मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १२

वेदस्तुति - श्लोक १२

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ सनंदन उवाच ॥  
स्वसृष्टमिदमापीय शयानं सहशक्तिभि: ॥
तदंते बोधयांचकुस्तल्लिंगै: शुतय: परम्‍ ॥१२॥

॥टीका॥ स्वमायेचा अंगीकार ॥ करुनि सृजिलें चराचर ॥
तें स्वसृष्ट विश्व ईश्वर ॥ प्रासुनि सादर शयन करी ॥६८॥
सृजनावनात्मक ज्या शक्ति ॥ तिहीं सहित करी सुषुप्ति ॥
तया प्रळयाचियेहि अंतीं ॥ पुन्हा जागृति जै लाहे ॥६९॥
प्रथम जागृति विश्वास तेथ॥ श्रुतिकदंबातें प्रसवत ॥
मग त्या श्रुति प्रबोधित ॥ बंदिजनवत प्रभुवर्या ॥७०॥
जे कां वास्तव परब्रह्म ॥ तेथ पूर्णस चैतन्यावगम ॥
करुनि तल्लिंगीं शसिती परम ॥ गुणगण निस्सीम ते ऐका ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP