मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३९ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३९ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३९ Translation - भाषांतर यदि न समुध्दरंति यतयो ह्नदि कामजटा दुरधिगमोऽसतां ह्नदि गतोऽस्मृतकंठमणि:\ ।असुतॄपयोगिनामुभयतोऽप्यसुखं भगवन्ननपगतांतकादनधिरुढपदाद्भवत; ॥३९॥ (२६)॥ टीका ॥श्रुति म्हणती भो भगवंता ॥जे कां यति ह्नदिस्थिता ॥कामसटा भोगान्विता ॥बळिष्टभूता नोत्पाटिती ॥७३॥यति म्हणिजे यत्नशीळ ॥तव प्राप्त्यर्थस जे अळुमाळ ॥परी अंतरी काममूळें सबळ ॥विषयजळ प्राशूनी ॥७४॥ती वासना रुप काममूळें ॥पूर्वाध्यास ज्यां विशाळ आळें ॥देहाहंकारभोगळें ॥सिंची केवळ निरंतर ॥७५॥ऎसीं काममूळें बिलष्ट ॥जरी नोत्पाटिती अंतर्निष्ठ ॥आणि वरिवरी शेवट ॥काम उभ्ट तरुचे ॥७६॥स्त्रीपुत्रादि स्वजन देखा ॥किंवा गॄहादिवृत्तिप्रमुखा ॥या बहि:संग कामशाखा ॥तोडिती अशेखा बहिमुर्ख ॥७७॥परि मूळाचेनि सुरवाडें ॥अनेक उठती जुंबाडें ॥ऎसा नित्य नूतन वाढे ॥हें मूर्खा निवाडें उमजेना ॥७८॥तरी त्या असती दुष्टांलागीं ॥तूं ह्नदसस्थ गॄढ लिंगी ॥अप्राप्त होसी निस्संगसंगी ॥कीं केवळ विरागी नव्हती ते ॥७९॥ह्नदयी असोनी अप्राप्त म्हणणें ॥हें कैसें घडेल बोलणें ॥तरी उमजेल उदाहरणें ॥कॄतव्याख्यानें यथास्थित ॥८०॥जैसा विसरें कंठस्थमणि ॥नाहींच वाटे केवळ मनीं ॥प्राप्त असोनि अप्राप्तपणीं ॥असतां लागूनि तद्वत तूं ॥८१॥एवं अप्राप्त आत्मा तूं जयांसी ॥ते प्राण पोषिती अहर्निशीं ॥असुतॄपयोगी निश्चयेंसी ॥म्हणिजे तयांसी यास्तव ॥८२॥असुतॄप आणि म्हणणें योगी ॥हे आख्या नव्हे तयांजोगी ॥तरी विपरीत नामें वावुगीं ॥काय नसती जगीं इतरांसी ॥८३॥झाडासी आदित्य म्हणती ॥पाहतां न सांपडे रातीं ॥बचनागासि अमॄतें ख्याती ॥सेवितां मरती भक्षक ॥८४॥शिल्पिकशास्त्रा नाम ब्रह्या ॥कीं त्या अर्हता सॄजन कर्मा ॥अज बोलती बोकड-वर्ष्मा ॥कीं तो अजन्मा म्हणावा ॥८५॥राक्षसा संकेत पुण्यजन ॥देखतां मानावा सज्जन ॥वज्री करी पदघर्षण ॥संत्र्कंदन तें होय ॥८६॥पाषाणासी नाम चिरा ॥मस्तकीं ठेवितां दिसे बराअ ॥अयथार्थ ऎशा तया नरां ॥नामनिर्धारा जाणिजे ॥८७॥योगियांचा घेतीए वेष ॥धरिती जनीं तदावेश ॥दंभ दावूनि भाविकांस ॥ठाकिती विशेष कापट्यें ॥८८॥विध्युक्त सांडिला परिग्रह ॥मग जनासि झाले गळग्रह ॥वाढविती आपुला आग्रह ॥दुर्बुध्दिसंग्रह करुनि ॥८९॥भगवीं करुनी मिरविती ॥शरीर आपुलें जगविती ॥गोष्टी सांगूनी झगविती ॥ज्ञान शिकवितो अबळांसी ॥९०॥घर सांडूनिया हठें ॥मठ करुनि राहती मोठे ॥मेळवूनी शिष्य लोठे ॥दाविती मोठें प्रस्थान ॥९१॥स्वस्त्री उपेक्षूनि आवडी ॥शिष्यिणी मेळविती धांगडी ॥धनप्राप्तिं पाहोनी सवडी ॥साधन परवडी दाखविती ॥९२॥लटिकेचि बैसती ध्यानस्थ ॥निणूनि आत्मा ह्नदयस्थ ॥मानस चंचळ भोगासक्त ॥अर्चनीं रत म्हणविती ॥९३॥वरिवरी दाविती विराग ॥गुप्त सेविती अनेक भोग ॥कॄत्रिम नेणोनिया तें सोंग ॥धरुनि अनुराग जन भजती ॥९४॥वरदळ देखोनि खटाटोप ॥भाव धरिती मूर्खकळप ॥पजिती मानूनि योगाधिप ॥उपचार अमूप अर्पिती ॥९५॥अन्नें वसनें उत्तमोत्तम ॥स्त्रकचंदन वनितावर्ष्म ॥तत्सेवनें मानिती शर्म ॥परि नेणती धर्म आपुला ॥९६॥जेथ आपणा नाही अधिकार ॥ते प्रकटिती बहु प्रका ॥करिती कीर्तन उत्साह गजर ॥परि लक्ष समग्र विषयांत ॥९७॥ऎसे विषयी वॄथा पुष्ट ॥भोग सेविती यथेष्ठ ॥पिण्डपोषक क्रियाभ्रष्ट ॥ते आत्ममघ नष्ट जाणावे ॥९८॥म्हणाल भगवद भक्तांचें आचरण ॥सोपाधिक त्र्क्रियावान ॥तद्वत आचरतां या दूषण ॥काय म्हणोन अनुकार ॥परि भिन्न अधिकार उभयांचा ॥१२००॥साध्वी स्वतनु सालंकृत ॥करुनि भर्तारा रंजवीत ॥म्हणोनि इहलोकीं कीर्तिमंत ॥अपवर्ग निश्चित ते पावे ॥१॥अनियमें पुंश्चळी नारी ॥बहुधा स्वतन्रसी शॄंगारी ॥कामवांछी नाना नरीं ॥सौख्य शरीरीं लक्षूनी ॥२॥म्हणोनि उपचार ते चि विपचार ॥दिसती तयेचे दोषाकार ॥निंद्य इहलोकीं ते नार ॥नरक अघोर मग भोगी ॥३॥तेंवि भजनोपाधि करुन ॥साधु तोषविती भगवान ॥अपवर्गेच्छा मनीं धरुन ॥विरक्त होऊन वैषयिकीं ॥४॥दाभ्मिक जनोपाधि दाविती ॥जनासि विविधा रंजविती ॥पूजा तयांची वात्र्छिती ॥ ।सुख भोगिती ऎन्द्रिय ॥५॥असो श्रुति श्रीभगवन्ता ॥स्यांसि दुर्गम तूं ह्नदयीं असतां ॥तरी काय इतुकी चि हानि त्या मता ॥मग विपत्ति होय ते ऎका ॥६॥इन्द्रियपोषक कपटयोगी ॥उभय लोकीं दु:ख त्यांलागीं ॥ते जरी म्हणाल कवणें भंगीं ॥होय तरी श्रुतिगीए अवधारा ॥७॥मृत्यु म्हणिजे अज्ञानप्रचर ॥अंतकनामें हा संसार ॥अहंताममतात्मक सविकार ॥त्रिगुणाकार जो भासे ॥८॥तो आत्मबोधेंवीण अनिवृत्त ॥कीं निरासिला नाहीं च निश्चित ॥यास्तव देहत्मभावें आसक्त ॥विषयसुखार्थ होताती ॥९॥तें विषयसुख साधे धनें ॥म्हणोनि करिती लोकाराधनें ॥धनचन्ताचीं मनोधरणें ॥द्रवाकारणें करिताती ॥१०॥मठासि आलिया धनवंत ॥त्यांचा आदर करिताती बहुत ॥आपण उच्चासनीं महंत ॥ज्ञान वैराग्य बोलती ॥११॥शिष्य भोंवते परिचारक ॥व्यजनचामरछत्रधारक ॥मोरकुंचे ढाळिती एक ॥ऎसे अनेक परिचरती ॥१२॥यावा देखोनि हा स्वतंत्र ॥भजों लागती तावन्मात्र ॥पूजा करुनि इच्छिती मंत्र ॥धनिक तत्पर होत्साते ॥१३॥तंव कांहींएक करुनि मिस ॥तीर्थोद्यापन उत्साह दिवस ॥धन याचिती श्रीमंतांस ॥साहित्य अशेष करा म्हणती ॥१४॥तग ते लोक रजोगुणी ॥ऎकोनि साभिलाष वाणी ॥फ़िरोनि दर्शन न घेती कोण्ही ॥जाणोनि मनीं दाभ्भिकसे ॥१५॥ज्ञान ध्यान आणि चतुरता ॥बहु दिवसांची स्नेहवार्ता ॥हे तेव्हांचि गेली तत्त्वता ॥कांही दे म्हणतां अभिलाषें ॥१६॥जे जे करीत होते स्तुति ॥तेचि निन्दा मुखें वदती ॥ऎकोनि अंतरीं जळाती ॥खेद करिती अतिशयें ॥१७॥मग म्हण हाती गांवचि नष्ट ॥लोक अभक्त येथ कां भोगावें वृथा कष्ट ॥जावें स्पष्ट देशावरा ॥१८॥बाहेर मेळवूनियां धन ॥यांच्या उरावरी च आपण ॥क्ष्मंड करुं चालवूं पण ॥लज्जित हे जन तैं होती ॥१९॥मग शिष्यांसहित देशान्तर ॥सेवूनि फ़िरती दारोदार ॥म्हणविती दंभे योगेश्वर ॥नारीनर झकविती ॥२०॥सकाम साधनांच्या कोटी ॥अनेक परमार्थाच्या गोठी ॥सांगूनी वेधिती जनांच्या थाटी ॥भजनपरिपाटी प्रकटूनी ॥२१॥आधीं दावूनि नि:स्पृहता ॥मस्तकीं हात ठेविती पुरता ॥मग मागती धन तत्तवता ॥करुनि सत्ता त्यांवरी ॥२२॥म्हणती शिष्यांसी आपण ॥तुम्ही कायावाचामन ॥अर्पूनि झालेति पूर्ण शरण ॥तरी धनवंचन करुं नये ॥२३॥तंव येर करुणा बहु भाकिती ॥स्वामी दरिद्रि आम्ही म्हणती ॥यथाशक्तया जें अर्पिती ॥देखूनि कोपती तयांवरी ॥२४॥मग ते शिप्य ही निभींडपणें ॥बोलती भंडविभंड बोलणें ॥परस्परें कळवंडतां त्राणे ॥छी थू होय बहु लोकीं ॥२५॥ग्रामाधिपति देशाधिपति ॥जाऊनि भेटति तयांप्रति ॥आशा देखनि ते बोलती ॥योगास्थिति हे काय ॥२६॥तथापि मुखदाक्षिण्यें देती ॥रुष्ट होऊनि तोचि घेती ॥ऎसें बहु क्लेशें धन अर्जिती ॥फ़िरुनि येती मठासी ॥२७॥तंव तें दुर्दशेचें धन ॥महत्क्लेशें संपादून ॥भोग भोगूं न शकती पूर्ण ॥उजगरपणें लोकांत ॥२८॥मग एकान्तीं करुनि स्थळ ॥निकट शिष्यिणीशिष्यमेळ ॥तिहींशी करिती चकंदळ ॥भयें विकळ होत्साते ॥२९॥जैसे जारजारिणी नारी ॥गुप्त भोगिती परस्परीं ॥परि दु:ख वाहती जिव्हारी ॥अहोरात्रीं जनभयें ॥३०॥विषयसेवन त्यां क्षणमात्र ॥परी काळजीस अंतरी अहोरात्र ॥तद्वत हेही अपवित्र ॥चिन्तातुर अखंडित ॥३१॥भोग वैभव हें यथेष्ट ॥झणें होईल लोकांत प्रकट ॥विपरीत मानूनि देतील कष्ट ॥मग जाईल स्पष्ट प्रतिष्ठा ॥३२॥म्हणोनि इहलोकीं द:ख स्थिती ॥पावती ऎसिये रीती ॥आतां अमुत्र दु:खावाप्ति ॥तेही निगुती परिसावी ॥३३॥पावले नाहींत ज्याचें पद ॥ऎसा जो तूं स्वयंबोध ॥ईश्वर कृतकर्माचा फ़लद ॥ह्नदयस्थ प्रसिध्द परमात्मा ॥३४॥त्या तुजपासूनि ही दु:ख ॥पावती निश्चयें बहिर्मुख ॥ते कां म्हणसी तरी विवेक ॥तो नावेक कथिजेल ॥३५॥ज्यासी निजप्राप्तचा अभाव ॥ते अविद्यावंत जीव ॥तिहीं आश्रमधर्म सावयव ॥अवश्यमेव आचारिजे ॥३६॥अंतरीं अप्राप्त तूं पुरुषोत्तम ॥आणि अज्ञान विषयत्वें जें परम ॥प्राप्तवर्णाश्रमीं निज धर्म ॥त्याचा अतिक्रम करुनिया ॥३७॥योगी म्हणवूनि यथेष्टाचरण ॥कैसें केलें तत्कर्मनिबंधन ॥ते पावती तव दंड पूर्ण ॥नरकलक्षण आकल्प ॥३८॥ऎसें परलोकींही सुख ॥भोगिती ते हीनविवेक ॥एवं कामिक यति उभयत्र दु:ख ॥लाहती निष्टंक श्रुति म्हणति ॥३९॥तंव एक वितर्के वदती ॥हे येथ कैसी वंदती ॥यतीसी कांहींही कृत्य निश्चिती ॥नाहीच जाणती विपश्चित ॥४०॥सुकदु:खोपभोगेंकरुन ॥प्रारब्धक्षय होय पूर्ण ॥कीं मारब्धभोगेंकरन ॥नोहेच क्षीण सर्वथा ॥४१॥या कारणास्तव त्या वॄथा ॥निन्दितां पुरें नेणतां ॥उभयत्र असुख हें लावितां ॥दूषण तत्त्वता किमर्थ ॥४२॥आश्रमधर्माचा परित्याग ॥हें लक्षितां त्यांचें व्यंग ॥तरी ऎका श्रुत्यर्थ साड्र ॥संशयभंगकारक हा ॥४३॥ब्रह्य जाणे तो ब्राह्यण ॥तो चिदात्मबोधें परिपूर्ण ॥स्वसुखानुभवें आनंदवन ॥निरंतर संविन्मय शान्त ॥४४॥हा नित्य महिमा ब्राह्यणाचा ॥कर्में न वाढे साचा ॥ना न लगे बाध उणीवेचा ॥येणें करुनि कदापिही ॥४५॥प्रावृट्काळीं जयापरी ॥नद्या मिसळती पूर्ण नीरीं ॥ग्रीष्मीं आटती परि समुद्रीं ॥न्यूनाधिक्य दिसेना ॥४६॥कीं अमृतीं शर्करा मेळविली ॥तरी त्या अधिक गोडी आली ॥नातरी कांहीं न्यून जाहली ॥हे तेथ बोली न शोभे ॥४७॥हाचि श्रुतिवचनें विशदर्थ ॥सनंदन वक्ताअ समर्थ ॥बोले विशुध्द परमार्थ ॥ते परिसोत श्रवणाथीं ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP