मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक २४ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक २४ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक २४ Translation - भाषांतर क इह नु वेद बतावरजन्मलयोऽग्रसरं यत उदगादृषिर्यमनु देवगणाउभये ॥तर्हि न सन्न चासदुभयं न च कालजव: किमपि न तत्र शास्त्र-मवकृष्य शयीतयदा ॥२४॥ (११)॥ टीका ॥बत या अव्ययार्थे श्रुति ॥भो भगवन्ता ऎसे म्हणती ॥अग्रसर तूं इये जगती ॥सर्वा पूर्वी स्वत:सिध्द ॥८८॥तया तूतें अर्वाचीन ॥उत्पत्तिस्थितिनाशवान ॥जाणो शकेल पुरुष कोण ॥ज्ञानकारणावांचूनि ॥८९॥सर्वत्र तुजहूनि अलीकडे ॥यदर्थी काय प्रमाण घडे ॥तरी यतउदगात् या पदे कोडें ॥देऊनि अलीकडे ॥यदर्थीं काय प्रमाण घडे ॥तरी यतउदगात् या पदें कोडें ॥देऊनि झाडे सूचविलें ॥९०॥यत: म्हणिजे ज्यापासून ॥प्रथम ऋषि जों कां द्रुहिण ॥उत्पन्न झाला तेणें सृजन ॥केलें संपूर्ण सॄष्टीचे ॥९१॥आधिदैविक आध्यात्मिक ॥द्विविध देवगण द्रुहिणें देख ॥सृजिले तिहीं विश्व सम्यक ॥रचिलें अर्वाक उत्तरोत्तर ॥९२॥ऎसें तुजमाजी तुजपासून ॥या विश्वाचें स्थितीलयसृनन ॥एंव तुजहूनि अवीचीन ॥तुज कोठून जाणती हे ॥९३॥ऎसें अर्वाकू उत्तरोत्तर ॥तुजसीं पडतां बहु अंतर ॥म्हणोनि न कळे यां तव पार ॥पडिला अंधार अज्ञाने ॥९४॥आणि जेव्हां सर्व आकर्षून ॥आपणामाजि करुनि लीन ॥योगमायामंचकीं शयन ॥उपसंहरुन तं करिसी ॥९५॥तेव्हां समस्त जीव कोटी ॥निद्रित होती मायेच्या पोटीं ॥ज्ञानसाधनांची त्यां गोठी ॥नाहीं शेवटी निद्रिता ॥९६॥तेव्हां नाहीं सदसद् ॥स्थूलसूक्ष्मादिक जें विशद ॥दोही मिळोनि एकविध ॥तो शरीरभेद नसेचि तैं ॥९७॥तेव्हां नाहीं काळवेग ॥अक्षरपळघटिकाब्दयुग ॥काळ वैषम्य प्रसंग ॥तोहि मार्ग नसेचि तैं ॥९८॥तेव्हां कैंचे पृथक् प्राण ॥तेथ कैंचा इंद्रियगण ॥शास्त्रही ज्ञानसूचक पूर्ण ॥कैचें कोठून त्या ठायीं ॥९९॥तुजपासूनि जन्मला द्रुहिण ॥तेणें मन्वादि महर्षिगण ॥उत्तरोत्तर प्रजासृजन ॥केला उत्पन्न करावया ॥५००॥आध्यात्मिक आधिदैविक ॥व्यष्टिसमष्टिकरणाश्मक ॥द्विविधदेवताचत्र्कविवेक ॥झाला अर्वाक तुजहूनी ॥१॥तया देवता चत्र्कद्वारां ॥विपरीत ज्ञानाचा उभारा ॥देहवंता प्राणिमात्रां ॥अविद्यापरां औपाधिका ॥२॥तेणे काळकाळान्तरें ॥तुजसीं अंतर पडिलें खरें ॥यास्तव अज्ञान अंधारें ॥अविद्याभरें दृढावलें ॥३॥असो देहादि उपाधिवन्तां ॥मळिनसत्वां काळान्तरितां ॥भगवज्ज्ञानी अनर्हता ॥घडे तत्वता या अर्थें ॥४॥परंतु प्रळयाच्या अवसरीं ॥लय पावल्या चराचरीं ॥ ।समस्त गुणसाम्यें माझीरी ॥जीव कोटि लीन होती ॥५॥मायामंचकीं तुझें शयन ॥तैं जीवां तुजसी सन्निधान ॥असतां तुझें वास्तव ज्ञान ॥नोहे संपूर्ण जगदीशा ॥६॥प्राणादिकरणांचा समुदाय ॥इहीं साधनीं जाणिजे ज्ञेय ॥तूंहीं न होसी ज्ञेयविषय ॥साधन-समुच्चय नसेचि तैं ॥७॥तेथ शास्त्र ना शास्त्रवक्ता ॥श्रवण श्रोता ना मननकर्ता ॥एवं वास्तवज्ञानवार्ता ॥नोहे तत्वता दोहीं परी ॥८॥यास्तव होवोनि तवाड्:घ्रिशरण ॥सप्रेम करितां नवबिध भजन ॥कृपेनें द्रवूनि बोधिसी ज्ञान ॥तरी भक्तिसाधन वर सर्वा ॥९॥याचि श्रुत्र्यर्था दृढीकरण ॥करावया व्यासनंदन ॥करुनि अनेकमतखंडन ॥करी ब्याख्यान तें ऎका ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP