मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २२ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २२ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २२ Translation - भाषांतर त्वदनुपथं कुलायमिदमात्मसुहृत्प्रियवच्चरति तथोन्मुखे त्वयि हिते प्रिय आत्मनि च ॥न बत रमंत्यहो असदुपासनयाऽऽत्महनो यदनुशया भ्रमंत्युरुभये कुशरीरभृत: ॥२२॥ (९)॥ टीका ॥ भो भगवंता तुझिये भजनीं ॥अनुकूल नरतनु सर्वांहूनी ॥कुलायशब्दें वैय्याकरणीं ॥जिथे लागून म्हणताती ॥१८॥कु हें पृथ्वीचें अभिधान ॥तीमाजी अंती होतसे लीन ॥यालागीं कुलाय म्हणती जाण ॥देहालागून विपश्चित ॥१९॥ते नरतनु भजनानुकूळ ॥आज्ञेसरिसी वर्तनशीळ ॥आमतुल्य प्रिय केवळ ॥लाहोनि विकळ भजनीं जो ॥२०॥तथापि सर्वज्ञ तूं परमात्मा ॥भावें भजती त्यांचा प्रेमा ॥जाणोनि पुरविसी त्यांच्या कामा ॥विश्रामधामा विश्र्वेशा ॥२१॥अमरतरुच्या तळवटीं ॥न लाविताहि कुसुमादिवाटी ॥फ़ळ पुण्यांच्या विविधकोटी ॥इच्छितां पोटीं उपलब्ध ॥२२॥तैसा भक्तभावानें सरिसा ॥तूं सम्मुखची श्रीपरेशा ॥प्रियतम हितकर तुज ऎसा ॥आन आपैसा नसतांहि ॥२३॥ऎसा सुखेच्यहि तूं असतां ॥तुझ्या ठायीं प्रेमा चित्ता ॥सख्यादि भजनें नादरितां ॥भजती विवर्ता आत्मघ्न ॥२४॥असत्पदार्थोपासना ॥अवलंबूनि विपरीत ज्ञानाअ ॥भजती ऎसिया आत्मघ्नां ॥दीर्घस्वन्पा वरपढणें ॥२५॥म्हणती वडील दरिद्री होते ॥आपण झालों उद्योगकर्ते ॥नाना व्यवसायी धनातें ॥संपादिलें बहुयत्नीं ॥२६॥धनवर्धना विश्वासुक ॥पाहोनि योजिले सेवक ॥तथापि त्यांचा प्रातिमासिक ॥पाहणें लेख लागतसे ॥२७॥नामांकतांसी तनुसंबंध ॥केले उत्साह अगाध ॥वनितारत्नें शुध्द ॥भाग्यें प्रसिध्द लाधलीं ॥२८॥रुपलावण्याच्या खाणी ॥मनोनुकूला गॄहवर्तिनी ॥सालंकृता वसनाभरणी ॥तरुणी तरणि ते जाढ्या ॥२९॥तयांचे पोटीं झाले कुमर ॥प्रज्ञावंत परम चतुर ॥तिहीं घेतला कुटुंबभार ॥धाष्णर्ये धुरंधर निवडिले ॥३०॥निष्कापासूनि कोटिमान ॥यत्नें संग्रहिलें कांचन ॥आयव्ययाचें परज्ञान ॥अति सज्ञान प्रबोधनीं ॥३१॥अनेक वस्तूंचे संग्रह ॥अष्टादशधान्यसमूह ॥उभराभरी करितां पहा हो ॥अवकाश लाहों न पवती ॥३२॥विश्चास न वाटेचि कोणाचा ॥धोका द्रव्यरक्षणाचा ॥निगूढ ठाव निक्षेपाचा ॥युक्ति-प्रयुक्ति निर्मिती ॥३३॥ऎसें चित्त ठाय़ीं ठायीं ॥सर्वदा गुंतोनि गेलें पाहीं ॥तथापि देखोवेखीं काहीं ॥सुकॄतप्रवाहीं भरताती ॥३४॥कार्तिकमाघवैशाखस्नानीं ॥जाऊनि बैसती पुराणीं ॥धन वेंचितां मानिती हानी ॥ह्यणती आह्यां हें कोठूनि आठबलें ॥३५॥एक ह्यणती नायकों आतांतुम्ही साधावें परमार्था ॥सांडुनि प्रंपचाची चिंता ॥स्वस्थ एकान्ता सेवावें ॥३६॥येरु ह्यणे बायको भोळी ॥रक्षूं न शके लुगडें चोळी ॥ते केंवि धनसदना सांभाळी ॥आह्यांवेगळीं अतिदीन ॥३७॥लेकुरें नेणतीं आह्यांविणे ॥किविलवाणें दिसती दीनें ॥प्रस्तुत नातोंडांचीं लग्नें ॥करणें लागती आवश्यकें ॥३८॥नामा-रुपा-सारिखे देख ॥गृहस्थ पाहूनि आवश्यक ॥यांसी करणें सोयरिक ॥दीर्घ विवेक करुनियां ॥३९॥असत्पदार्थोपासना ॥सप्रेमभावें ऎसी मना ॥रुचलिया मग वैराग्य कोणा ॥भावें आत्मघ्ना उपजेल ॥४०॥समयीं आलिया याचकासी ॥मुष्टी पिष्ट देतां त्यांसी ॥वदान्य मानी आपणासी ॥सुकॄतराशी म्हणे घडल्या ॥४१॥सहस्त्रभोजनें सांवत्सरिकें ॥कीं श्राद्वपक्षादि वार्षिकें ॥ग्रहणें व्यतिपातपार्विकें ॥साधी सम्यकें सुवृतार्थ ॥४२॥व्रतें उपवास पारणीं ॥तीर्थयात्रांची धांवणी ॥म्हणे मजहूनि दुसरा कोणी ॥देवीं ब्राह्यणीं न भजेची ॥४३॥लोकीं माझी गॄहस्थिति ॥स्त्रीपुत्रादि धनसंपत्ति ॥मजहुनि सुखी नाहीं क्षिति ॥म्हणोनि चित्तीं श्र्लाघेजे ॥४४॥तंव पूर्वील जे कां विश्वासुक ॥ठेविले होते जे हस्तक ॥तेचि होती खग्रासक ॥पाहतां लेख साकल्यें ॥४५॥त्यांसी बोलतां निष्ठुरपणें ॥तेही बोलती पुरें उणें ॥पांचांमाजी लाजिरवाणें ॥घेऊनि भांडणें वाढविती ॥४६॥तयांसी होती अन्नान्नगति ॥सभाग्य केले ते स्वसंगति ॥कृतघ्न फ़िरुनि पडिले अंतीं ॥म्हाणोनि खंती बहु वाटे ॥४७॥ऎकतां त्यांच्या विषम गोठी ॥त्र्कोधें भडका उठे पोटीं ॥बळें झोंबूनियां कंठीं ॥वाटे घांटी फ़ोडावी ॥४८॥ऎसा प्रचंड्द क्रोध वाढे ॥तैं शान्ति क्षमा कोणीकडे ॥घातपातावरी वावडे ॥वेंचूनि कवडे नृपसदनीं ॥४९॥ऎसे व्यवसाय अनेक ॥असदाराधनीं मानिती सुख ॥तेणे प्रबळे शत्रुषट्क ॥मग भोगिती नरक बहु योनी ॥५०॥रांड मेलिया दु:खें रडे ॥पोर मेलिया शोर्के वरडे ॥विश्रान्ति न वटे चहुंकडे ॥वर्णितां तोंढें गुण त्यांचे ॥५१॥असो वैराग्य नुपजे देहीं ॥तंववरी सहसा सुटका नाहीं ॥आत्महंते मोहप्रवाहीं ॥ऎसेचि पाहीं निमज्जती ॥५२॥नरदेह अनुकूल नवविधभजना ॥तो मग लावी तदुणकथना ॥दु:खें व्याप्त अंत:करणा- ॥माजी वेदना भोगीतसे ॥५३॥हरिगुणश्रवणा पटतर श्रोत्र ॥हरिकीर्तना अनुकूल वक्त्र ॥हरिपरिचर्यें लागीं कर ॥नरशरीर ऎसें जें ॥५४॥असदुपासनेचे राहटी ॥तें वेचिती विषयासाठीं ॥मग भोगिती दु:खकोटी ॥देतां घरटी भवचत्र्कीं ॥५५॥जेथ जेथ वासना गुंते ॥तेथ जन्म घेऊनि कुंथे ॥पावे अनेक दुर्योनींते ॥भवभ्रमपथें परिभ्रमतां ॥५६॥मर्कट होवोनि कैकाडियाचें ॥दारोदारीं तत्तंत्र नाचे ॥कीं सर्प होवोनि गारुडियाचे ॥कुटुंब त्याचें मग पोषी ॥५७॥रीस व्याघ्र उक्ष वृश्र्चिक ॥श्वान वानर माजोर भूषक ॥रासभ सूकर मृग नंबुक ॥धरी अनेक कुशरीरें ॥५८॥चौर्यांशीं लक्ष संख्या योनी- ॥माजी नरतनु अनुकूल भजनीं ॥केवळ आत्मप्राप्ती लागोनी ॥देवें निर्मूनि ठेविली ॥५९॥चौर्यांशी लक्ष योनी भ्रमतां ॥केवळ विषयभोगीं रमतां ॥दुर्लभ नरदेह हा अवचितां ॥लाहिजे तत्वता बहुभाग्यें ॥६०॥दुर्लभ नरदेह लाभल्यावरी ॥अन्य योनोंचिया परी ॥विषयासक्त होइजे नरीं ॥तरी मग थोरी काय याची ॥६१॥लाहोनि नरदेह निधान ॥संपादूनि आत्मज्ञान ॥ब्रह्यनिष्ठ होईजे पूर्ण ॥मिथ्या भवभाव विसरुनि ॥६२॥आत्मा देखावा ऎकावा ॥आत्मा मननीं मंतव्यावा ॥निदिध्यासें अनुभवावा ॥ध्यावा गावा श्रुति म्हणती ॥६३॥श्रुतींचा मुख्य अभिप्राय ॥भ्रांत जीवांचा समुदाय ॥तयांसी लाधलिया नरदेह ॥परमार्थसोय साधावी ॥६४॥असन्मॄगम्बुपानें सुख ॥मानितां तेथें पावलें दु:ख ॥सन्मात्र चिदंबु सम्यक ॥सेवितां तोख सर्वत्र ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP