मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४२

वेदस्तुति - श्लोक ४२

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ श्रीभगवानुवाच ॥
इत्येतब्र्ह्यण: पुत्रा आश्रुत्याऽऽत्मानुशासनम् ॥
सनंदनमथाऽऽनर्चु: सिध्दा ज्ञात्वाऽऽत्मनोगतिम् ॥४२॥

॥ टीका ॥
म्हणे इतुकें हें निरुपण ॥
तें सिध्द विरिचिनंदन ॥
ऎकूनि आत्मा नुशासन ॥
जें अनुग्रहणें पारमार्थिक ॥६२॥
केवल आपुलें प्राप्तिस्थान ॥
जें परमगति आदिकारण ॥
जाणोनि अनुभवसंपन्न ॥
पूर्ण ज्ञान अभिवेत्ते ॥६३॥
मग जयाच्या मुखीं श्रुतिसिध्दान्त ॥
श्रवण केला इत्त्थ्मभूत ॥
त्या सनर्दन समस्त ॥
पूजिते झाले गुरुखें ॥६४॥
म्हणती धन्य धन्य संनदना ॥
आत्मावबोधपरिपूर्णा ॥
तव प्रसादें निजगुह्य खुणा ॥
ह्नद्रतनिधाना पावलो ॥६५॥
नारदाप्रति ऋषिसमर्थ ॥
जो श्रीनारायण साक्षात ॥
ऎसें कथूनियां तद्‍वॄत्त ॥
बोले इत्यर्थ तो ऎका ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP