मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २१ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २१ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २१ Translation - भाषांतर दुरवगमातत्मतत्वनिगमाय तवात्ततनोश्चरितमहामॄताब्धिपरिवर्तपरिश्रमणा: ॥न परिलपंति केचिदपवर्गमपीश्वर ते चरणसरोजहंसकुलसंगविसृष्टगृहा: ॥२१॥ (८)॥ टीका ॥श्रुति म्हणती भो ईश्र्वरा ॥दुर्बोध आत्मविचार खरा ॥तदवगमार्थ विवेक दुसरा ॥भक्तिवांचूनि असेना ॥९०॥भक्ति म्हणिजे जाति काय ॥हा विवरितां अभिप्राय ॥प्रेमरसावांचूनि सोय ॥न लगे अन्वय बोधावया ॥९१॥देव भक्त इतकें द्वैत ॥परि माजील प्रेम अद्वैत ॥भेद असतां तेथ किंचित ॥ये वैयर्थ्य भक्तिसी ॥९२॥भक्तितत्व ऎसें एक ॥जें सर्वीं सर्वत्र रोचक ॥प्रपंचीं ही विषयसुख ॥विपरीत बोधें रुचवीतसे ॥९३॥युवायुवती परस्परें ॥सप्रेम भजती स्मरपडिभारें ॥यामाजीं पातिव्रत्य जैं खरें ॥तैं निस्तरे भवसिन्धु ॥९४॥पितापुत्र कीं सेवकस्वामी ॥अभेदप्रेमें वर्ततां सद्मीं ॥विषय सेवितां सुकृतोद्यमीं ॥भवदुर्गमीं निस्तरती ॥९५॥असो हे स्वरौचारें विषय ॥सप्रेम सेवितां रोचक होय\ ।प्रेमराहित्यें विषप्राय ॥लागे हें काय सांगावें ॥९६॥विपरीत बोघें बिषयाभास ॥प्रेमरसेंचि रुचे अशेष ॥प्रेम भंगतां वैराग्यास ॥कारण होय तेच क्षणीं ॥९७॥विषयाभासीं जें वैरस्य ॥वैराग्यनामें बोलिजे त्यास ॥तैं देहादि प्रपंच फ़ोस ॥प्रेमा ओस सहजेंचि ॥९८॥तैं मग प्रेमा वास्तवबोधें ॥पूर्ण चैतन्यीं येवोनि नांदे ॥मृगजल सांडुनि अगाध ह्रदें ॥जेंवि निवती पिपासिक ॥९९॥पूर्ण चैतन्य तूं ईश्वर ॥धर्मसेतुस्थापनापर ॥घेऊनि युगानुयुगीं अवतार ॥लीला विचीत्र प्रकाशिसी ॥४००॥सूर्योदयीं नासे तम ॥डोळ्या रुचे प्रकाशप्रेम ॥तव विग्रहीं भक्तसत्तम ॥जडती निष्काम सकामवत् ॥१॥युवायुवति सकाम रमती ॥विपरीत बोधाचिये भ्रान्ती ॥वास्तवबोधें सप्रेम भक्ति ॥तेंवि लाहती सभ्द्दक्त ॥२॥तुझी जे कां अवतारमूर्ति ॥तयेचि जे अमोघ कीर्ती ॥तया अमृताब्धीमाजिं निवती ॥लाहती विश्रांति अक्षय ते ॥३॥तया सप्रेम सुखापुढें ॥कैवल्य सुखही नेच्छिती कोडें ॥तेथ आमुष्मिक बापुढें ॥कोणीकडे बैवती ॥४॥ऎसे विरळा भक्तिरसिक ॥भक्तिप्रेमा पुढें आणिक ॥अपवर्गादि नेच्छिती देख ॥रमती सम्यक सत्संगीं ॥५॥प्रेमसुखें पूर्ण धाले ॥केवळ सत्संगीं निवाले ॥थितें देहादिसुख विसरले ॥मां इतरां भजलें केविं घडे ॥६॥त्वत्पदसरोजंहसकुळ ॥झाले सत्संगे जे अमळ ॥देहगेहादि बंदिशाळ ॥मानूनि केवळ संन्यसिती ॥७॥श्रवणकीर्तन नवविध प्रेमा ॥भोगितां विसरुनि गेले कामा ॥अभेद-वोधें निष्कामधामा ॥माजी विश्रामा पावले ॥८॥ऎसिया भक्तांचें पदमळ ॥मुक्त वंदिती सनकादि अमळ ॥मुमुक्षुही विश्रांतिस्थळ ॥वेळाऊळ सेविती ते ॥९॥तया सुखाची विश्रान्ती ॥दुर्लभ मानूनि बध्द वांछिती ॥एवं सर्वां वरिष्ठ भक्ति ॥म्हणती श्रुति भो ईशा ॥१०॥भक्तिसुखोपब्धिस्थळ ॥तें एक हें भूमंडळ ॥येथ नर तनु लाहूनि अमळ ॥न भजती केवळ आत्मघ्र ते ॥११॥ज्याच्या प्रकाशें विश्वोद्यान ॥कोणी तयातें न पाहोन ॥विश्वीं विषयाभिलाषें पूर्ण ॥रमती अनभिज्ञ मूढत्वें ॥१२॥जेथूनि जन्म झाला आपणा ॥विसरुनि तया आत्मकारणा ॥आत्मच्छायेच्या आलिंगना ॥स्नेह चौगुणा वाढविती ॥१३॥अरे प्राणी हो तुम्ही सकळ ॥अज्ञान पांघुरलां केवळ ॥तेणें विसरलां आपुलें मूळ ॥भुललां टवाळ देखोनि ॥१४॥प्राणपोषक विषयासक्त ॥अनित्य पदार्थी अनुरक्त ॥होऊनि वदतां जो वेदान्त ॥तोचि भ्रान्तिकर होय ॥१५॥सकाम भ्रमकर वेदवचनें ॥प्रतिपादिती जे कर्माचरणें ॥तत्फ़लमोगें जन्ममरणें ॥योनि भ्रमणें न चुकती ॥१६॥यास्तव भूलोकीं नरतनु ॥लाधल्या कीजे ईश्वर भजन ॥हितोपदेशें श्रुतींचा गण ॥आक्रोशोन हेंच वदे ॥१७॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP