मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
१ ते ५

स्फ़ुट पदें व अभंग - १ ते ५

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


ॐ श्रीसद्‍गुरवे नम:
१ पद
परिसा हेचि कथा जन हो ॥धॄ०॥
तारण जे भवदु:खनिवारण ॥
कळिमळभजन हो ॥१॥
परिसा०॥
परिसतु स्वस्थ मनें जन त्याप्रति ॥
दुस्तर भान न हो ॥२॥
परिसा०॥
श्रीगुरु कॄष्णदयार्णब सेवुनि बोधविजे मन हो ॥३॥
परिसा०॥

२ पद
हरिनें मन चोरुनि नेलें ॥धॄ०॥
अवचट वेणु पडतां कानीं ॥
मीपण-तूंपण अवघें गेलें ॥१॥
कोण फ़िराउनि मानस आणी ॥
पुढती नेणोंजीत कीं मेलें ॥२॥
हरिनें०॥
कॄष्णदयार्णब भेटलियावरि ॥
कोण जिण्यचें सार्थक उरलें ॥३॥
हरिनें०॥

२ श्लोक (स्त्रग्धरा)
दे देवा भाग्य दे दे धन वधु सुत दे वृत्ति दे मित्र दे दे ॥
विद्या दे बुध्दि दे दे अविकळ तनु दे मान सन्मान दे दे ॥
गाई घोडे पशू दे सुह्नद सुजन दे शौर्य सत्कीर्ति दे दे ॥
भक्तिप्रेमाविणें दे म्हणत नर तया काळ तोंडावरी दे ॥

४ सवाया (मदिरा)
नाम वदे जरि काम उपेक्षुनि ग्राम तया निजधामाचि जोडे ॥
जे बह याग तपें करिती परि त्यांप्रति जें श्रमतांहि न जोडे ॥
इंद्रपदादि पदें सुरसेव्य तयां वरितां सुख तें मग मोडे ॥
तेविं नव्हे, क्षितिजावरनाम उमासुखधाम जपे निजकोडे ॥
सार त्यजूनि आसार भजे जन लाज नसे मज चोज गमे हें ॥
काळकुटा करि शीतळ दुस्तर मारक त्यासि मनीं न रमे हें ॥
जें शुकशौनकभक्तऋषींप्रति सेव्य अखंड उमेश रमे हें ॥
त्यजिती भजतां विषयांप्रति पामर जे नर मूर्ख मुढें अधमें हें ॥
ज्या विषयां भजतां भवरौरव दुर्धर तो अतिदुर्गम वाढे ॥
ज्या विषयां भजतां भयशोकमदादिक तस्कर षष्ठहि गाढे ॥
ज्या विषयां भजतां बहु जन्म धरुनि जिवां निमणें यमदाढें ॥
ज्या विषयांस्तव सार विचार उपेक्षिति पामर तों शिण वाढे ॥
कामसुखें वनिताननलोकित, लोचन तेथ सुरेख निरीक्षी ॥
श्रोत्रसुखें स्तवनाप्रति लोघत, घ्राण सुवास अखंड अपेक्षी ॥
इच्छित रम्यरसा रसना, मृदुसंघट्तसौख्य त्वगिद्रिय लक्षी ॥
येचि भरीं भरतां नर पामर सारसुखा त्यजितां यम भक्षी ॥
शिश्ननळें रमणास्तव संभव होऊनि योनिमुखीं पडलासी ॥
जें अपवित्र अलोक्य जनाप्रति ते दहनालयिं सांपडलासी ॥
मूत्रपुरीषपुटीं पचतां नव मास गभस्तिवरी घडलासी ॥
तेचि भगीं अधमा सुख मानुनि नष्टवरिष्ठपणें जडलासी ॥
जें भग सुंदर मानुनि शंकर नग्न भ्रमें महि मोहिनिमागें ॥
कामिनि रम्य नव्हे नटला हरि, जाणत केवळ मूढपणें रति मागे ॥
ती पळतां खळला स्मर शंकर तो हर मन्मत्थपारद सांगे ॥
यापरि घातक जें भग तें मग गोड कसें न तुज लागे ॥
जे प्रमदेस्तव भस्म निशाचरनाथ दशानन रामकरानें ॥
जे प्रमदेस्तव वारण वारिज निर्दळितां धरिला मकरानें ॥
जे प्रसदेस्तव अंधज पौरव भोगिति रौरव कां निकेरानें ॥
ते प्रमदेस्तव भ्रांत कसे जिव धांवति मन्मथसंघट रानें ॥
जात आयुष्य पळेंमळ व्यर्थ तुला गटकाविल काळ मुढा रे ॥
सत्वर सार विचारुनि घात निवारुनि  सावध पाहें पुढां रे ॥
व्यर्थ अभर्वसि कां पडसी शठ दुष्ट खळा कुटिला दगडा रे ॥
श्रीगुरुराज दयार्णव सेउनि वेंघ सवेग समाधिगडा रे ॥

५ पद
परमार्थी प्रेमें होणें ॥धृ०॥
जन्म निवारनि कर्मालागी ॥
अहंकार तिलांजलि देणें ॥१॥
एकचि वेळ समस्ता तीर्थी ॥
स्त्रानतपार्चनसुकृत घेणें ॥२॥
कृष्णदयार्णव स्वामिप्रसादें ॥
पावन पूर्वज अवघे तेणें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP