मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक २

वेदस्तुति - श्लोक २

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥श्रीशुक उवाच॥
बुध्दींद्रियमन: प्राणाज्जनानामसृजत्प्रभु: ॥
मात्राऽर्थ च भवार्थं च आत्मनेऽकल्पनाय च ॥२॥


॥टीका ॥ साद्यंत नृपाची ऐकोनि शंका ॥ कथनीं परमाहलाद शुका ॥
विवरुनि उत्तर वदला निका ॥ सदर ऐका तें आतां ॥६०॥
महासर्वाप्ययाचें अंतीं ॥ भौतिकें भूतीं लीनें होती ॥
भूतीं आश्रयितां प्रकृति ॥ गौणा प्रकृति साभ्या ये ॥६१॥
तैं मग निर्गुण निराकार ॥ ब्रह्म केवळ निराकार ॥
तेथ शब्दांचा संचार ॥ न घडे साचार कुरुवर्या ॥६२॥
एवं शंका अंगीकारणें ॥ मान देऊनि नृपाचे प्रज्ञे ॥
शंकापरिहार कोण्या गुणॆं ॥ करी तें श्रवणीं अवधारा ॥६३॥
पुढती सृजनाचा अवसर ॥ होतां पूर्णत्वें ईश्वर ॥
शुध्द सत्वात्मक साचार ॥ प्रकृति पर स्वयें होय ॥६४॥
तैं पकृत्यंत: पाती ॥ प्रसुप्त प्राचीन जीवपंक्ति ॥
तयां यथापूर्व संसृति ॥ प्रभु स्वशक्ति प्रवर्तवी ॥६५॥
पूर्वसंस्कारवंत जीव ॥ प्रकृति माजी लीन सर्व ॥
तयां लिंगशरीर देऊनि देव ॥ करी सावयव संकल्पे ॥६६॥
दशेंद्रियें पंचप्राण ॥ मनोबुध्दिसहीत जाण ॥
सत्रा कळांचें लिंगपूर्ण ॥ जीवां लागून सृजी प्रभु ॥६७॥
लिंगशरीर लाहतां जीव ॥ विपरीत ज्ञानाचा संभव ॥
विषयात्मक जे दृश्य भाव ॥ कवळी वास्तव विसरुनि ॥६८॥
पूर्वसंस्कारें संसृति ॥ ऐसी प्राप्त जीवां प्रति ॥
तेथ प्रभु करुणामूर्ति ॥ स्वयें निवृत्ति उव्दोधी ॥६९॥
लक्षुनि जीवाचें कल्याण ॥ लिंगदेहाचें करी सृजन ॥  
त्यामाजी चतुर्विध प्रयोजन ॥ योजी संपूर्ण बीजत्वें ॥७०॥
लिंगदेह लाहतां जीव  ॥ स्वयंभ विषयसेवनीं धांव ॥
तदर्थ स्थळ सावयव ॥ कवळी स्वयमेव आत्मत्वें ॥७१॥
एवं विषयसेवनासाठीं ॥ पडिली लिंगदेहाशीं गाठी ॥
त्यामाजी सांसारिक रहाटी ॥ कर्मपरिपाठी प्रभु बोधीं ॥७२॥
तया कर्मफलाचा भोक्ता ॥ लाहे लोकान्तरें तत्वता ॥
संपादूनी शुभ सुकृता ॥ हेही स्वसत्ता प्रभूची ॥७३॥
एवं विषयार्थ भवार्थ आत्मार्थ  । प्रभु लिंगें जीवां देत ॥
निष्कामभजनें तेथ निवृत्त ॥ अकल्पनार्थ त्यालागीं ॥७४॥
कल्पनेचा अवमान होतां ॥ अपवर्ग स्वत: सिध्द आइता ॥
ऐसी जीवांची सर्व चिंता ॥ पूर्वीच तत्वता प्रभु वाहे ॥७५॥
एवं धर्मार्थ- काम-मोक्ष ॥ जीव अनुभवील अशेष ॥
ऐसा प्रभूचा कटाक्ष ॥ कृपा विशेष लक्षुनी ॥७६॥
तस्मात्‍ जीवांचि  कारणें ॥ सृष्टयादिकीं प्रवर्तणें ॥
घडे ईश्वरा सर्वज्ञपणॆं ॥ तेंचि श्रवणॆं अवधारीं ॥७७॥
जीवांसी अविद्यात्मक आवरण  । ह्मणॊनि पावती संसरण ॥
मायावरणातीत पूर्ण ॥ प्रभु म्हणोन नित्य मुक्त ॥७८॥
प्रभु मायेचा नियंता ॥ अनंतगुणीं परिपूर्णता ॥
असोन न वचे गुणातीतता ॥ अमळ सत्ता संतत पैं ॥७९॥
प्रभूतें आवरुं न शकती गुण ॥ यालागीं नित्य तो निर्गुण ॥
साक्षी स्वसंवेद्य सर्वज्ञ ॥ सर्व शक्तिमान्‍ सर्वात्मा ॥८०॥
सर्वोपास्य सर्वनियंता ॥ सर्व कर्मफलाचा दाता ॥
सर्व मंगलायतन तत्वता ॥ सच्चिदानंद भगवंत ॥८१॥
इत्यादि विशेषणीं श्रुति ॥ प्रभुचें वैशिष्टय प्रतिपादिती ॥
तो श्रुतिसमुच्चय लिहितां ग्रंथीं ॥ अवर्ण पठती तैं बाध ॥८२॥
अंत्य अवर्ण अनधिकारी ॥ केवळ श्रुतींच्या उच्चारमात्रीं ॥
पातित्य पावती तेचि अवसारीं ॥ पडती दुस्तरीं घोर नरकीं ॥८३॥
यालागीं त्यांचिये करुणेस्तव ॥ विशेषणमात्रीं श्रुतींचा भाव ॥
सूचिला तो अभिप्राव ॥ महानुभाव जाणती पैं ॥८४॥
प्रभू परमात्मा पूर्ण चैतन्य ॥ सर्वग समष्टिप्रपंचवान ॥
ब्रह्माण्डान्त: - पाती गहन ॥ केवळ सर्वज्ञ स्वसंवेद्य ॥८५॥
जीव व्यष्टिप्रपंचमात्र ॥ परिमित सप्तवितस्तिगात्र ॥
किंचिज्ज्ञ सुखदु:खपात्र ॥ स्वकर्मतंत्र फळभोक्ता ॥८६॥
ऐसियां जीवांसी तत्वता ॥ ईश्वरपदीं सामरस्यता ॥
श्रुति बोलती प्रभूच्या सत्ता ॥ तत्त्वंपदार्थ विवरणें ॥८७॥
तत्त्वंपदार्थां उभयांप्रति ॥ सामानाधि- करण्यप्रीति ॥
सोपाधिकां समान म्हणती ॥ परि तें निश्चिती च घडे पैं ॥८८॥
मीमांसकांचिया मतें ॥ वैश्वदेवी आमिक्षेते ॥
सामानाधिकरण्य निरुतें ॥ पदार्थबोधें तध्दितींच्या ॥८९॥
विश्वदेव देवता पृथक ॥ आमिक्षा द्रव्य तदात्मक ॥
हा सामानाधिकरण्यविवेक ॥ सोपाधिक मैमांसी ॥९०॥
खाज्यं यष्टयश्व म्हणते वेळे ॥ पदार्थी सामानाधिकरण्य मिळे ॥
तत्त्वंपदार्थी मोकळें ॥ तेंवि हें न विवळे साम्यत्व ॥९१॥
तत्त्वंपदार्थ दोन्ही भिन्न ॥ यालागीं न घडे सामानाधिकरण्य ॥
तत्पद पूर्णत्वें सर्वज्ञ ॥ त्वंपद अल्पज्ञ कर्मभाक्‍ ॥९२॥
तैंसेचि सहज उत्पळनीळ ॥ द्रव्यगुणांचा स्वयंभ मेळ ॥
निरुढ अजहल्लक्षणा केवळ ॥ तत्त्वंपदमेळ तेंवि नव्हे ॥९३॥
करकाद्रव्य श्वेतगुण ॥ सहज दोहीचें जननमरण ॥
तत्वंपदीं तैसें जाण ॥ सामानाधिकरण्य घडेना ॥९४॥
तत्पदांचे विशेषण ॥ सहसा त्वंपद नसे जाण ॥
आणि सहजत्व उभयालागून ॥ न घडे म्हणून विरुध्दार्थे ॥९५॥
त्वंपद अज्ञान कर्मतंत्र ॥ केवळ जन्ममरणाचें पात्र ॥
तत्पद नित्यमुक्त अज अजस्त्र ॥ विरुध्द प्रकार हा उभयां ॥९६॥
तैसीच कुसुमितद्रुमा गंगा ॥ करितां जहल्लक्षणाप्रसंगा ॥
तत्त्वंपदीं न पवे योगा ॥ सामानाधिकरण्य हें ॥९७॥
गंगातटीं कुसुमितद्रुम ॥ कुसुमितद्रुमा यास्तव नाम ॥
तत्त्वेंपदीं कोण तं धाम ॥ काय सांडून लक्षावें ॥९८॥
यास्तव तत्त्वंपदीं उभय चैतन्य ॥ लक्षुनि सामानाधिकरण्य ॥
जहदजहल्लक्षना पूर्ण ॥ येथ घट्मान श्रुतिप्रणीत ॥९९॥
जेंवि शत्रु भंगिले स्वहतीं ॥ तो हा येथ ध्यानस्थ नृपती ॥
जहदजल्लक्षणा निगुती ॥ ऐक्य साधिती उभयांतें ॥१००॥
सन्नध्द बध्द स्थारुढ ॥ चतुरंगिणी सेना दृढ ॥
शत्रुमर्दनकर्म अवघड ॥ त्यागून रुढ उपाधि हो ॥१॥
जहत्‍ म्हणिजे या उपाधित्यागें ॥ अजहत्‍ नृपमात्र घॆइजे आंगें ॥
ध्यानीचे विडंबन तें आवघें ॥ त्यजितां नृपाडें ऐक्य घडॆ ॥२॥
तेंवि समष्टिप्रपंच मायोपाधि ॥ व्यष्टिप्रपंच अविद्योपाधि ॥
या जीवेश्वरांच्या उभयोपाधि ॥ निरसतां शुध्दि ऐक्यता ॥३॥
उपाधि विरुध्दांशत्याग ॥ शुध्द लक्ष्यें चिदंशयोग ॥
घडे म्हणतां पूर्वीं वियोग ॥  कधींही होता सस्कुळा ॥४॥
उपाधींचिया आवरणें ॥ भासलीं होतीं भिन्नप्रणें ॥
तीं निरसतां  ऐक्य करणें ॥ लागे काय नूतन पैं ॥५॥
तस्मात्‍ उभय चैतन्या ऐक्य ॥ उपाधि निरासें घडे सम्यक्‍ ॥
उपाधिनाशें उभयात्मक ॥ अभिन्न एक परब्रह्म ॥६॥
एवं निर्गुणीं पर्यवसान ॥ । जहदजहल्लक्षणेंकरुन ॥
उभय चैतन्या घडे पूर्ण ॥ श्रुतिप्रमाण गुरुवचनीं ॥७॥
अस्थूळादि श्रुतींचीं वचनें ॥ उपाधिनिषेधाकारणॆं ॥
लूता तंतुसृजनग्रसनें ॥ तेंवि क्रीडणें प्रभूतें ॥८॥
जेथवरी शब्दाची प्रवृत्ति ॥ तेथवरी वदोजी नेति नेति ॥
मौनमुद्रा धरोनी अंतीं ॥ श्रुति बोधिती सन्मात्र ॥९॥
वास्तव आत्मावगमें अंती ॥ अतन्निरसनें श्रुति फळती ॥
चपळा स्फुरोनि घनीं विरती ॥ तेंवि सांठवती परब्रह्मीं ॥१०॥
उपासनादि श्रुतींचीं वाक्यें ॥ झणीं मानिसी परमार्थ विमुखें ॥
सृष्टयाद्यवलंबनें सम्यकें ॥ ज्ञानसाधनें सन्मय पैं ॥११॥
तस्मात्‍ ब्रह्मपर साद्यंत निगम ॥ ब्रह्मप्रापक सर्वां सुगम ॥
न बोधतां न वचे भ्रम ॥ यास्तव दुर्गम कर्मजडां ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP