मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ३३

वेदस्तुति - श्लोक ३३

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


विजितह्नषीकवायुभिरदांतमनस्तुरगं इह यतंति यंतु मतिलोलमुपायखिद: ॥
व्यसनशतान्विता: समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाज संत्यकृतकर्णधरा जलधौ ॥३३॥ (२०)

॥ टीका ॥
इत्यादि श्रुतिवचनीं विश्वास ॥
न धरुनि करिती ब्रह्याभ्यास ॥
तैं मनोनिग्रह न धडे त्यांस ॥
साधनसोस बहु करितां ॥५१॥
ह्नषीकें म्हणिजे इन्द्रियगण ॥
वायुशब्दें बोलिजे प्राण ॥
यमदमें करितां उभयां दमन ॥
अजिंक्य मन त्यांतेंहि ॥५२॥
दमें इन्द्रियांलागीं दमिती ॥
प्राणायामें प्राणां यमिती ॥
मन अनावर त्यांही प्रति ॥
श्रमतां स्वमती वश नोहे ॥५३॥
अनावर मानस तुरंगम ॥
अदान्त दमितां अति दुर्गम ॥
त्यातें स्वमती करुनि श्रम ॥
साधक अधम दमूं पाहती ॥५४॥
वायु अनावर गगनोदरीं ॥
मनस्तुरंगम तयाचिये परी ॥
चंचलत्वें नियमा न धरी ॥
साधनकुसरी श्रम करितां ॥५५॥
अनाश्रयून सद्‍गुरुचरण ॥
क्लेशें करिती मनोनिग्रहण ॥
ते नर होती खेदभाजन ॥
व्यसनीं निमग्न होत्साते ॥५६॥
बहुधा होती व्यसनाकुळ ॥
साधन खेदें अति व्याकुळ ॥
न निस्तरतां भवाब्धि-जळ ॥
दु:ख बहळ अनुभविती ॥५७॥
नावाडिया वांचूनि वाणी ॥
पदार्थ घालूनियां जलयानीं ॥
प्रवेशती जे सिन्धुजीवनीं ॥
त्यां लागूनी गति जैसी ॥५८॥
तैसे स्वमतिसाधक दुष्ट ॥
अनेक साधनीं पावती कष्ट ॥
आत्महत्यारे ते स्पष्ट ॥
विवेकभ्रष्ट म्हणोनियां ॥५९॥
येचि अर्थी संमत श्लोक ॥
स्वमुखें बोलिला जो श्रीशुक ॥
सज्जन परिसोत तो सम्यक ॥
तारक देशिक आश्रयिज ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP