मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २७ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २७ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २७ Translation - भाषांतर तव परि ये चरंत्यखिलसत्वनिकेततया त उत पदात्र्कमंत्यविगणय्य शिरो निऋते: ॥परिवयसे पशूनिवगिरा बिबुधानपि तांस्त्वयि कॄतसौह्यदा: खलु पुनंति न ये विमुखा: ॥२७॥ (१४)॥ टीका ॥तरी सर्वभूत निवासी जो तूं ॥त्या तव परिचर्येचा तंतु ॥रक्षृनि उपासिती संततु ॥तेचि हा मॄत्यु निस्तरती ॥६७॥निॠति ऎसें मॄत्युसि नाम ॥स्थाचा करुनि अतित्र्कम ॥सुखें पावती कैवल्यधाम ॥निष्काम काम होत्साते ॥६८॥अतिक्रम कैसा म्हणाल जरी ॥तरी पाय ठेवूनि मृत्युशिरीं ॥सुखें तरती भवसागरीं ॥एवढी थोरी भक्तीची ॥६९॥आणि जे अभक्त भजनविमुख ॥ते होत कां विपश्चित प्रमुख ॥त्यांतें बांधिसी पशुसम देख ॥मग भोगिती दु:ख तापत्रयें ॥७०॥त्यांसी वाचेचिये दावणीं ॥नामरुपाच्या गळबंधनीं ॥बांधून घालिसी तैं त्यां स्वन्पीं ॥सुटिका दुर्लभ जगदीशा ॥७१॥यास्तव तुजशीं सोहार्द केलें ॥तेचि सप्रेमळ दादुले ॥आपण पवित्र होवूनि भले ॥पवित्र केलें त्रिजग तिहीं ॥७२॥परंतु ज्ञानी विपश्चित ॥ज्ञानसाधक परी अभक्त ॥ते न निस्तरती मृत्युपथ ॥इत्त्थंभूत निश्चय हा ॥७३॥जरी वस्तु अपरोक्ष नित्य ॥वास्तव ज्ञान ही अपरोक्ष सत्य ॥तथापि असंभावना-तिरस्कॄत ॥परोक्षवत अवगमतें ॥७४॥असंभावना विपरीत भावना ॥तिहीं भ्रमाक्त केलिया मना ॥तैं अपरोक्षचि परोक्षपणाअ ॥अनुसरोनि भव दावी ॥७५॥नाहीं झाली चित्तशुध्दि ॥तव जे साधिली ज्ञानसिद्धी ॥परि ते संसारद्रुम न छेदी ॥भवभ्रमवॄध्दिकर होय ॥७६॥ऎसे नोहेंचि उपासकां ॥सप्रेम-परिचर्यासाधकां ॥भजनें चित्तशुध्दि देखा ॥होतां विवेका उदय घडे ॥७७॥भगवत्प्रसादें अपरोक्ष ज्ञान ॥प्राप्त होतां अयत्नेंकरुन ॥करतळामळकवत् करुनि निर्वाण ॥लाहती संपूर्ण भ्रमनाशें ॥७८॥भगवभ्दजनें चित्तशुध्दि ॥झालिया अपरोक्षज्ञानवृध्दि ॥पावोनि भवभ्रम समूळ छेदी ॥हा निरवधि सिध्दान्त ॥७९॥सप्रेम भावें उपास्य भजन ॥तैसेंचि अभेद गुरुसेवन ॥येथ कांही न होतां न्युन ॥अपरोक्ष ज्ञान उदया ये ॥८०॥श्रुति शंका करिती येथ ॥सकळसत्वनिवासीनाथ ॥त्या भगवंता तुजला भक्त ॥सेविती संतत सप्रेमें ॥८१॥सकळसत्वनिवासी यासी ॥सेव्यत्व बोलिलें ऎसें म्हणसी ॥तैं सत्वकारणत्वें निश्चयेसीं ॥कर्तृत्व भोक्तृत्व तुजही ये ॥८२॥म्हणसी वस्तुता अलिप्त जरी मी असें ॥तरी जीवासि ही लिप्तता नसे ॥उभयां तुल्यत्व असतां कैसें ॥तारतम्य भजनाचें ॥८३॥ईश्वर सेव्य कैसेनि म्हणिजे ॥जीवां सेवकत्व केंवि साजे ॥ये शंकेच्या निरसनकाजें ॥श्रुत्यर्थ ओजें अवघास ॥८४॥अपाणि अपाद अचक्षु ईश ॥अकर्ण अघ्राण अजिह्न अरस ॥परित्यागादानगतिप्रकाश ॥द्रष्टा परेश सर्वाचा ॥८५॥श्रवणेंवीण सर्व ऎके ॥रसनेवीण सर्व चाखे ॥घ्राणेंबीण गंध असिके ॥तो जाणतसे अतीन्र्दिय ॥८६॥सर्व वेद्यांचा जो वेता ॥तयास कैंचा आन जाणता ॥तया आदिपुरुषा महंता ॥श्रुति अनंता स्तविताती ॥८७॥तोचि अर्थ शुकाचार्य ॥कुरुवर्यातें कथिता होय ॥सनंदनगिरा आर्षश्रुतिमय ॥उपनिषत्प्राय अवधारा ॥८८॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP