मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ४१

वेदस्तुति - श्लोक ४१

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


दुपतय एव ते न ययुरंतमनंततया त्वमपि यंदतरांऽडनिचया ननु सावरणा: ॥
ख इव रजांसि वांति वयसासहयच्छ्रुतयस्त्वयि हि फ़लं त्यतन्निरसनेन भवन्निधना: ॥४१॥ (२८*)

॥ टीका ॥
श्रुति म्हणती भो भगवंता ॥
स्वर्गादि लोकपति जे तत्वता ॥
न पावतीच तुझिया अंता ॥
ब्रह्यादिक ही अतिवत्ते ॥१२॥
कां म्हणोनि म्हणसी जरी तरी जे अंतवंत वस्तु पुरी ॥
ते कांहींही नव्हती निर्धारीं ॥
नेणिजे सुरवरीं यास्तव कीं ॥१३॥
असो नेणती ब्रह्यादि द्युपति ॥
परंतु आपुला शेवट निश्चिती ॥
तूंही नेणसी सर्वज्ञमूर्ति ॥
हें आश्चर्य किती मानावें ॥१४॥
जरी म्हणसी येणें अज्ञता ॥
मज प्राप्त झाली कीं सर्वथा ॥
तरी सर्वज्ञता सर्वशक्तिता ॥
कैची तत्त्वता मजलागीं ॥१५॥
म्हणोनि अनंत या पदेंकरुन ॥
अर्थ ऎसा प्रतीयमान ॥
अंत नाहीं तुजलागून ॥
मां कोठून जाणावा ॥१६॥
शशविषाण कळलें नाहीं ॥
खपुप्प पाहिलें नसे काहीं ॥
मॄगजळस्वादुरव न गमे ह्नदयीं ॥
म्हणोनि कांहीं मूर्खत्व ॥१७॥
याचेन कळणें सर्वज्ञता ॥
अथवा अप्राप्ति सर्वशक्तिता ॥
बाधित करी हे वक्तॄता ॥
अनॄत सर्वथा नास्तिक्यें ॥१८॥
नाहीं जें त्या जाणिले काय ॥
अथवा कधीं तें पाविजताहे ॥
म्हणोनि अनंत तूं निश्चयें ॥
केवळ अद्वय परमात्मा ॥१९॥
तें अनंतत्व कवणेपरी ॥
हेंही निश्चयें अवधारीं ॥
आश्रर्य वाटतसे निर्धारीं ॥
केवढी थोरी तव रुपीं ॥२०॥
उत्तरोत्तर दशगुणाधिक ॥
ज्यांसी आवरणें महदादिक ॥
ते ब्रह्याण्डनिचय सम्यक ॥
फ़िरती अनेक तुजमाजीं ॥२१॥
कालचकें ब्रह्यांडगोळ ॥
गणनारहित एक वेळ ॥
परि भ्रमति अति विशाळ ॥
परि पर्यायें केवळ नाहीं कीं ॥२२॥
एक ब्रह्याण्ड काळानुसार ॥
होऊनि गेलियानंतर ॥
मग परिभ्रमें ब्रह्याण्ड अपर ॥
ऎसा प्रकार नसे हा ॥२३॥
एकदाचि अवघीं फ़िरती ॥
तुजमाजीं भो ब्रह्याण्डपति ॥
जेंवि आकाशीं रज जे रीती ॥
समीरें फ़िरती समुच्चयें ॥२४॥
ज्यास्तव ऎसें अनंतत्व ॥
म्हणोनि श्रुति स्वयमेव ॥
तुझ्या ठायीं फ़ळती सर्व ॥
तव रुपभाव पावूनी ॥२५॥
फ़ळती म्हणिजे तात्पर्यवॄत्ति ॥
करुनि अभिप्रायें सूचिती ॥
अनुभवें समाप्त होती ॥
परी साक्षात न वदती ऎसा हा ॥२६॥
कीं सगुणाचे गुण अनंत ॥
निर्गुण तो अगोचर निश्चित ॥
यास्तव न वदवे यथास्थित ॥
वचनें विशद श्रुतीसी ॥२७॥
तरी अपदार्थीं तात्पर्य कैसें ॥
घडे म्हणाल जरी विशेषें ॥
कीं पदार्यत्वचि ॥
मुळीं नसे ॥
कीं तात्पर्यवशें श्रुति फ़ळती ॥२८॥
तरी पदार्थासीच आहे विशद ॥
वाक्यार्थत्व हें प्रसिध्द ॥
परि तीं वाक्येंही असती द्विविध ॥
विधिमखें आणि निषेमुखें ॥२९॥
त्यांमाजिं विधिमुख वाक्यीं केवळ ॥
नियम हा घडेल सबळ ॥
परि निषेधमुखीं निखळ ॥
न घडे प्रात्र्जळ एकविध ॥३०॥
अपदार्थीही तात्पर्य ॥
निषेधमुखांचें पूर्ण होय ॥
म्हणाल हे द्विविधवाक्यसोय ॥
कैसी काय तरी अवधारा ॥३१॥
निषेधवर्जित प्रवॄत्तिकारक ॥
जेंवि हा घट हा पट हें हाटके ॥
हें जळ ही भू हा पावक ॥
इत्यादि वाक्यसंकेत ॥३२॥
यांसि विधिमुख म्हणावें सहज ॥
इहीं वाच्य तो द्रव्यपुंज ॥
त्यासी वाक्यार्थत्व हे पैज ॥
पडे उमज विचारें ॥३३॥
ज्या ज्या पदार्थीं वाक्यें ॥
असती तद्रूपा सूचकें ॥
तीं तीं तैसींच बलिष्ठ अनेकें ॥
विधिविवेकें अनादि ॥३४॥
हा घट ऎसें बोलतां वचन ॥
अर्थ उमजे कंबुग्रीवमान ॥
कीं हें जल वदतां ज्ञान ॥
द्रवशीळ पूर्ण रसरुप ॥३५॥
एवं विधिमुखवाक्यांचें तात्पर्य ॥
पदार्थीच घडे यथान्वय ॥
अपदार्थी यांची सोय ॥
सहसा न होय प्रबोधक ॥३६॥
आणि नकारादि निषेध- ॥
पूर्वक जीं वाक्यें विशद ॥
तीं निषेधमुखें प्रसिध्द ॥
जाणिजे शुध्द विवरणें ॥३७॥
न तदॄभूमि न तत्तोय ॥
न कॄष्ण न श्वेत होय ॥
इत्यादि वाक्यांचें तात्पर्य ॥
घडे नि:संशय अपदार्थीं ॥३८॥
म्हणोनि निषेधमुखवाक्यीं नियम ॥
तो सहसा नाहींच निस्सीम ॥
उपाधि निरसूनियां अधम ॥
राहिलें उत्तम तें वस्तु ॥३९॥
आतां हाचि अर्थ सुनिश्चित ॥
अतन्निरसनेन या पदें व्यक्त ॥
जाणती केवळ धीमंत ॥
ऎका श्रुत्यर्थ अन्वयें ॥४०॥
अतन्निरसन म्हणिजे काय ॥
तरी जें जें कांहीं दृश्य होय ॥
तें तें निरसिजे विकारमय ॥
मग अनुभवें अवाच्य अवगमिजे ॥४१॥
तें कळण्याहूनि अन्यत ॥
न कळ्ण्याहूनि ही निश्चित ॥
कीं कळे तें तें नाशवंत ॥
न कळे तें बाधित शून्यत्वें ॥४२॥
आणि धर्माहूनि तें अन्यमत्र ॥
अधर्माहूनि तें अन्यत्र ॥
अधर्माहूनि जें स्वतंत्र ॥
धर्माधर्म ते गुणविकार ॥
निर्गुण चिन्मात्र अद्वैत ॥४३॥
आणि कॄताकृताहूनि भिन्न ॥
कॄत तें मायिक साधारण ॥
अकृत मोक्ष निश्चयेंकरुन ॥
तो बंध साक्षेप केवळ ॥४४॥
अस्थूळ अनणु निश्चयें ॥
म्हणिजे स्थूळ सूक्ष्म जें नोहे ॥
सूक्ष्मत्वें अणूमजींहीं आहे ॥
आणि गगनादि समाये ज्यामाजीं ॥४५॥
ऎसीं निषेधमुखवाक्यें ॥
इत्यादि प्रकारें अनेकें ॥
तिहीं तात्पर्य वृत्तिविविकें ॥
खुणेनें नेतकें श्रुति कथिती ॥४६॥
तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्य ॥
इत्यादि विधिमुखवाक्यें हा नियम ॥
यांचे लक्षणा-वृत्तीनें परम ॥
होय पर्यवसान परब्रह्यीं ॥४७॥
शाखेवरुनि चंद्रीं लक्ष ॥
कीं वृक्षावरुनि मागे प्रत्यक्ष ॥
तेंवि तत्त्वमस्यादि श्रुति अशेष ॥
ज्या वर्तती नि:शेष तत्पर ॥४८॥
त्या लक्षणावृत्ती करुन ॥
समाप्ति पावती आपण ॥
परि वाच्यत्वें हें ऎसें म्हणोन ॥
तत्व निर्गुण न जाणविती ॥४९॥
अथवा इदं न इत्यादि निषेधीं ॥
केवळ शून्यचि न बोधिती कधीं ॥
यास्तव भवनिधना ऎशी शाब्दी ॥
स्वरुपावधि पावलिया ॥५०॥
म्हणिजे तुझ्या ठायीं समाप्ति ज्यांची ॥
अतन्निरसनें करुनि साची ॥
कीं निरवधि निषेधाची ॥
संभूति कैंचि सर्वथा ॥५१॥
यास्तव अवघिभूत तूं परमात्मा ॥
त्या तुझ्या ठायीं सर्वोत्तमा ॥
श्रुति फ़ळती जाणोनि सीमा ॥
हा इत्यर्थ सुगम येथींचा ॥५२॥
येचि विषयीं निदर्शन ॥
दाविजेल साधारण ॥
जेणें तात्पर्य लक्षण ॥
उमजे संपूर्ण नि:शब्द ॥५३॥
जेंवि कां पुरुष सुखावाप्ति ॥
झालिया उषेसि सख्या पुसती ॥
कवण तव भर्ता आम्हां कथीं ॥
परि कळोनि निश्चिती न वदवे ॥५४॥
तंव ते चित्रलेखा सुजाण ॥
चित्रनि दाविलें त्रिभुवण ॥
पृथकत्वें पुसे आपण ॥
पुरुषरत्न त्यामाजी ॥५५॥
ते जो जो दावि खुणावोनी ॥
येरी निषेधी ना म्हणोनी ॥
शेवटीं अनिरुध्दमूर्ति देखोनी ॥
झाली लाजोनी अधोमुखी ॥५६॥
जेथ कुंठित झाली निजवाणी ॥
सखींस जाणवलें आपुलें मनीं ॥
हाचि इचा भती म्हणोनी ॥
कथिलें न कथूनि उषेनें ॥५७॥
निषेधासी अवधिभूत ॥
अनिरुध्दस झाला मूर्तिमंत ॥
निषेधवाणी सफ़ळित ॥
झाली जेथ प्रत्ययें ॥५८॥
तेंवि श्रुतींही परमपद ॥
पॄथ्व्यादिमाया-निषेध ॥
करुनि दर्शविलें नि:शब्द ॥
होऊनि विशद तदवधि ॥५९॥
पावोनि निजात्मस्वरुप ॥
श्रुति होती विगतजल्प ॥
व्यतिरेकवाणीचा आटोप ॥
निर्विकल्पस अनुभवें ॥६०॥
ऎसे सनंनोक्त श्रुति-व्याख्यान ॥
नारदाप्रति श्रीनारायण ॥
षड्‍गुणैश्वर्यसंपन्न ॥
कथूनि आपण बोलतसे ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP