मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ४७ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ४७ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ४७ Translation - भाषांतर इत्याद्यमॄषिमानन्य तच्छिष्यांश्च महात्मना: ॥ततोऽगादाश्रमं साक्षात्पितुद्वैपायनस्य मे ॥४७॥॥ टीका ॥या कारणें तो आद्य ऋषी ॥नारायणाख्य भक्तिविशेषीं ॥नमस्कारुनि नम्रशीर्षीं ॥जो अनेक शिष्यीं परिवॄत्त ॥९३॥तयां शिष्यांसिही अभिवंदन ॥महामना नारद जाण ॥जयाचें मन ब्रह्यसंपन्न ॥महद्विशेषण यास्तव त्या ॥९४॥ऎसा नारदमुनि महामन ॥त्यानंतरें तदाज्ञा घेऊन ॥साक्षात् मम पिता द्वैपायन ॥सत्यवतीनंदन श्रीव्यास ॥९५॥तयाचिया आश्रमाप्रति ॥जाता झालाअ सहजस्थिति ॥स्मरत होत्साता आपुले चित्तीं ॥नारायणोक्ति यथाश्रुत ॥९६॥येथ बोलिला शुक आपण ॥कीं साक्षात् मम पिता द्वैपायन ॥हें ऐकोनि शंकायमान ॥श्रोते विचक्षण जरी होती ॥९७॥सापत्नविकल्पास्तव माता ॥वदिजे साक्षाच्छब्दें तत्त्वता ॥परंतु पितयासी ऎसें सर्वथा ॥गमे कथितां विपरीत ॥९८॥तरी साक्षात्पदें करुनि अर्थ ॥जैसा बोलती विपश्चित ॥तो कथिजेल यथास्थित ॥श्रीधरोक्त व्याख्यानें ॥९९॥कोणे ऎके समयीं व्यास ॥करीत असतां अग्निमंथनास ॥अरणींमाजीं कांहीं रेतांश ॥पडिला तयास निर्मिथिलें ॥१४००॥तेथ तत्काळचि श्रीशुक ॥उत्पन्न झाला निष्टंक ॥योनिव्यवधानां रहित सम्यक ॥म्हणोनि साक्षाज्जनक व्यासची ॥१॥इतरांची जैसी उत्पत्ति ॥पितॄरेत मातृयोनीप्रति ॥पडतां मिळे तच्छोणितीं ॥मग धातुमिश्रितीं पिण्ड घडे ॥२॥तो नवमास मातृजठरीं ॥सावयव पक्क जालिया वरी ॥जनन पावतसे निर्धारीं ॥म्हणोनि उभयजन्यत्व तयासी ॥३॥तैसा नोहे शुकप्रकार ॥केवळ पितॄरेतेंचि पवित्र ॥अरणींपासूनि जाला स्वतंत्र ॥यास्तव अरणीपुत्र वदंती ॥४॥या अर्थें साक्षात् मम पिता ॥श्रीशुक बोलिला तत्त्वता ॥यावरी ऎका तदुक्त वार्ता ॥जे नॄपासि आतां बोलतसे ॥५॥म्हणे अगा ये परीक्षिति ॥ ।नारद मत्पत्राश्रमाप्रति ॥गेलिया तेणें जया रीती ॥सोपस्करिला तें ऐक ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP