मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक ७ व ८

वेदस्तुति - श्लोक ७ व ८

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


तत्रोपविष्टमृषिभि: कलापग्रामवासिभि: ॥
परीतं प्रणतोऽपृच्छदिदमेव कुरुदूह ॥७॥


॥टीका॥ त्यातें देखोनि विधिनंदने ॥ दण्डप्राय अभिवंदनें ॥
प्रसन्न करुनि हेंचि प्रश्नें ॥ रहस्य पुसिलें कुरुवर्या ॥३०॥
ऐकोनि नारदाचा प्रश्न ॥ कल्पस्थायी तपोधन ॥
केवळ जो नरनारायण ॥वदला वचन तें ऐका ॥३१॥

तस्मै ह्यवोचद्भगवानृषीणां श्रृण्वतामिदम्‍ ॥
यो ब्रह्मवाद: पूर्वेषां जनलोकनिवासिनाम्‍ ॥८॥


॥टीका॥ मग त्या नारदाकारणें ॥ षड्‍गुणैश्चर्यसंपन्नें ॥
जें बोलिलें नारायणें ॥ तें हें श्रवणें अवधारीं ॥३२॥
कलापग्रामनिवासी मुनि ॥ तेही ऐकत असतां श्रवणीं ॥
इतिहासरुपा पुरागती ॥ गाथा कथिली ब्रह्मपरा ॥३३॥
म्हणाल कैसी गाथा कोण ॥  तरी जनलोकवासी श्रेष्ठ मुनिजन ॥
पूर्विलाहूनि पुरातन ॥ संवाद पूर्ण जो त्यांच्या ॥३४॥
जो ब्रह्मपर उपनिषध्दोध ॥ केवळ श्रुतींचा अनुवाद ॥
नारदप्रति तो ब्रह्मविद ॥ वदला विशद नारायण ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP