मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १७ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १७ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १७ Translation - भाषांतर दॄतय इव श्र्वसंत्यसुभॄतो यदि तेऽनुविधा महदहमादयोंऽडमसॄकजन्यदनुग्रहत: ॥पुरुषविधोऽन्वयोऽत्र चरमोऽन्नमयादिषु य: सदसत: परं त्वमथ यदेष्ववशेषमृतम् ॥१७॥॥ टीका ॥ ईशावास्योपनिषच्छुति ॥हरिगुणविमुखां अभक्तां प्रति ॥नरदेह पडता होय जे गति ॥कधि ते श्रोतीं परिसावी ॥४८॥सूर्यप्रकाशरहित लोक ॥केवळ असूर्यनामक ॥अंधतम जो अज्ञानपंक ॥केवळ अविवेक गाढमूढ ॥४९॥भजनविमुख त्या लोकांप्रति ॥मेलियानंतर वसती जाति ॥आकल्प जेथें अनिर्गति ॥आत्महंते म्हणोनि त्यां ॥५०॥ऎसा अनेक श्रुतिसमुदाय ॥भजनविमुखां बोधी भय ॥ये श्रुत्यर्थीं तो अन्वय ॥शुकाचार्य निरुपी ॥५१॥असुभृत म्हणिजे सप्राण नर ॥जरी त्या तव भजनीं अनुसर ॥स्वरुपनिष्ठता अति सादर ॥अथवा तत्पर गुणश्रवणीं ॥५२॥अनेक जन्म भोगिले कष्ट ॥भाग्यें नरदेह लाधलें श्रेष्ठ ॥येथें होऊनि भजननिष्ठ ॥करिती यथेष्ठ परिचर्या ॥५३॥व्यतिरेकान्वयें ओतप्रोत ॥बॄहद्ब्रह्याचि सदोदित ॥गुरुमुखें विवरुनि नित्यानित्य ॥मिथ्या विवर्त अवगमिती ॥५४॥ब्रह्यात्मबोधें आत्माराम ॥होवोनि ठेले पूर्ण काम ॥ज्यांच्या दर्शनेंचि भवभ्रम ॥निरसे दुर्गम अबळांचा ॥५५॥एक ते सगुणा तव परिचर्या ॥करिती नियमूनि वाड्:मन:काया ॥तव-गुण श्रवणें कथनें माया ॥निस्तरोनियां समरसती ॥५६॥यदर्थी राया भगवद्वचन ॥सगुण-भक्तीं कॄतप्रमाण ॥भीष्मपर्वी स्वमुखें कॄष्ण ॥पार्थालागून जें वदला ॥५७॥संमति: ॥ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ॥मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरंति ते ॥१॥॥ टीका ॥ हरि म्हणे मो धनंजया ॥दैवी हे जे माझी माया ॥ त्रिगुणद्वासंत्रिजगा यया ॥प्रसवोनियां भवीं बुडवी ॥५८॥रजोगुणें सृजि सकळ ॥सत्वें करीत प्रतिपाळ ॥पुढती पाहोनि प्रळयवेळ ॥ग्रासी तत्काळ तमोगुणें ॥५९॥गुणमयी ऎसी प्रसवोनि गुणां ॥गोविलें प्रसना अवना सॄजना ॥तिहीं सृजिल्या त्रिविधा जना ॥भवनिस्तरणा अनुपाय ॥६०॥अनिष्ट-इष्ट-मिश्र त्रिविध ॥प्राणी करुनि कर्मबध्द ॥विषयभ्रमें भवविरुध्द ॥प्रियतम भानूनि निमज्जती ॥६१॥दीप कवळूनि पतंग जळती ॥विषयभ्रमें तैसिया रीती ॥प्राणीमात्र दु:खावर्ती ॥न निस्तरती दुरत्ययीं ॥६२॥यज्ञादि इष्टकमैं स्वर्ग ॥भोगूं जातां अमर भोग ॥पुण्यक्षयीं अधोमार्ग ॥लाहती मग मनुजत्व ॥६३॥मिश्रकर्मैं मनुज भवनीं ॥दु:ख भोगिती सुख मानूनी ॥अनिष्ट कर्मैं तिर्यग्योनी ॥भोगजाचणी अनिवार ॥६४॥ऎसे मायाप्रवाही पडिले ॥प्राणीमात्र भवीं बुढाले ॥त्यांमाजी प्रेमळ जे मज भजले ॥ते निस्तरले मम माया ॥६५॥जरी दुस्तर हे गुणमरी ॥तरी मभ्दक्तातें कांहीं ॥बुडवूं न शके कालत्रयीं ॥जाण निश्र्वयीं धंनजया ॥६६॥ऎसी संमत श्रुती तें स्मॄति ॥तस्मात् तव गाती पढती ॥किंवा निर्गुणी व्यतिरेक गति ॥जे समरसती ते धन्य ॥६७॥तस्मात् त्यांचेचि धन्य जीवित ॥सफ़ळ त्यांचेचि प्राणश्र्वसित ॥अभक्तांचे भस्त्रावत ॥वॄथा श्र्वसित श्रुति वदती ॥६८॥यदर्थीं श्रुति शंका करिती ॥जे अभक्तहि कामादि फ़ळें वारिती ॥तरी हे प्राकॄत वॄथा वदंती ॥कॄतघ्नाप्रति वैफ़ल्यें ॥६९॥अभक्त कॄतघ्न कोण्या गुणें ॥तरी कार्यकारणानुग्रहपणें ॥जीवनहेतु त्या तुजकारणें ॥न भजति म्हाणोनि कॄतघ्न ते ॥७०॥यास्तव त्यांचे मनोरथ ॥निष्फ़ळ ऎसिया आशयें येथ ॥कार्यकारणानुग्रहकार्थ ॥प्रतिपादिति प्रभूचे ॥७१॥अव्यक्त महत् अहंकार ॥आदिकरुनि तरवें समग्र ॥ज्याच्या अनुग्रहें होती सधर ॥अंड पटुतर सॄजावया ॥७२॥अनुग्रह म्हणिजे अनुप्रवेशें ॥महदादितत्वीं सामर्थ्य ऎसें ॥समष्टिव्यष्टि मठघटदशे ॥सॄजनावेशें प्रवर्तती ॥७३॥तेथ अन्नमयादिकोशपंचकीं ॥तत्तदाकार होवोनि शेखीं ॥चेतवितोसी त्या तुज मूर्खीं ॥न भजोनि वरिली कॄतघ्नता ॥७४॥चिदेकरस जो परम पुरुष ॥तयासी अन्नमयादि कोशविशेष ॥तदाकारतेचा संस्पर्श ॥भारतीस केंवि वदवे ॥७५॥यदर्थी श्रुति परिहार करी ॥अन्नमयादि कोशान्तरीं ॥अन्वयें तदाकारता खरी ॥न सरे दुसरी येथ युक्ति ॥७६॥पुढती शंका करुनि वदे ॥पंचकोशाकारता नांदे ॥तैं सत्यत्व अंसगत्व शब्दें ॥कैसेनि वेदें प्रशंसिजे ॥७७॥ये शंकेचिया परिहारा ॥वाक्य श्रुतींचें अवधारा ॥अन्नमयादि कोशां समग्रां- ॥पासूनि परतरा असंगत्व ॥७८॥अन्नादि पंचकोशाहूनि पर ॥चरम ब्रह्यपुच्छ हा उच्चार ॥सत्यत्व असंगत्व हा निर्धार ॥केला साचार तिये पदीं ॥७९॥ब्रह्यपुच्छप्रतिष्ठा इति ॥सन्मात्र बोधें वदती श्रुति ॥तो तूं परमात्मा चिन्मूर्ती ॥पुन्हा यदर्थीं करी शंका ॥८०॥ब्रह्यपुच्छप्रतिष्टा मात्र ॥सत्यत्व असंगत्व-पर ॥तथापि अन्नयादिकोशाकार ॥तेथ व्यभिचार झाला कीं ॥८१॥अन्नमयादिकांच्या ठायीं ॥तदाकारान्वितत्वें पाहीं ॥झालिया मग कैसें काई ॥असंगत्व घडेल ॥८२॥ये शंकेच्या परिहारा ॥ पंचकोशांहूनि परा ॥ब्रह्यपुच्छ हे श्रुतींची गिरा ॥प्रतिष्ठा ह्यणोनि प्रतिपादी ॥८३॥सदसत:पर म्हणोनि ॥अवशेष ऋत-सत्य ऎसी वाणी ॥स्थूलसूक्ष्मादि कोशांहूनि ॥व्यतिरेक साक्षीभूतत्वें ॥८४॥अवशेष म्हणिजे अवशिष्यमाण ॥स्थूकसूक्ष्माहूनि विलक्षण ॥अबाधित जें उरलें जाणं ॥तें स्वरुप पूर्ण ॠतसत्य ॥८५॥तरी किमर्थ अन्वित झालें म्हणता ॥शाखचंद्रापरी तत्वता ॥शुध्द स्वरुप प्रबोधार्था ॥अन्वितत्व जाणावें ॥८६॥श्रुति ह्यणति हाचि पुरुष ॥अन्नरसमयादि पंचकोश ॥याचे हेचि अवयवशीर्ष ॥प्रमुख स्थूळ-सूक्ष्म-त्र्कमें ॥८७॥अन्वितत्वें इन्धनाकार ॥पावक अवगामितां साकार ।तैसा पुरुषविधा प्रकार ॥प्रबोधपर श्रुति वदती ॥८८॥एरव्हीं ग्रावलोहकाश्ष्ठादिकीं ॥अनळ अगोचर असेचि कीं ॥तैसा ब्रह्यपुच्छप्रतिष्ठादिवाक्यीं ॥शुध्द स्वरुप निर्दुष्ट ॥८९॥तस्मात् श्रीपरेशाकारणें ॥श्रवणें कीर्तनें स्मरणें मननें ॥भजती त्यांचें सफ़ळित जिणें ॥अपरा श्र्वसणें भस्त्रावत् ॥९०॥ऎसें परमेश्र्वराच्या ठायीं ॥सर्वात्मकत्वें श्रुति सर्वहि ॥भजनीयत्व वदल्या पाहीं ॥तें अभक्तां निंदूनी दॄढ केलें ॥९१॥आतां अधिकारपरत्वें श्रुति ॥अगम्य महिन्न ब्रह्यप्राप्ती ॥उपाधि अवलंबे उपासिती ॥ते पॄथक्पध्दती दावितसे ॥९२॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP