मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति|
श्लोक १४

वेदस्तुति - श्लोक १४

' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव  स्वामींनी लिहीलेली टीका आहे.


॥ श्रुतय ऊचु: ॥
जय जय जह्यजामजित दोषगृभीतगुणां त्वमसि यदात्मना समवरुध्दसमस्तभग: ॥
अघजगदोकसामखिलशक्त्यवबोधक ते कचिदजयाऽऽ त्मना च चरतोऽनुचरेन्निगम: ॥१४॥(१)*

॥टीका ॥ अजितशब्दें परमेश्वर ॥ सगुण निर्गुण अगोचर ॥
त्यास संबोधी श्रुतींचा निकर ॥ जयजयकार करुनियां ॥७६॥
तूं अव्दितीय पूर्ण अनंत ॥ माया द्यावरणीं अनावृत ॥
स्वबोधशाळी सदोदित ॥ यालागी अजित संबोधन ॥७७॥
जयजयकारें आम्रेडितीं ॥ भो भो अजिता श्रुति म्हणती ॥
विजयोत्कर्षे तव प्रवृत्ति ॥वर्तो निश्चिती सर्वत्र ॥७८॥
कोणत्या व्यापारें करुन ॥ जयोत्कर्षाचें आविष्करण ॥
म्हणसी तरी तें करितों कथन ॥ ऐकें सद्‍गुणसुखसिन्धु ॥७९॥
अग म्हणिजे स्थावरनिकर ॥जंगमात्मकांचा समुदाय चर ॥
एवं व्दिविध शरीरधर ॥ जीव अपार तव सृष्ट ॥८०॥
तयां जीवांची अविद्या ॥ अजानामका जे प्रसिध्दा ॥
जहि म्हणिजे तिचिया वधा ॥ स्वसंवेद्या करीं प्रभो ॥८१॥
जीव केवळ चिदाभास ॥ वरपडविले जन्ममरणास ॥
जिणें तयेचा करीं नाश ॥ भो भो परेश प्रभुवर्या ॥८२॥
कैसी वधावी गुणवती ॥ ऐसा संशय न धरीं चित्तीं ॥
तरी ते दोषांच कारण होती ॥ गुणसंतती जियेची ॥८३॥
दोषांकारणॆं जयेचे गुण ॥ जरी तूं म्हणसी कैसे कोण ॥
तरी तयाचें करितों कथन ॥ ऐकें सर्वज्ञ शिखामणे ॥८४॥
हे स्वैरिणी तुझेनि आंगें ॥ थोराहूनि गुणप्रसंगें ॥
निजानंदावरणयोगे ॥ परम पुरुषातें प्रतारी ॥८५॥
तमोगुणें निजज्ञानलोपा ॥ करुनि सुपुप्ति आणी रुपा ॥
तीमाजीं सत्वगुणाच्या दीपा ॥ विपरीतपडपा प्रकाशी ॥८६॥
चित्तचतुष्टय सत्त्व दीपें ॥ उजळे विपरीत बोधकल्पें ॥
तैं रजही मन: संकल्पें ॥ प्राणेन्द्रियगण उभारी ॥८७॥
जीवांसी तें तें करणावरण ॥ करुनि आनंदादि सहजगुण ॥
आवरुनि मिथ्या-विषय-भान ॥ प्रकट दावूनी भांबाची ॥८८॥
मग त्या विषयप्रलोभासाठीं ॥ जीव लागती दृश्या पाठीं ॥
जागृत्यवस्थे स्थूलात्मयष्टी ॥ लाहूनि कष्टी बहु होती ॥८९॥
एवं त्रिगुणात्मक भवजाळीं ॥ गोवनि जीवांची मंडळी ॥
निजानंदा विमुख केलीं ॥ यास्तव वधिली पाहिजे हे ॥९०॥
परप्रतारणाकारणें ॥ स्वैरिणी भरली ही दुर्गुणें ॥
यास्तव जीवांचिये करुणे ॥ संहरणें इयेतें ॥९१॥
झणें  तूं म्हणसी भो भो अजिता ॥ ऐसी स्वरिणी दोषाक्ता ॥
इणॆं मजही सदोष करितां ॥ कोण रक्षिता पैं तेथ ॥९२॥
ऐसें सहसा स्वामी न म्हणें ॥ तूं आत्मत्वें पूर्णपणें ॥
सर्वैश्वर्यै वाहसी पूर्णै ॥ वश करुनि मायेतें ॥९३॥
पुढती शंका करितां श्रुति ॥ म्हणसी जीव कां इतें न मरिती ॥
विवेकविराग्यज्ञानसंपत्ति ॥ संपादूनियां स्वयमेव ॥९४॥
भो भो अजिता यदर्थी एक ॥ अखिल शक्ति तूं अवबोधक ॥
जीवान्तर्गत उध्दोधक ॥ शक्त्युत्कर्ष हाचि तुझा ॥९५॥
अंत:करणा जीवांप्रति ॥ विवेकवैराग्य -ज्ञान संपत्ति ॥
तव प्रेरणेवीण निश्चिती ॥ नोहे श्रीपती स्वातंत्र्ये ॥९६॥
येथ तूं जरी म्हणसी ऐसें ॥ ज्ञानैश्वर्यादि गुणविशेषें ॥
अकुण्ठबोधें मी आथिला असें ॥ जीवां हें नसे काय म्हणोनी ॥९७॥
आणि जीवांकरणें अविद्या बाधे ॥ मज पूर्णातें ते न बाधे ॥
कर्मज्ञानादि शक्त्यवबोधें ॥ म्यां तव्दधें सोडविजे ॥९८॥
म्हणसी यदर्थी प्रमाण काय ॥ तरी हा आमुचा श्रुतिसमुदाय ॥
अन्यप्रमाणाचें कार्य ॥ रुढ नोहे यदर्थी ॥९९॥
जरी तूं म्हणसी गुणातीतीं ॥ कैसी श्रुतीची प्रवृत्ति ॥
तरी श्रुतियात्मक वेदां वसति ॥ असे संतत सन्मात्रीं ॥२००॥
तो तूं सन्मात्र कोणे समयीं ॥ मायावलंबे सृष्टयादिकार्यो ॥
क्रीडसी पाहीं ॥ अचिन्त्यानंतगुणपूर्ण ॥१॥
सत्यज्ञानानंतानंद ॥ चिन्मात्रैकरसें विषद ॥
प्रकटैश्वर्यै क्रीडतां वेद ॥ तवानुलक्षें विचरतसें ॥२॥
तिथे काळीं वदल्या श्रुति ॥ जेथून ये भूतें होती ॥
विरंचीपूर्वी जगदुत्पत्ति ॥ ब्रह्मयाप्रति जो सृजित ॥३॥
तया ब्रह्मयाचिये धिषणे ॥ माजी करी जो वेदप्रेरणे ॥
तया देवातें  मुमुक्षुगणें ॥ शरण होणें श्रुति म्हणती ॥४॥
तो तूं म्हणती देव कैसा ॥ जो आत्मत्वें  स्वप्रकाशा ॥
न सांडुनि माये सरिसा ॥ नित्य मुक्तत्वें क्रीडावान्‍ ॥५॥
मायेमाजी असोनि आपण ॥ मायैश्वर्यगुण प्रकटुन ॥
करी मायेंचें नियमन ॥ सत्यज्ञानब्रह्ममय ॥६॥
जो सर्वज्ञ सर्ववेता ॥ इत्यादि अनेक श्रुतिगणवक्ता ॥
तो निगमकदंब तूतें तत्वता ॥ प्रतिपादितसे भो अजिता ॥७॥
पुन्हा शंका घेऊनि श्रुति ॥ झणें तूं म्हणसी भो श्रीपति ॥
जे चराचरांचा राजा दिवस्पति ॥ कीं अग्रि म्हणती स्वर्गमूर्धा ॥८॥
ऐसे लोकपाळ पृथक्पृथक ॥ निगम प्रतिपाद्य असतां मुख्य ॥
तेथ प्रतिपाद्य मी हा विवेक ॥ केंवि सम्यक विधींवरणॆं ॥९॥
ऐसे न म्हणे भो परेशा ॥ ऐक यदर्थीं परिभाषा ॥
बृहद्‍ब्रह्मचि विश्वाभासा ॥ भासक वांचून आन नसे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP