मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| १६ ते २० वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - १६ ते २० ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - १६ ते २० Translation - भाषांतर १६ श्लोक ( शिखरिणी, श्रीगणपतिस्तवन)नमो श्रीविघ्नेशा परशु-रद-पाशांकुशधरा ॥धरापॄष्ठीं दुष्टां दमुनि करि निष्कंटक धरा ॥कॄपादृष्टी दासांवरि करुनि तारी त्रिजगती ॥गणाधीशा स्वामी तव चरणिं माझी निजगति ॥गणाधीशा पायां भवतमशमाया नमितसें ॥नसें मी कामार्थी, स्वरत, रतिकामा दमितसें ॥नमीं पायां मायाजळनिधि तराया गणपती ॥जसा सत्पत्नीचें परमगतिचें कारण पति ॥कदा हेरबाचा वरदकर माथां जरि घडे ॥तदा चित्सौख्याची ह्नदयभुवनीं खाणि उघडें ॥विकल्पांच्या श्रेणीजनक तम अज्ञान विघडे ॥अविद्येच्या नाशें तनुचरित दुष्कर्म न घडे ॥तुझे पायीं दूर्वादळ-अमळचित्तार्पण करी ॥तया बाधा क्रोधप्रमुख रिपुकंदर्प न करी ॥दरिद्राच्या श्रेणी पळति करिं चिंतामणि धरी ॥करंटा तो चिंतामणि त्यजुनि चिंता मनिं धरी ॥तुझी चौथी भक्ती करिल तरि काळा न गवसे ॥तसा तो ब्रहात्वीं निखिळ कनकांगी नग वसे ॥दयाब्धीं तूं देवा सकळसुखठेवा प्रकट कीं ॥भिकारी दुदैवें फ़िरति मनसा चित्रकटकीं ॥न धुंडी धुंडीतें तनु मन समर्पूनि भजनीं ॥नसे दुर्भाग्याचा अघगिरि तयासन्निभ जनीं ॥करंटा कीं टाकी सुलभ परि चिंतामणि पुढें ॥करी शुध्दात्मा तो स्तुति नमन चिंतामणिपुढें ॥कटाक्षें विघ्नेशा वरिति विकटाक्षादि पदवी ॥यश:श्री ब्रह्यंडीं धवळ मिरवी कीर्ति पदवी ॥सुरश्रेणी मौळें न्यसिति पदिं नीराजनविधी ॥करी कन्यादानें तव भजनिं आत्मार्पनविधी ॥लघू तूं येकार्णा सबळ गुरु पंचाक्षरिं पडे ॥लघू पंचास्यत्वें गुरु युगळदंपत्य रुपडें ॥लघू त्रैविद्यांतीं परमगुरु सर्वा मुखरणी ॥दयाब्धी चित्सत्ता अभिनव कवित्वीं शिखरिणीं ॥१७ श्लोक ॥ (शिखरिणी, मल्लारिस्तवन)नमो श्रीमललारी भवभय निवारीं झडकरी ॥करीं घे खड्गातें मम अहित निकृन्तन करीं ॥तुझा माझे माथां वरद कर होतां महिपती ॥तदा मातें सन्मानिति बुध महेंद्रादि नॄपती ॥तुझ्या नामोध्दाटें कळिमळ जळे अर्धघटिके ॥टिके निष्ठा त्याला रिपुकॄत प्रयोगादि लटिके ॥दया विद्या सत्ता विजय शुभकीर्ति प्रगटती ॥जसे चंद्रासंगें पियुषरसरश्मी लगटती ॥तुरंगाच्या स्वारा रिपुवनकुठारा मणिहरा ॥हराया भूभारा उठति तव मायाब्धिलहरा ॥नटें नाट्यें नाना सुरस कविता तूं शिकविता ॥तुझ्या पादाब्जाचा स्तविल महिमा कोण कविता ॥तुझा भंडारा जे उधळिति सदा भक्त शिरस । रसाळा शब्दांते वदति न सरी ते नवरसां ॥यशस्वी ते होती नॄपसदनिं वादीरणमहीं । न बाधी त्यां दुष्टग्रह दुरित विघ्नादि यमही ॥करी जो षष्ठीचें व्रत प्रतिपदेपासुनि बरें ॥वरें त्या मल्लरी अचळ सुख देतो निज करें ॥करी वारी यात्रा बहुविध सपर्या हरिकथा । कथा त्याची लोकत्रयभरित दाबी शिवपथा ॥अहो, पांचै पद्यें स्तुति रचित मल्लारिचरणी । यथाज्ञानें पंचामॄत रसिकछदें शिखरिणी ॥करी भक्तिप्रेमान्वित नरहरी रंक नमना ॥गुरुच्या पादाब्जां.............दयाब्धी तनमना ॥१८ श्लोक (शिखरिणी)करावीं सत्कर्में इहपरफ़ळाशा न धरणें । स्वदीक्षेचें औपासन भजन सारांश करणे । गुरुप्रेमें संतां द्विजवरकुळां लागि नमिजे । दयाब्धीची आज्ञा रिपु दमुनि दुर्बुध्दि वमिजे ॥१९ श्लोक (द्रुतविलंत्रित, कीर्तनमहिमा)परिसतां निरसी भवघात रे । विवरितां भव हा अवघा तरे ॥सहित पूर्वज वंश हि उध्दरे । कलियुगीं हरिकर्तन शुध्द रे ॥कालिल कोटियुग्गार्जित फ़ार तें । हरिकथाश्रवणेंचि निवारते ॥करिति साधन हें चि सुबुध्द रे । कलियुगीं०॥न शकती श्रुति पावन ज्या करुं ॥शकति ते भवपार कसा तरुं ॥जड असे श्रवणेंचि विशुध्द रे ॥कलियुगीं०॥हरिकथा श्रवणें शिव डोलतो ॥अझुनि घे शुकनारद डोल तो ॥त्रिभुवनीं जपती सुर सिध्द रे ॥कलियुगीं०॥अमर ते मरणाप्रति मागती ॥कलियुगीं घडताति शुभा गती ॥म्हणुनि भागवतींच प्रसिध्द रे ॥कलियुगीं०॥सकळ भांडति शास्त्रजसंमतें ॥परि न चालति एकविधा मतें ॥परि तयांत कथा न विरुध्द रे ॥कलियुगीं०॥व्रत तपें जप होम समस्त कीं ॥विषम पातक बैसल मस्तकीं ॥भजनवांचुनि सर्व अशुद्ध रे ॥कलियुगीं०॥नर दयार्णव जो न भजेल कीं ॥हरिकथाश्रवणीं उमजेल कीं ॥तरि कदा मग तो जड नुध्दरे ॥कलियुगीं०॥२० कीर्तनसुधा (मालिनी, टाळी)धन सकळसुखाचें कीर्तनीं वाटताहे । लुटिति करयुगें त्यां तुच्छ भू वातताहे ॥धरिति मद तयांतें काळ देतो उटाळी । म्हणउनि हरिरंगीं वाजवा एक टाळी ॥हरिजनवनशोभा कीर्तनीं वाढवावी ॥कृपण कुटिलतेचीं कुश्चिळें झाडवावीं ॥विकळ खळ निवारा ज्यांसि निंदा विटाळी । मग सकळ अनंदें वाजवा येकि टाळी ॥अगणित गुण गाती कीर्तनीं नामघोषें । परिसत गजरानें श्रीषति पूर्ण तोषें ॥स्मरण रघुपतीचें पातलें विघ्न टाळी ॥म्हणउनि हरिरंगीं वाजवा एक टाळी ॥कुटिळ खळ कुविद्या सांडिजे कर्म खोटें ॥बटवट करितांही नातुडे सौख्य कोठें ॥सकुळ यमपुरीतें नेत निंदा कुटाळी । हरहर मुखमंत्रें वाजवा एक टाळी ॥नरहरी हरिरंगीं नाचतां नाम गा रे । विसरत हरि त्यांतें काळ देतो दगा रे ॥क्षणभरी न करावी व्यर्थ चर्चा टवाळी ॥स्मरत मुखिं दयाब्धी वाजवा एक टाळी ॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP