मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| ५१ ते ५५ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० स्फ़ुट पदें व अभंग - ५१ ते ५५ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव स्फ़ुट पदें व अभंग - ५१ ते ५५ Translation - भाषांतर ५१ ॥ अभंग ५॥निष्काम सत्कर्म ईश्वरीं अर्पितां । होय प्रसन्नता ईश्वराची ॥१॥अनित्याचे ठायीं कंटाळतां चित्त । होतसे विरक्त आपेंआप ॥२॥देवाच्या प्रसादें चित्त शुद्धि होये । नित्यानित्य सोये तेव्हां कळे ॥३॥विरक्त होऊनि सद्गुरुसी पुसे । जन्ममॄत्य कैसे दूर होती ॥४॥अतव्घावृत्तीनें बोधितां सदगुरु । व्यतिरेक विचार पाहे बरा ॥५॥स्थूळलिंगदेह शोधुनी कारणीं । स्तब्ध होय वाणी व्यतिरेकाची ॥६॥विपरीत ज्ञानाचा अनुभव खुंटतां । पांगुळे अहंता जाणिवेची ॥७॥तेव्हां देहातीत आत्मतत्त्व दावी । सद्गुरु गोसावी शक्तिपातें ॥८॥नेणण्या जाणसी तो तूं प्रत्यगात्मा । लक्षांशता ब्रह्या ऐक्य पाहें ॥९॥अनित्याचा नित्यावरी अध्यारोप । पाहें आत्मरुप अपवादें ॥१०॥जीवशिवभेद्द निरसूनियां शुध्द । आत्मा स्वत: सिध्द दयार्णव ॥११॥५२ ॥ अभंग ६॥ज्ञानासि आश्रय महाकारण देह । मूर्ध्रिस्थानीं पाहें ऐक्य-बोधें ॥१॥आनंदावभास भोग परा वाचा । प्रत्यगात्मा याचा अभिमानी ॥२॥वेद शिरो भाग अर्ध मात्रा ध्वनी । शुध्दसत्त्वगुणीं ज्ञानरुप ॥३॥साक्षित्वासि टाकी तेव्हां ते उन्मनी । सुख आस्वादनीं तुरीया ते ॥४॥यावरी अनुभव सांप्रदायत्र्कम । अभ्यासाचें वर्म गुरुखुणा ॥५॥शब्दाचा विचार येथुनी राहिला । साधकें पाहिला अनुभव ॥६॥लयलक्षमुद्रा कोणी ध्यानयोगें । कोणी राजयोगें चित्त पक्क ॥७॥प्राणायामें हठें अमनस्कें कोणा । उन्मनीच्या खुणा ज्ञप्ति मुरे ॥८॥उर्णनाभि तंतु गिळूनि उगळी ॥तैसा सर्व काळीं योगयुक्त ॥९॥तुरीयत्वें होय आनंदाचा साक्षी ॥उन्मनी अलक्षीं तदाकार ॥१०॥जावो राहो देह न मोडे अनुभव ॥कॄष्णदयार्णव घनानन्द ॥११॥५३ ॥ पद ६ वें ॥दॄष्टि मुरडुनी नयनीं पाहे । पाहातें पाहाणेंचि होउनि राहे ॥१॥तेज पुंजाळतां भार वाढे । तेथें पाहतेंचि पाहें निवाडें ॥२॥भास विरोनी जिराली ज्ञप्ति । कैंची जागृती आणि सुषुप्ति ॥३॥तुर्या देवीचें उडालें नांव । तेथें अबोलणा अनुभव ॥४॥मन उन्मन होउनि जागें । दयार्णवी च अन्वय लागे ॥५॥५४ ॥ अभंग ७॥मी तुझ्या पायींचा रज ऐसा भावीं । तूं आमुचा गोसावी देवराया ॥१॥गोविंदा तूं गाय मी वत्स निर्धारें । तूं माय म्यां पोरें आळ कीजे ॥२॥गोविंदा तूं पती आम्ही पतिव्रता । गोविंदा तूं पिता पुत्र आम्हीं ॥३॥गोविंदा तूं सिंधू आम्ही सर्व गंगा । असों सर्व अंगा आलिंगुनी ॥४॥गोविंदा तूं आत्मा आम्ही आत्मास्थिति । तूं रत्न मी दीप्ति गोपिनाथा ॥५॥तुम्ही दयार्णव आम्ही तेथें दया । असों सोयरिताअ अभिन्नत्वें ॥६॥५५ ॥ अभंग ८॥चाड नसे मज आणीक कोणाची । एका गोविंदाची आस पाहें ॥१॥तयावीण जीणें शून्य वाटे लोकीं । कोण माझें पोखी मनोरथ ॥२॥कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । कोण वेळोवेळां आळवील ॥३॥दाही दिशा तुजवीण शून्य झाल्या । चित्त कांहीं केल्या स्थिर नाहे ॥४॥दयार्णवा तुझ्या वाढलों । आजी वाटे झालों परदेशी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP