मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
आरती सद्गुरूची

आरती सद्गुरूची

संत बहेणाबाईचे अभंग

६२०.
जय सद्गुरूराया माझी निरसी माया । ठेवितसे मस्तक तव चरणी । नश्वर संपत्ति जाया ॥धृ०॥
नसते मीपण घेउनिया । देहे केले सर्वही जाया । दृश्य पदार्थ अमित भ्रमास्तव । अंतरले गुण गाया ॥१॥
जन्मजराभय दुस्तर वारूनी । सांग तु मोक्ष - उपाया । पुत्रकलत्र विचित्र मनी सुख । जाइल सर्वही वाया ॥२॥
बहिणी म्हणे गुरूपदांबुज इच्छितसे वर द्याया । जय सद्गुरूराया । माझी निरसी माया ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP