मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| २६ ते ३० वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - २६ ते ३० ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - २६ ते ३० Translation - भाषांतर २६ श्लोक (वंसततिलका, श्रीज्ञानेश्वरस्तवन)मागें अपार जड तारियले प्रतापें । अद्यापि ग्रंथपठनें हरताति पापें ॥हें मुख्य कारण तुम्हां तनुतें धराया । ज्ञानीश्वर प्रभु दयार्णव उध्दाराया ॥१॥इंद्रायणीतटअधिष्ठितवासवाअसी । जें गुह्य दुर्लभ विधी भववासवांसी ॥विस्तारिलें सकळ तें जडधी तराया । ज्ञानेश्वर प्रभु दयार्णव उध्दराया ॥२॥आज्ञा समर्थ यमपत्रकुळोभ्दवाची । वाणी विनोद करितां निगमार्थ वाची ॥सामर्थ्य हें प्रगटिलें खळ मोहराया । ज्ञानेश्वर प्रभु०॥३॥अद्यापि पादपरुपें करदंड ज्याचा । विश्रांतिधाम गमतो विधिअंडजांचा ॥ग्रंथामॄतानुभव भाष्य कथ कराया । ज्ञानेश्वर प्रभु दयार्णव०॥४॥श्रीशंकरे गिरिसुता उपदेशितां हें । मत्स्येंद्रसूनुभवजापरंपरा हे ॥विस्तारिली सकळ कल्मष संहराया । ज्ञानेश्वर प्रभु दयार्णव उध्दराया ॥५॥ज्ञानेश्वरस्तवन पावन पंचरत्नें । कंठीं धरील अथवा श्रवणीं प्रयत्नें ॥वैकुंठनाथ पदवी मग त्या वराया । ज्ञानेश्वर प्रभु०॥इंद्रायणीतटस्थोयं शुध्दज्ञानप्रबोधकत् ॥नमस्तस्मै०... ॥२७ श्लोक (वंसततिलका, श्रीएकनाथस्तवन)मूळावरी उपजतांचि समूळ माया । ग्रासूनियां भव पुढें नुरवी शमाया ॥नाहीं नियामय तयदुसरा अनाथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥१॥मूळीं गिळूनि भवसागर शुष्क ज्यानें । केला तयासि मग वाढविलें अज्यानें तो भानुदासकुलभूषण भक्तिपंथा । साष्टांग वंदिन दयार्णव एकनाथा ॥२॥ज्याचे घरीं हरि करी उपचार सेवा । विप्रार्चनें करुनि मानत वासुदेवा ॥तारी अपार जड ठेवुनि हस्त माथां । साष्टांग वंदिन०॥३॥भावे जनार्दन जनीं नयनीं निरीक्षी । बोधूनि हें गुज निजांकित भक्त रक्षी आतां समर्थ करितो निरसूनि वेथा? । साष्टांग वंदिन दयार्णव०॥४॥श्रीआदिनाथ-गुरु-दत्त-जनार्दनासी । तें साधिलें करुनि सन्निधि साधनासी केली तया वरुनि भागवताख्य गाथा ॥साष्टांग वंदिन०॥५॥२८ श्लोक (वंसतति० श्रीचांगदेवस्तवन)जो श्रीहरी बळिछळें पदमान घाली । ब्रह्यांड भेदुनि नखें त्रिपथा निघोली जीचें करी त्रिजग पूत पवित्र पाणी । तो चांगदेव सद्यर्णव्व चक्रपाणी ॥१॥गंगातटानिकट संकट सज्जानांचें । नाशूनि संकट हरी सकळा जनांचे विश्रांति पुण्यतमपट्टण सन्निधानीं । तो चांगदेव०॥२॥चौदा शताब्दगत एक समाधि ज्यला । सर्वान्तरीं वसत जो न कळे दुज्याला बोधी कॄपाळु मग तो निजगुह्य कानीं । तो चांगदेव०॥३॥विप्रांगना नमित येउनियां अकांता । प्रत्त्युत्तरा 'सुतवती भव' ते अकांता ऐकोनि सांगत तये वरपुत्रदानी । तो चांगदेव०॥४॥अद्यापि ही प्रगटतेसि भविष्य केलें । कित्येक सज्जन तया समया भुकेले तेव्हां तयांवरि दया करणें निदानीं । तो चांगदेव०॥२९ श्लोक (शार्दूलवित्र्किडित, भीमाशंकरस्तुति)हस्तीं मस्तकपात्र नेत्र तिसरा ज्याचे कपाळीं असे । कांता अर्धतनुप्रकाशित नटें दावी वधूभावसे । ज्याचें एक निमेष पूर्ण भरतां कल्पान्तकोटी सरे । भीमाशंकर तो दयार्णव भजा दारिद्रवेथा हरे ॥१॥अंगी प्रेतविदग्ध भस्म मिरवी चर्मांबरें वागवी । कोण्ही एक विलासयोग समयीं सांडी तनू नागवी । श्रीरामस्मरणादिगांगसलिलें उल्लास शंखस्वरें । भीमाशंकर तो दयार्णव०॥२॥वक्षीं व्याळ धरी हळाहळ गळां काळानळा लोचनीं । मौळीं अमृतसंभव त्रिपथगा तापत्रया मोचनी । वाहे, विश्वविनाशकत्व मिरवे, मायाहरें मोहरे । भीमाशंकर०॥३॥भासे भीम भयानक, प्रगटता काळासही काळ जो । मोडी सॄष्टि अनंतकोटि रचना निर्मीत तत्काळ जो । ज्याचें शासन देव दानव मुनी कोण्ही नुलंघू सरे । भीमाशंकर०॥४॥जाळी काम, विराम राम जपतां नेणे उमारंग तो । ज्याचें चितंन केलिया निजमुखें दारिद्रयधी भंगतो । विद्या-बुध्दि-प्रतापवर्धन करी दु:खानुवार्ता नुरे । भीमाशंकर०॥५॥भीमाशंकर-पंचरत्न पढतां काळत्रयीं मानवीं । दारिद्यादिक दोष दुर्मति ऋणें खंडूनि लक्ष्मी नवी । वाढे चंद्रकिरीटकीर्ति ह्नदयीं प्रेमादरें संचरे । भीमाशंकर तो दयार्णब०॥६॥३० श्लोक (शार्दूलवि०, मारुतिस्तव)श्रीमन्मारुतवस्त रामचरणीं दासाग्रणी मारुती ज्याचें नाम मुखीं स्मरे नर तया धाके मनीं नैऋती ॥लंका शोधुनि बोधिली जनकजा श्रीराममुद्रार्पणें ॥चिंता, त्याचि दयार्णवा कपिवरा पूजादिसंतर्पणें ॥राक्षेसांसह अक्षया क्षय करी जंबू विदारी बळें ॥क्रोधें दीर्घ गडाडितां प्रबळ तीं रक्षोगणें दुर्बळें ॥शत्र्काचा रिपु गांजिला उधडिली त्र्कौंचा असीळा दनु चिंता त्यासि दयार्णवा कपिवरा विघ्ना करी कंदनू ॥लंका जाळुनि रामचंद्रचरणीं दीपावळी पाजळी ॥जाली तेथुनि रावणा स्वह्नदयीं चिंता भयें काजळी ॥बोधी शुध्दि रघूत्तमा सुखकरी गर्जे कपीमंडळीं ॥चिंता त्याचि दयार्णवा कपिवरा निर्विघ्न भूमंडळीं ॥गेला योजनकोटि अष्ट भरतां यामार्ध वायगती ॥मर्दी राक्षसकोटि कोटि तवकें वोपी तयां सद्नती ॥द्रोणाद्री उपटूनि घे करतळीं मर्दी सुरांच्या गणा चिंता त्याचि दयार्णवा कपिवरा घाला कळी अंकणा ॥लंकेशात्मजयज्ञधूम्र गगनीं झांकी कपी मंडळी ॥रामा बोधित रावणानुज तदा ऐकोनियां डंडळी ॥तत्काळीं नभ आत्र्कमोनि मुततां कोपोनि वैश्वानरें ॥सक्रोधें रथ गीळितां निजमनीं आल्हादती वानरें ॥युध्दार्थीं जलपोनि मेघ वळघे शत्र्कारि सत्र्कोधता ॥वर्षे बाण सणाण मेघगजरें गर्जे नभीं उर्ध्दता ॥तेव्हां ऊर्ध्व उडोनि मेघ वितुळी अंगप्रवातें हरी ॥हस्तीं घेउनि लक्ष्मणास निकरें शत्र्कार्दना संहरी ॥सौमित्राप्रति शक्तिभेद करितां चिंता मनीं राघवा ॥आला घेऊनि संकटीं पुनरपी द्रोणाद्रि जो आघवा ॥ठेवी जेथिल तेथ नेउनि निशीमध्यें बळी मारुनी ॥चिंता त्याचि दयार्णवा कपिवरा विघ्नांसि संहारुनी ॥पाताळीं महिकावतीस दमिले मर्दी महीरावणा । क्रोधें जो भुभुकार देव गगनीं संतापवी रावणा ॥रामाची वनिता सिता सुखलता कां त्रासिली सुंदरी । तीचें घे उशिणें म्हणे दशमुखा गांजोनी मंदोदरी ॥बाळत्वीं फ़ळबुध्दि मानुनि गिळूं धांवे रवीमंडळा । वज्राग्रें हनु हाणतांचि हनुमनामासि संस्थापना । चिंता त्याचि दयार्णवा कपिवरा साफ़ल्य जिंका पणा ॥द्वापारीं मग राहिला निजबळें जो अर्जुनाचे रथीं ॥जेथें श्रीपति भक्तवत्सलपणें जाला असे सारथी ॥मर्दी कौरव गौरवूनि वर दे कुंतीसुता दुर्घटीं ॥चिंता त्याचि दयार्णवा कपिवरा पावे त्वरें संकटी ॥अद्यापी रघुनाथ नाम जपतां तिष्ठे सदा संमुखीं भूतप्रेतपिशचयक्ष पळती उच्चरितां जो मुखीं ॥त्याच्या जे नर भावयुक्त यजिती सर्वोपचारीं पदा ॥त्याला देत दयार्णव प्रगटता श्रीमारुती संपदा ॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP