मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २३ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २३ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २३ Translation - भाषांतर निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजो ह्रदि यन्मुनय उपासते तदरयोऽपिययु: स्मरणात् ॥स्त्रिय उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियो वयमपि ते समा: समदृशोंऽध्रिसरोजसुधा: ॥२३॥ (१०)॥ टीका ॥दमें रोधूनि करणवर्ग ॥शमें करिती वासनात्याग ॥अवलंबूनि प्रणवमार्ग ॥साधिती सांग प्राणजय ॥६६॥पवनजयें रोधे मन ॥तैं तें होय कल्पनाविहीन ॥ऎसे योगाभ्यासीं प्रविण ॥दृढ मुनिजन जे ध्याती ॥६७॥ते सन्मात्रोपासक ॥म्हणोनि पावती अक्षयसुख ॥द्वेष्टे द्वेषिती जरी सम्यक ॥तरी त्यां चित्सुख सद्द्वेषें ॥६८॥स्पर्शमणि पूजितां भावें ॥अष्ट लोहाचीं पात्रें सर्वें ॥होय हेमचि आघवें ॥स्पर्शगौरवें सन्मात्रें ॥६९॥द्वेषीं यवनीं फ़ोडितां घनें ॥तें तो घनाचें करी सोनें ॥सन्मात्रवस्तु स्वमहिमानें ॥चित्सुखविणें आन नेदी ॥७०॥किंवा सन्मात्रविग्रहधारी ॥पाहोनि सकाम भुलल्या नारी ॥बाहु भुजगेन्द्रवर्ष्मासरी ॥देखोनि अंतरी प्रविषक्ता ॥७१॥जरी त्या सन्मात्रसगुणा तूतें ॥सकाम-प्रेमें भलल्या चित्तें ॥तथापि वास्तव चित्खुखातें ॥भोगिती निस्तें सभ्दजनें ॥७२॥तैशाचि आम्ही तुज तत्वता ॥केवळ श्रुतिरुपी देवता ॥वास्तवनिर्गुणबोधें भजतां ॥पदाब्ज माथां धरीतसो ॥७३॥तस्मात् वास्तवसन्मात्रगुणें ॥द्वेषें प्रेमें स्मरणें ध्यानें ॥अभेद तव प्राप्ति पावणें ॥असभ्दजनें दलर्भ ते ॥७४॥मनासहित परतल्या वाचा ॥न पावोनि अवबोध ज्याचा ॥तेथ प्रवेश आणिकांचा ॥होईल कैंचा जाणावया ॥७५॥साक्षाद्वेत्ता कोण तया ॥कीं वक्ता समर्थ बोलावया ॥येथ कोठूनि सृष्टी इया ॥स्थूळसूक्ष्मा इत्यादि ॥७६॥ज्याहूनि अर्बाकू देवताचक्र ॥जें कां सृष्टिसर्ज्जनपर ॥ज्यापासूनि हें समग्र ॥होतें झालें स्थूळ सूक्ष्म ॥७७॥स्यातें जाणता त्याहूनि कोण ॥असावा तत्पूर्वीं विद्यमान ॥तरी हें परब्रह्य निर्गुण ॥एक म्हणोन निगमोक्ति ॥७८॥तेथ कैंचा तया पूर्वीं ॥अर्वाक् ब्रह्यादि स्थावरीं सर्वीं ॥ज्याहूनि होईजे ऎसी पदवी ॥श्रुति गौरवीं वाखाणे ॥७९॥जें कां वास्तव असंग एक ॥निष्कंप अचंचल निष्टंक ॥मनाहूनियां जवीन देख ॥विरोधवाक्य हें न माना ॥८०॥कल्पनेसरिसें मन वावडे ॥तंव वास्तव स्वरुप त्याहुनि पुढें ॥तैं मनाहूनियां जवीन घडे ॥ऎसें उघडें जाणों ये ॥८१॥मॄगजळ सांडूनि सूर्यरश्मी ॥पुढें जाईल कवणिये भूमि ॥तैसे ज्यावरी ब्रह्यादि आम्ही ॥विविधा नामीं वैवर्ती ॥८२॥यालागीं देव अर्वाचीन ॥पावूं न शकती जयांचें वयुन ॥सर्वापूर्वीं विद्यमान ॥जें सनातन सन्मात्र ॥८३॥चंद्रसूर्य तारा पवन ॥इत्यादि जे जे धावमान ॥त्या सर्वाचें अतित्र्कमण ॥करुन वर्ते सर्वत्र ॥८४॥सर्वांचें जें बीज आप ॥तैसाचि वायु प्राणरुप ॥ज्यावरी भासोनि ज्यामाजि अल्प ॥वर्ते आकल्पपर्यत ॥८५॥इत्यादि वदे श्रुतींचा निकर ॥भगवत्तत्व दुर्र्ज्ञेयतर ॥कोणी जाणों न शकती अवर ॥ऎसा निर्धार करुनियां ॥८६॥अव्यभिचारीए भगवभ्दक्ति ॥अंगीकारुनि श्रुति वदती ॥तो इत्यर्थ आर्षश्रुति ॥श्रीशुक सुमती बोलतसे ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP