मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ९ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ९ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ९ Translation - भाषांतर ॥ श्रीभगवानुवाच ॥ स्वायंभुव ब्रह्मसत्रं जनलोकेऽभवत्पुरा ॥तत्रस्थानां मानसानां मुनीनामूर्ध्वरेतसाम् ॥९॥॥टीका॥ भाविभूतवर्तमान ॥ ज्ञाता सर्व नारायण ॥ स्वमुखें नारदालागून । इतिहास प्राचीन निरुपी ॥३६॥पूर्वी जनलोकाच्या ठायीं ॥ ब्रह्मसत्र होता पाहीं ॥ स्वायंभुव या नामें तिहीं ॥ लोकीं सर्वही जाणती जें ॥३७॥स्वयंभू यजमान जिये सत्रीं ॥ यालागीझं स्वायंभुव हे नाम वक्त्रीं ॥ श्रेष्ठीं वदतां चराचरीं ॥ ख्यात झालें सर्वत्र ॥३८॥परंतु सत्रें बहुविध असती ॥ मीमांसात्मकें शंसिलीं श्रुती ॥ त्यांमाजीं स्वायंभुव हे व्युत्पत्ती ॥ व्दिविध श्रोतीं परिसावी ॥३९॥स्वयंभू जे सत्रीं यजमान । तयासी स्वायंभुव अमिधान ॥ स्वयंभूपासोनि ज्यांचें जनन ॥ तें तपोधन स्वायंभुव ॥४०॥कर्मकलाप यथोक्त चांग ॥ ऋत्विज यजमान यथायोग्य ॥ प्रायश्चित्ताचा न पडे पांग ॥ तें अव्यंग कर्मसत्र ॥४१॥कर्मसत्र स्वयंभूकृत ॥ यास्तव स्वायंभुव त्या नामसंकेत ॥ तैसें नव्हे हें वेदोदित ॥ ब्राम्ही संतत मीमांसा ॥४२॥स्वयंभूचे स्वायंभुव ॥ ऊर्ध्वरेते कुमार सर्व ॥ ब्रह्मवेत्ते मुनिपुड्गव ॥ तत्कृत अपूर्व ब्रह्मसत्र ॥४३॥समान वक्तोश्रोते जेथ ॥ ब्रह्मनिष्ठ पूर्ण विरक्त ॥ ऊर्ध्वरेते भवनिवृत्त ॥ प्रत्ययवंत अपरोक्ष ॥४४॥त्यांमाजीं अध्वर्यु करुनि वक्ता ॥ प्राश्चिक यजमान तत्त्वता ॥ प्रशंसिता केवळ होता ॥ अनुमोदिता आग्रीघ्र ॥४५॥ऐसे करुनि ऋत्विजगण ॥ उर्ध्वरेते मुनि सर्वज्ञ ॥ ब्रह्ममीमांसामय मख पूर्ण ॥ कृतनिर्वपण जनलोकीं ॥४६॥तया जनलोकनिवासियांचा ॥ ब्रह्ममीमांसामय मख साचा ॥ झाला तो आजी मज तां वाचा ॥ प्रश्न केला देवर्षि ॥४७॥नारदा तूं जरी म्हणसी ऐसें ॥ तो मख मज कां विदित नसे ॥ तरी तें कथितों सावध परिसें ॥ प्रसंगा सरिसें उपस्थित ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : December 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP