मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३४ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३४ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३४ Translation - भाषांतर स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैस्त्वयि सति किं नृणां श्रयत आत्मनि सर्वरसे ॥इति सदजानतां मिथुनतो रतये चरतां सुखयति कोन्विह स्वविहते स्वनिरस्तभगे ॥३४॥ (२१)॥ टीका ॥अश्व पदाति रथ कुत्र्जर ॥देश दुर्गें कोश भाण्डार ॥मंत्री प्रजा स्वप्राण निकर ॥न वटे रुचिर विरक्तां ॥८५॥पूर्वीं रुचिरकर कां न रुचे ॥म्हणाल तरी हें ऎका साचें ॥निजसार तूं सर्व रसांचें ॥असतां कैंचें मग दु:ख ॥८६॥तव चरणांचा आश्रय जिहीं ॥केला असतां तुझे ठायीं ॥सर्व रसांचें निजसार तिहीं ॥भोगिजतसे अनायासें ॥८७॥सर्व रसांचें जें निजसार ॥ ।तो आत्म निर्विकार ॥असतां कां पां नर पामर ॥धनसुत दार आश्रयिती ॥८८॥आत्मा केवळ स्वानंदधाम ॥ऎसें नेणोनि पामर अधम ॥स्त्रीसंगमीं अति सकाम ॥धरिती प्रेम धनधामीं ॥८९॥कोण ते मायिकरससेवनों ॥प्राणी निवती विष सेवूनी ॥स्वयेंचि नश्वर जो प्रतिक्षणीं ॥नि: सारपणीं स्वत:सिध्द ॥९०॥शिम्बि धान्याचीं टरफ़लें ॥सकण भासती परंतु फ़ोलेम ॥तेंवि नि:सार नश्वर असतां अबळें ॥संसारसोहळें वात्र्छिती ॥९१॥तस्मात् अपरोक्षज्ञानेंविण ॥श्रमें करुनि शास्त्रपठन ॥सज्ञाम म्हणविती ते अज्ञान ॥विषयास्वादन न सुटतां ॥९२॥एवं श्रोत्रिय ब्रह्यनिष्ठ ॥ईश्वरानुग्रहें सद्गुरु श्रेष्ठ ॥तत्प्रसादें आत्माभीष्ट ॥अपरोक्ष ज्ञान अवगमूनी ॥९३॥सारासार विवेकेंकरुन ॥सार सन्मात्र निर्धारुन ॥असार मायामय जाणोन ॥ईश्वराभिमानपर्यत ॥९४॥अनित्य असारीं न रमे मति ॥तेणें सर्व भोगीं विरक्ति ॥उपजे ब्रह्यादिस्थावरान्तीं ॥महत्संगति प्रियवाटे ॥९५॥सद्गुरुबोधें परमतत्व ॥अपरोक्ष अवगमलें आत्मत्व ॥यक्तिश्रुतिबळें वास्तव ॥श्रवणें मननें दृढीकरणा ॥९६॥महत्संतें तें श्रवण करणें ॥इतुकियाचिया लाभा कारणें ॥तीर्थें क्षेत्रें पर्यटनें ॥ऎसी मानणें मुनियात्रा ॥९७॥येचि अर्थीं आर्षश्रुति ॥वदली सनंदनभारती ॥नॄपा सांगे श्रीशुक सुमति ॥ते हे श्रोतीं परिसावी ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP