TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २६

वेदस्तुति - श्लोक २६

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


वेदस्तुति - श्लोक २६
सदिव मनस्त्रिवृत्त्वयि विभात्य सदामनुजात्सदभिमॄशंत्यशेषमिदमात्मतयाऽऽत्मविद: ॥
नहि विकृतिं त्यजंति कनकस्य तदाऽऽत्मतया स्वकॄतमनुप्रविष्टमिदमात्मतयाऽवसितम् ॥२६॥ (१६)

॥ टीका ॥
तरी अघटितघटनापटियसी ॥
तुझे मायेचि ख्याति ऎसी ॥
तिणें सृजिलें मानसासी ॥
त्रिवृत् जयासी कवि म्हणती ॥४४॥
मोह प्रकाश आणि प्रवृत्ति ॥
या मनाच्या त्रिगुण वृत्ती ॥
एतद्‍द्वारां कल्पना भ्रान्ति ॥
जगत्प्रवॄत्ति स्फ़ुरवितसे ॥४५॥
सिन्धुगर्भनिवासी यवन ॥
विविध काचक्रिया उत्पन्न ॥
करिसी त्यांमाजी पाहतां नयन ॥
देखती भ्रमोन अनेकता ॥४६॥
एक पदार्थ बहुता दिसे ॥
कीं दूरस्थ तें निकट भासे ॥
किंवा मयूरपिच्छा ऎसे ॥
अनेक रंग प्रकाशवी ॥४७॥
तेंवि मनाचिया करुपना ॥
जगजगदीशसंभावना ॥
पात्र्द्चभौतिक स्फ़ुरे नाना\ ।
विपरीत  ज्ञानामाजिवडें ॥४८॥
तें काय तेथें सत्य असे ॥
नसोनि साचाचि ऎसें भासे ॥
काय निमित्त म्हणसी ऎसें ॥
आस्तिवय वसे तुझेनि तें ॥४९॥
डोळ्यांमाजी प्रकाश नसतां ॥
तरी काचद्वारां अनेकता ॥
कैंची कोण प्रकाशिता ॥
श्रीभगवंता हें तैसें ॥५०॥
तुझिया वास्तव अस्तिक्य वशें ॥
मन कल्पितां आस्तिक्य दिसे ॥
पृथक् सत्तत्व पाहतां गवसे ॥
तरी मग कायसें मिथ्यात्व ॥५१॥
व्यष्टिप्रपंचनिष्ठां पुरुषां ॥
मनोभ्रान्तीचा बाधी वळसा ॥
समष्टिवंता श्रीपरेशा ॥
पृथक्सत्तत्व जरी म्हणसी ॥५२॥
तरी मायामात्र जो विलास ॥
समष्टिप्रपंच म्हणिजे त्यास ॥
त्यामाजी अभिव्याप्त परेश ॥
वस्तुता फ़ोस दोन्हीहि ॥५३॥
येथही शंका उपजे एक ॥
जे भ्रान्तासी विश्वसाच देख ॥
गमे तैसेचि सत्य पृथक ॥
आत्मवेत्त्यांही स्फ़ुरतसे ॥५४॥
तरी कैसें या असत् म्हणिजे ॥
यदर्थी उत्तर अवधारिजे ॥
त्रिपुटीसहित यातें सहजे ॥
सन्मात्रत्वें कवि बुझती ॥५५॥
जेवि कनकाचा खंडेराव ॥
श्वान सेवक तुंरुग देव ॥
तारतम्यें हे भजक भाव ॥
सोवनीं सर्व कनक म्हणे ॥५६॥
असन्मात्रा सन्मात्र बोध ॥
कैसा मानिती आत्मविद ॥
भ्रान्त भाविती बहुधा भेद ॥
तें या अभेद केंवि गमे ॥५७॥
तरी जे उपादान कारण ॥
तद्रूपे तेंचि प्रतीयमान ॥
बहुधा अंलकारी सुवर्ण ॥
एक असोन बहु भासे ॥५८॥
मेखळेचिया पेटियांवरी ॥
सिंह व्याग्र मयुर कुसरीं ॥
आटूनि वेगळे निघते जरी ॥
तरी ब्रह्यीं दुसरी सॄष्टी असो ॥५९॥
घटशरावीं मृभ्दाण्डपंक्ती ॥
कार्यरुपें अनेक गमती ॥
कारण रुपें अवघी माती ॥
ब्रह्यप्रतीति तेंवि बुधा ॥६०॥
कनकविकृती जेंवि नग ॥
ब्रह्यविकृति तेंवि जग ॥
ज्ञानी वास्तवबोधें चांग ॥
तेथ अव्यंग अभिरमती ॥६१॥
म्हणाल ब्रह्यीं विकृति कैसी ॥
तरी स्वकल्पितें विश्वाभासी ॥
अनुप्रवेश जो पुरुषासी ॥
जेविं गगनासी घटगर्भी ॥६२॥
जरी सत्य ज्ञान ब्रह्य अनंत ॥
किंचित अनेकता नाहींच येथ ॥
अनेकता जे भ्रमनिर्मित ॥
मानी ययार्थ जो कोणी ॥६३॥
तो मरमरुं वारंवार ॥
पुन:पुन्हा जन्म फ़ार ॥
पावूनि भोगी दु:ख घोर ॥
ऎसा निर्धार श्रुतींचा ॥६४॥
ऎसिया प्रकारें भगवंताची ॥
वास्तव प्रतिपादना जरी साची ॥
तरी तद्विपयिक ज्ञानप्राप्तीची ॥
सुलभ सिध्दि असतां पैं ॥६५॥
मग भक्तीचें प्रयोजन काय ॥
ऎसा शंकेसी होतां ठाय ॥
तत्परिहारीं शुकाचार्य ॥
वदतां होय तें ऎका ॥६६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-23T01:51:42.3330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Current mafket rate

 • चालू बाजार भाव 
RANDOM WORD

Did you know?

नजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.