मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १६ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १६ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १६ Translation - भाषांतर इति तव सूरयस्त्र्यधिपतेऽखिललोकमलक्षपणकमलक्षकथाऽमॄताऽब्धिमवगाह्नातपांसि जहु: ॥किमुत पुन: स्वधामविधुताशयकालगुणा: परम भजंति ये पदमजस्त्रसखानुभवम् ॥१६॥॥टीका ॥ सर्व कारणत्वें तूं वास्तव ॥ऎसा परमार्थनिर्वाह ॥श्रुतिही बोलोनि महानुभाव ॥द्दढाविती ॥३२॥त्रिगुणमायामॄगीनर्तन ॥कर्ता म्हणोनि संबोधन ॥अधिपतें हें तुजलागून ॥श्रुतींही पूर्ण केलें असे ॥३३॥भो भो अधिपते परेशा ॥सूरि म्हणिजे विवेकी पुरुषां ॥तिहीं तुझिया अमळयशा ॥सेवनि दोषा त्यागिलें ॥३४॥ते विवेकी म्हणसी कैसें ॥जिहीं तव यश अति उत्कर्षें ॥लक्षिलें तेंचि विशेषणवशें ॥श्रतिसंदभै अवधारीं ॥३५॥अखिल म्हणिजे संपूर्ण लोक ॥श्यांचे कायिक वाचिक मानसिक ॥मळक्षपणीं पटुतर देख ॥कथामॄताब्धि हाचि तुझा ॥३६॥त्यांमाजीं करुन अवगाहन ॥त्रिविध पापतापांचे दहन ॥करुनि टाकिती निपटून ॥स्वानंदघन मग होती ॥३७॥कथामात्रें पापताप ॥त्यागिती ऎसा तव प्रताप ॥माझें वास्तव चित्स्वरुप ॥भजोनि संकल्प निरसिती ॥३८॥चित्स्वरुप तें तव धाम ॥तन्निष्ठ जे कां आत्माराम ॥त्यागिती आशयसह गुणधर्म ॥किमुत परम हें म्हणणें ॥३९॥आशय म्हणजे अंत:करण ॥एतध्दर्म रागादि पूर्ण ॥जन्मापासूनि जरामरण- ॥पर्यंत गुण काळकृत ॥४०॥अंत:करणचतुष्टय ॥मनोधिचित्ताद्यहंतामय ॥धर्म म्हणिजे तयाचे विषय ॥अवस्थात्रयात्मक अवघे ॥४१॥एवं रागद्वेषादिक ॥तृष्णादुराशावासनात्मक ॥यांच्या अवलबें अविवेक ॥बुडवी निष्टंक भवडोहीं ॥४२॥ऎसे आशय काळगुण ॥तुरि क्षाळिती तुज भजोन ॥भो भो परम हें संबोधन ॥करुनि श्रुतिगण काय वदे ॥४३॥अमलवास्तव त्वध्दाभभजनें ॥आशयकाळगुण क्षाळणें ॥अखंडैकरससुख भोगणें ॥किमुत म्हणणें हें नवल ॥४४॥ऎसे सूरि विवेकनिष्ठ ॥संप्रज्ञातहि वर्ततां स्पष्ट ॥नलिनीदलवत् भवास्पृष्ट ॥नित्य भ्राजिष्ट निर्लेप ॥४५॥इष्टानिष्टमिश्र त्रिविध ॥येणेंचि कर्मलेपें बध्द ॥होवोनि भोगिती कर्मविरुध्द ॥तन्मुक्त शुध्द ते होती ॥४६॥ऎसा श्रुतिगण कविजन चर्याअ ॥प्रमाण करुनि अनुवादलिया ॥पुढती तव गुणां कां चिन्मयां ॥न भजति तयां धिक्करिती ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP