कोण्या लिड्गें तें ऎका ॥९४॥कूर्प म्हणिजे सिकतारज ॥ज्यांचे दृष्टीसी वर्ते सहज ॥शार्कराक्ष नामें त्यांतें बुझ ॥स्थूळदृष्टी भवभजक ॥९५॥हुदयाहूनि स्थूळ उदर ॥तदूपासनीं जें सादर ॥म्हणाल कोण देवतापर ॥उपासनासार पैं त्यांचें ॥९६॥उदरनिष्ठ जो जठराग्नि ॥अग्नि देवांचा विष्णु म्हणोनि ॥प्रतिपाद्य श्रुतिस्मृतींच्या वचनीं ॥मणिपूरस्थ उपासिती ॥९७॥अहं वैश्वानरो भूरवा ॥ऎसा स्मॄत्यर्थ जाणावा ॥यदर्थीं श्रुतींचा यावा ॥भाषाग्रंथिं न ये लिहितां ॥९८॥येचि स्मृतीचें व्याख्यान ॥मधुसूदनी टीकेवरुन ॥पाहतां श्रुत्यर्थ विवरण ॥विध्दज्जनीं विलोकिजे ॥९९॥तस्मात् जाठर वैश्वानर ॥प्रत्यक्ष होऊनि परमेश्वर ॥प्राणिमात्रांचें वसवी उदर ॥हा निर्धार श्रुतिस्मृतींचा ॥३००॥जाणोनि केवळ कूर्पदृश ॥जे म्हणिजेति शार्कराक्ष ॥स्थूळदृष्टि रजाक्त अक्ष ॥त्यांचें लक्ष हें कथिलें ॥१॥आरुणिसंप्रदायत्र्कम ॥प्राचीन ऋषींचें अधिष्ठूनि वर्त्म ॥कूर्प म्हणिजे परम सूक्ष्म ॥दृष्टी परमात्मपर ज्यांच्या ॥२॥ह्रदयस्थ जें परमात्मतत्त्व ॥लक्षूनि तत्प्राप्ती उपाव ॥उदरोपासनेचा भाव ॥धरिती स्वयमेव तल्लामा ॥३॥शार्कराक्षांची कथिली कथा ॥यावरी ऎका अरुणिपथा ॥साक्षात्परमात्मया ह्रदयस्था ॥सूक्ष्मातेंचि उपासिती ॥४॥ह्रदयस्थ सूक्ष्म म्हणाल कैसा ॥किरणवेष्टित भास्कर जैसा ॥परिसरनाडींचिया प्रकाशा ॥माजी आपैसा द्योतक जो ॥५॥तया ह्रदयस्था परम सूक्ष्मा- ॥माजी लक्षूनियां परमात्मा ॥उपासिती पूर्णकामा ॥वास्तव तध्दामा ठाकावया ॥६॥हुदयरविन्दाभवंती घरटी ॥शतैकनाडी कर्णिकापिठीं ॥किरण जैसै भास्करा निकटीं ॥तत्परिपाठीं देदीप्य ॥७॥तयां मध्यग जे कां दहरी ॥तन्वी नीवारशूकापरी ॥तेज:पुत्र्ज तयेच्या अग्रीं ॥पीता भास्वती अणूपम ॥८॥ब्रह्या विष्णु शिव केवळ ॥स्वाराट् तोचि अखंडळ ॥ऎसा महिमा श्रुतींचा मेळ ॥वर्णिती बहळ व्याख्यानीं ॥९॥मूळाधारापासूनि दहरी ॥व्यापक तत्प्रभा सर्व शरीरीं ॥ह्रदयापासूनि मूर्ध्नीवरी ॥सुषुन्नामार्गें उर्ध्वग पैं ॥१०॥त्यावरी सुषुन्नावर्त्म अधिष्टून ॥जे ठाकिती मूर्ध्निस्थान ॥भो अनंता ते तुजमाजीं पूर्ण ॥समरसोन विराजती ॥११॥उत्कॄष्ट जें कां तुझें धाम ॥तें ते पावूनि मुनिसत्तम ॥टाकिती संपूर्ण संसारश्रम ॥उत्तमोत्तम सुख लाभे ॥१२॥पुढती संसार जो कृतान्त ॥सहसा तन्मुखीं न होती पतित ॥ऎसा श्रुतींचा सिध्दांत ॥शुक बोधित कुरुवर्या ॥१३॥श्रुती म्हणतो भो परेशा ॥झणें तूं म्हणसी जीवांसरिसा ॥मी ईश्वरही अनुप्रवेशा ॥पावोनि निवासा पवितसें ॥१४॥अपरनाडीमागें जाती ॥त्यांची न चुके पुनरावृत्ती ॥तेथ पुढती शंका करिती ॥ते तूं नृपती अवधारीं ॥१५॥उदर ह्रदय मूर्ध्निस्थान ॥उत्तरोत्तर न्यून पूर्ण ॥ईश्वरासहि जीवासमान ॥तारतम्यें असतां पैं ॥१६॥तरी मग कोण्या विशेषणें ॥उपास्यता ईश्वराकारणें ॥किमर्थ जीवीं ईश्वरा भजणें ॥सामान्यपणें तारतम्यें ॥१७॥ऎसिया शंकेच्या परिहारा ॥श्रुति म्हणती परमेश्वरा ॥यदर्थी सहसा शंका न करा ॥ऎका उत्तरा भो स्वामी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP