मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २८ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २८ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २८ Translation - भाषांतर त्वमकरण: खराडखिलकारकशक्तिधरस्तव बलीमुद्रहंति समदंत्यजयाऽऽनिमिषा: ॥वर्षभुजोऽखिलक्षितिपतेरिव विश्चसृजो विदधति यत्र ये त्वधिकॄता भवतश्चकिता: ॥२८॥ (१५)॥ टीका ॥इन्दियसंबंधरहित असतां ॥सकळ इन्द्रियांचा शक्तिधर्ता ॥इन्द्रियशक्ति प्रवर्तविता ॥स्वर्यें स्वसत्ता अतीन्द्रियें ॥८९॥यदर्थी दृष्टान्त बदला शुक ॥श्रोतीं परिसजे तो सम्यक ॥जेणें संशय नुधवी मुख ॥उमजे विवेक साकल्यें ॥९०॥स्वप्रकाशें देदीप्यमान ॥यालागीं स्वराट् तुझें अभिधान ॥अतिन्द्रिय तुझें ज्ञान ॥नोहे कारण सापेक्ष ॥९१॥ऎसा समर्थ जाणोनि तुज ॥पूजा अर्पीं देवतपुत्र्ज ॥अविद्या संवृत्त असतां सहज ॥भजती भोज नाचोनी ॥९२॥अनिमिष म्हणिजे इन्द्रादि देव ॥तुज भजती हें न अपूर्व ॥त्यांसी ही पूज्य जे ब्रह्यादि शर्व ॥ते भजती सर्व सभ्दाबें ॥९३॥जैसे नॄपाचे किड्कर ॥स्त्रियांसहित सेवनपर ॥तैसे अविद्यासंवृत ही सुरवर ॥भजती किंकर होत्साते ॥९४॥ऎसी पुराणान्तरींची बोली ॥येथ श्रोतयां जाणविली ॥यावरी सुरांची भजनचाली ॥ते ही कथिली जात असे ॥९५॥मनुष्यें अर्पिती हव्यकव्य ॥देवपितरें तें भक्षिती सर्व ॥जैसे वर्षपति पार्थिव ॥प्रजागौरब स्वीकारिती ॥९६॥भरतवर्षादिवर्षति ॥ते मग सेविती चत्र्कवर्ती ॥स्वप्रजादत्त ज्या संपत्ति ॥त्या त्या अर्पिती तच्चरणीं ॥९७॥आणि जे जे कार्थी जे नियुक्त ॥ते ते करिती अतंद्रित ॥अंभग आज्ञा पाळिती नित्य ॥पूजा समस्त हे त्यांची ॥९८॥कां पां आज्ञा धरिती शिरीं ॥ऎसें परिसा म्हणसी जरी ॥तरी चकित म्हणिजे भय अन्तरीं ॥तुझे निर्धारीं बागविती ॥९९॥यदर्थी ऎका श्रुतिसंकेत ॥भयें परिमित वाहे वात ॥भयें सूर्य उदया येत ॥अति नियमस्थ ॠतुमानें ॥६००॥भयें नियमित पावक जाळीं ॥वडवाग्नी बसे सिन्धुजळीं ॥भयें इन्द्र यथाकाळीं ॥वर्षे भूतळी परिमित पैं ॥१॥भयें मॄत्यु भूतग्रासा ॥करी नियमित आज्ञेसरिसा ॥एवं तव आज्ञा परेशा ॥वाहती शिरसा अमराद्य ॥२॥तस्मात् करणप्रवर्तक तूं ईश्वर ॥करणपरतंत्र प्राकृत नर ॥म्हणोनि तुज भजती सादर ॥हा निर्धार श्रुत्युक्त ॥३॥इतुकेंचि भजनासी कारण ॥केवळ नव्हे श्रुतिप्रमाण ॥तुजचि पासूनि उत्पन्न ॥तव तंत्र जाण यास्तव ही ॥४॥जैसे अग्नीचे स्फ़ुलिंग ॥उर्ध्व उसळती लघु सवेग ॥त्यांसी अग्नीचा वियोग ॥म्हणणें चांग न भसे हें ॥५॥जरी अंशत्वें वेगळे झाले ॥तरी अग्नीत्वा न मुकलें ॥अग्नितेजें तेजाथिलें ॥म्हणोनि बोलिले तत्तंत्र ॥६॥तैसे तुज आत्मायापासून ॥विस्तारती अनेक प्राण ॥ते सर्वहि तदंश जाण ॥भासतां भिन्न तव तंत्र ॥७॥सर्व लोक सर्व देव ॥सर्व भूतें सर्व जीव ॥आत्मयापासूनि यां उद्धव ॥तस्मात् सर्व तव तंत्र ॥८॥मजपासूनि कैं यां जन्म ॥कैं लाधलें रुपनाम ॥म्हणसी तरी तो अनुक्रम ॥ऐकें निजात्मवत्सला ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP