मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| ३६ ते ४० वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - ३६ ते ४० ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - ३६ ते ४० Translation - भाषांतर ३६ श्लोक (द्रुतविलंबित)दिसत साच नवाच विलास रे । बधुधनें बहु लांचविलास रे भ्रमसि तों तुज अंतक आपटी । म्हणुनि कॄष्णदयार्णव थापटी ॥आचरसी जन चोरुनि पातकां । मग घडे तुजलागि निपात कां ॥करिल अंतक ते समयीं पटी । म्हणुनि०॥दिननिशीं करिसी न उसंत रे । न भजसी सुर सज्जन संत, रे ॥अचुक भोग घडे लिहिला पटीं । म्हणुनि०॥दिवस दोन धनें जरि मातसि । परि पुढें न घडे गरिमा तसीए ॥मग मुखावरि खासिल चापटि । म्हणुनि०॥वय सरे पसरे बहु पाप रे । सुगम साधन लोटुनि पांपरे ॥भ्रमासि तूं परि अंतक धोपटी । म्हणुनि०॥हरि मुरारि मुकुंद जनार्दना । नरहरी मधुकैटभमर्दना ॥करिं असा सुरसीं जप वाक्पटीं । म्हणुनि०॥न करितां करितां त्र्कियमाण रे । घडत भोग तयाचि समान रे ॥मग घडे पडणें भवदुर्घटीं । म्हणुनि०॥जरि कराल विचार निका मनीं । तरि त्यजा भजता धन-कामिनी ॥मग दयार्णव तारिल दुर्घटीं । म्हणुनि०॥३७ श्लोक (द्रुतविलंबित)बहुत सार तुझें वय जातसे । घडि घडी तुजला यम खातसे । परि उगाचि कसा भुलसि जना । त्यजुनि मोह अधीं भज सज्जना ॥संकळ शाश्वत मानुनि वैभवा । त्यजुनी सौख्य अधीं रतसी भवा । विषयतस्कर देहसमागमीं । त्यजुनियां, स्वसुखा सुगमा गमीं ॥सुह्नत जोंवरि हें बपु सावध् । गतवयीं न मनीं सहसा वधू । इतर विन्मुख बांधव सोयरे । म्हणुनियां धरिं माधव सोय रे ॥पळपळावरि वेंचत आवधी । अवचिता तुजला यम हा वधी । उबगती अवघींच तुझीं तुला । त्वरित सांडिं जढा भ्रमहेतुला ॥गळ गिळूनि मिना निमणेंच कीं । विषयसंगम साच तसाच कीं । दिपकळे जळताति पंतर रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥श्रवण देऊनि नादसुखावरी । रिपुभयासि मनांत न सांवरी । धरुनि गारुडि नेति भुजंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥निरखितांच चणे भ्रम मर्कटा । घडत मुष्टि भरी न सुटे कटा । विषय केवळ मोहतरंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग०॥जळत गेह कसें वसवीतसां । त्यजुनि अमृत कां विष घेतसां । तरुण देह करी देह करी तुज दंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग०॥ जरि दयार्णव सेवि न भूलला । तरि तया न कळे चवि भूलला । म्हणुनि सज्जनसंगति रंग रे । भ्रमक हा तुज मन्मथसंग रे ॥३८ श्लोक ( शार्दलविक्रीडित)कौडिण्यप्रभु भीमकोत्तम मनीं चिंती जगत्पाळणा । जेव्हां रुविमाणि नाम ठेउनि सुता घालि वधू पाळणां ॥तीचीं लक्षित लोचनीं अनुदिनीं आलौकिक त्र्कीडणें । छंदें कॄष्णदयार्णव प्रगटवी शार्दूकविक्रीडणें ॥१॥लक्ष्मीकांत गदा सचत्र्क ह्नदयीं श्रीवत्स माळा गळां । हस्तीं पंकज पांचजन्य धरिला चंद्रद्युतीआगळा ॥कासे कांचनपट्ट सोज्वळ हरी विद्युल्लतेची कळा । साक्षाद्विष्णु वधूवरासि वर दे कुर्यात्सदा मंगलम् ॥२॥नाहीं रुक्मिणितुल्य ये त्रिभुवनीं कॄष्णाविणें नोवरा । साक्षाद्रुक्मिणि रुक्मकांति सहसा नीलाकॄति श्रीवरा । ऐसा हा घटितार्थ भीमक मनीं इच्छीतसे सर्वदा । तैसा कॄष्णदयार्णव प्रगटतां कुर्यात्सदा मंगलम् ॥३॥शंभू षण्मुख विघ्ननाशक उमा गंगा फ़णी कंठिंचे । नंदी चंडिश भॄंगिरीट गण जे कैलासवैकुंठिंचे । ज्ञानी योगसमाधिवैभवबळें कैवल्य जे पावले । ते कल्याण दयार्णव प्रतिदिनीं कुर्यात्सदा मंगलम् ॥४॥वैकुंठप्रभु सेंदिरा करतळीं पंचायुधें जो धरी ॥नाना-चित्रचरित्र-कीर्तनमिसें नाना जनां उध्दरी ॥क्षीराब्धी-जठरीं द्विज-ध्वज हरी शैय्यालु शेषावरी ॥साक्षात्कॄष्णदयार्णव प्रतिदिनीं कुर्याच्छुभं मंगलम् ॥५॥तीर्थें आणि तपेंव्रतें हरिकथा दानें समाराधना ॥शास्त्रें धर्मविचारणा विनयिता यज्ञादि आराधना ॥योग-ध्यान-समाधिसाधनसुखें विच्छेदकें बंधना ॥ऐसी बोधकता दयार्णव सदा कुर्याच्छुंभ मंगलम् ॥६॥३९ श्लोक (इंद्रवज्रा)राजेश्रि ती शब्द विशाळ केले ॥त्या संभ्रमा मूढ मनीं भुकेले ॥वृध्द वॄषाच्या वृषणार्थ कोल्हें ॥देखोनि जैसें भ्रमतांचि मेलें ॥१॥विलासिनी-नेत्रकटाक्ष-बाणें । मूर्खा मनीं मन्मथ हांव बाणे ॥ वॄध्द वृ०॥२॥वनस्पतीसारज हाटकाची । स्पृहा धरी मूढ महा ठकांची ॥ वृध्दवृषा०॥३॥संपादुनी शाबरमंत्रसिध्दी । इच्छी करुं सर्वजन प्रसिध्दी ॥ वृध्दवृ०॥४॥संमोहना जारणमारणातें । साधूनि वांछी धनकारणातें ॥ वृध्दवृ०॥५॥पायाळ नेत्रांजनसाधनासी । साधूं म्हणे मूढ महा धनासी ॥ वृध्दवृ०॥६॥पंचाक्षरी द्यूत भिषकचिकित्सा । मूढा मनीं तद्रतलाभ इच्छा ॥ वृध्दवृ०॥७॥सन्मार्ग सांडूनि कुमार्ग रानीं । कां हो भरावें चतुरां नरानीं ॥८॥श्रीकातसभ्दक्ति-सुवर्ण वाचा । इत्यर्थ हा कॄष्णदयार्णवाचा ॥९॥४० श्लोक (इंद्रवज्रा)संसारिचें वैभव तों न राहे । दुर्वासना नाडितसे नरा हे ॥यालागिं हा मायिक भाव जावा । गोविंदजी प्रेमरसें भजावा ॥१॥जो दुर्जनु राघवतात साधी । जो अर्जुना दुर्धर मानसाधि ॥तो मोह अंत:करणें त्यजावा । गोविंद०॥२॥जो दुस्तरापासुनि सोडवीता । जो ऊर्ध्वमूळाप्रति तोडवीता ॥तो सद्गुरु ह्नत्कमळें पुजावा । गोविंद०॥३॥व्यापार जो जो निपजे स्वभावें । नैमित्य-नित्यादिक भिन्न भावें ॥ब्रह्यार्पणें तो स्वरुपीं यजावा । गोविंद०॥४॥नामामृतें अंतर रंगवावें । सच्चित्सुखें दुस्तर भंगवावें ॥दयार्णवी वेध निका न जावा । गोविंद०॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP