मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
हुंबरी

हुंबरी

संत बहेणाबाईचे अभंग

५९५.
ऐका यमुने घोषा । उडाला पेंद्या कैसा ॥१॥
भरले अंगी वारे । हसती कैसी पोरे ॥२॥
ठेवुनि तीरी झारी । आली न म्हणे पोरी ॥३॥
बाहे पिटी मांडी । वरी सोस धरी तोंडी ॥४॥
घेवुनि हाती काटे । हुंबरी घाली नेटे ॥५॥
मज पेंद्याचा वार । येथे कोण धरी धीर ॥६॥
आली म्हणे पोरी । करीन तुज नवरी ॥७॥
लाविला मज चाळा । फोडीन तुझा डोळा ॥८॥
घाली पेंद्या वार । यमुना नव्हे स्थिर ॥९॥
उडत कसा फोडी । खरेसी आली जोडी ॥१०॥
सोस कंठी राहे । हुंकार न सांडी पाहे ॥११॥
यमुना नव्हे स्थिर । पडिला धरणीवर ॥१२॥
धांवोनी आला हरी । पेंद्या धरिला दो करी ॥१३॥
यमुना केली स्थिर । म्हण म्हणे आता किर्र ॥१४॥
घेतली आळी मोठी । यमुना जाली खोटी ॥१५॥
राहिला यमुनेचा घोष । सोडिला पेंद्याने सोस ॥१६॥
आली म्हणे पोरी । थोपटी कैसा टिरी ॥१७॥
बहिणि हुंबरी गाय । नाचत पंढरीराय ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP